| Quotes by Neil The Story Teller |
माझ्या बालपणात TV वर एक सिरीयल लागत
होती "जंगल बुक", तुम्ही पण पहिली असेलच. त्या मधल्या मोगली कड एक शस्त्र
होत "Boomerang". मी बऱ्याच
वेळा वहीचा पुठा एकत्र करून प्रयत्न केला "Boomerang"
बनवयाचा, पण मला काय ते जमलं नाही.
"Boomerang" ची खासियत
असते, ते आपण जोरात फेकलं कि फिरून परत आपल्या कड येत. नक्कीच त्या मागे Science होतं.
तेव्हा मला कळलं नाही पण आता नियतीने छान शिकवलं "Boomerang" म्हणजे काय. म्हणतात ना "जे पेराल तेच उगवणार".
लहान पण पासून आपण ऐकत आलोय "नेहमी चांगले वागा , नेहमी चांगले राहा वैगरे वगैरे...!!!
काय कारण असाल हे सगळं सांगण्या मागं..!!
माझा वयत्तिक मत आहे "
प्रत्येक व्यक्ती चांगली असते, फक्त प्रत्येकावर वेळे चा प्रभाव असतो"
"वक्त ने किया क्या हसी सीतम, हम रहे ना हम , तुम रहे ना तुम"
असो,,,, मी काय अध्यात्म सांगणार नाही आहे, ते आपल्याला सध्या तरी जमत नाही ,,,,,J...!!
तुम्हा सगळ्यांना माहित असेलच, मी फक्त माझा बरोबर घडलेल्या सत्य घटनां विषई थोड फार लिहीत असतो.
हे लिखाण अश्याच एका छोट्या घटने वर आधारित आहे आणि मराठी मध्ये लिहिण्याचा माझा पाहिजे प्रामाणिक प्रयत्न.
महात्मा गांधी नि म्हटलं आहे "बदलायचे असेल तर पहिला स्वतःला बदल".
“BE THE CHANGE YOU
WANT TO SEE IN OTHERS”
आपण नेहमी म्हणत असतो , ह्यांने काय होणार नाही , त्याने काय होणार नाही, न-बदलण्याची माणसाची वृत्ती असते, ती नैसर्गिक पण आहे.
उदाहणार्थ , दररोज च्या ट्रॅफिक चा होणाऱ्या त्रासा बद्दल प्रत्येकजण सांगत असतो, पण रस्त्या वर चा सिग्नल कुणाला पाळायला नको.
एक म्हण आहे "A JOURNEY OF A THOUSAND MILES BEGINS WITH A SINGLE STEP",
प्रत्येक प्रवासाची सुरवात हि एका छोट्या पावलाने होते.
माझा मते आपला सर्वात मोठा शत्रू कधी कधी आपण स्वतः हि असतो.
हे नैसर्गिक आहे, कोणीही-कधीही-केव्हाहि, जर पर्याय दिला तर सर्वात पहिला सर्वात सोपा मार्ग स्वीकारत.
ह्या जगात सर्वात चंचल आहे ते आपलं मन आणि क्षणिक आनंदा साठी आपण परिणामांचा विचार करत नाही, जे माझ्या मते चुकीचा नाही.
प्रत्यके माणूस हा चांगलंच असतो, Given condition जर तुम्हाला त्याचा इतिहास माहित असेल तर.
पण आपण त्याच्या आजच्या वागण्या वरून किंवा परिस्तिथी वरून त्याच परीक्षण करतो.
जर तुम्ही स्वतः मध्ये बदल घडवू शकत असाल तर तुम्ही इतरांना देखील बदलू शकता.
ह्या जगात सर्वात महाग गोष्ट म्हणजे "सय्यम". ते लगेच मिळत नाही. तुम्हाला वाट बघावी लागते, आणि वेळेला वेळ द्यावा लागतो. पण शेवटी, आयुष्य हे सगळ्यांना शिकवतेच, कोणीही अपवाद नाही.
मी मूळचा कोल्हापूर चा असून सध्या पुण्यात नोकरी करतो. आणि कोल्हापूरकर कोल्हापूर ला सोडून राहू शकत नाही हे जग जाहीर सत्य आहे. त्यातलाच मी एक, जो प्रत्येक आठवड्याला, पुणे-कोल्हापूर-पुणे दौरा करत असतो.
पुणे-कोल्हापूर-पुणे म्हंटलं कि काळजा जवळ चा विषय, हातावर फोडच जणू. "हर एक कि दुखती राग हे ये"
ह्या आधी मी :पुणे-कोल्हापूर-पुणे: आणि ह्या दोन शहारा मधलं माझं आयुष्य" ह्या विषययावर एक Blog लिहिला आहे.
मी कधी कधी माझी गाडी घेऊन पुणे-कोल्हापूर-पुणे जायचो नाहीतर ST जिंदाबाद. थोड्या वर्षा मागे मला Carpool चा ग्रुप सापडला, त्या मुळे येणे-जाणे थोडे सोईस्कर झाले आहे.
सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे:
१. प्रवासाचा होणार वेळ कमी झाला.
२. नवीन माणसं भेटतात आणि मुख्य म्हणजे ती कोल्हापूरची आपली माणसं असतात.
विषय अश्याच एका प्रवासाची आहे.
एकदा माझी सोमवारी रजा होती, तसा मी महिन्यातून एक-दोन वेळा तर मुद्दाम आजारी पडतो, कोल्हापूर सुटत नाही ओ काय करणार, डायरेक्ट "दांडी".
सगळं Public शक्यतो सोमवारी-शुक्रवारी प्रवास करते. अधे-मध्ये आमच्या सरकी दुखी आत्मा कमी असतात.
माझ मंगळवारी जायचे ठरले, (कधी कधी सोमवारी घरातून पाय नाही निघाला, तर तो किती दिवस निघणार नाही सांगता येत नसतो.)
माझी स्वतः ची कार होती म्हणून मी Carpool ग्रुप वर message केला, बघू म्हंटलं कोणी ना कोणी तरी (समदुःखी) असेलच आणि एक member चा फोन आला.
कोल्हापूर मध्ये भेटण्याचे ठिकाण म्हणजे "ST-Stand". वेळ ठरली सकाळी ५:०० ची.
मी सकाळी त्याला ४:४५ ला कॉल केला. तो म्हंटलं मी येतो ५ पर्यंत. मी सगळ्यांनाच विचारतो, तसं ह्याला पण विचारल, "कोण येणार आहे सोडायला?"
तो म्हंटला पप्पा आहेत, ते सोडतील मला.
मम्मी आणि पप्पा म्हंटलं कि आपला Weak Point, मग ते कुणाचे का असेनात. त्याला म्हंटलं “भावा , पप्पांना काय त्रास देऊ नको, मी तुझा दारात येतो”.
मला माहित न्हवता तो कोण आहे किंवा काय करतो, पण कोल्हापूर चा आहे आणि सध्या पुण्यात आहे म्हणजे, कमीत कमी Engineer जरी नसला तरी Graduate असणार आणि आई वडील ज्यांचा मुलगा कोल्हापुरात शिकून पुण्यात राहतो, त्यांच्या घरचं वातावरण मी दररोज अनुभवतो. माझा मत आहे, ज्या पालकांनी शिक्षण दिल, बास इथून पुढं त्यांना काही कष्ट नाही झालं पाहिजे.
त्याच्या घराचे अंतर थोडे लांब होता पण अपने दिल से बडा नाही था.
मी सकाळी त्याच्या घरी गेलो आणि अपेक्षे
प्रमाणे त्याचे वडील बाहेर त्याच्या बरोबर थांबले होते.मी गाडीतून उतरलो & वडिलांना
भेटलो. एक भारी feeling असतंय पप्पा लोकांना भेटायचं. त्यांनी ठरल्या प्रमाणे जरा माझी
चौकशी केली & मग आमचा प्रवास चालू. तो मित्र म्हणाला “बरं झालं तुम्ही आला घरी,
कारण मम्मी पप्पा कालच लांबचा प्रवास करून आलेत, थोडं निवांत झोपतील आता”.
हे जे शेवटचं वाक्य होता ना, बास , आपलं
जे काय पुण्य म्हणा, कष्ट म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा "ते ऐकून मन सुन्न झालं".
ह्या छोट्या- छोट्या गोष्टी असतात ज्या कधी कधी मना मध्ये मोठी जागा करून जातात.
![]() |
| As always Self Marketing |
त्याला मी पुण्याला सोडलं आणि आपली गाडी
परत आपल्या रुळावर चालू.
मी म्हंटल्या प्रमाणे, मी हल्ली
carpool नेच प्रवास करत असतो. प्रवासात विषय ठरलेले standard विषय असतात:
१. मी आणि माझे कोल्हापूर
२. मी पुण्याला का आलो
३. मला कोल्हापूर ला परत जायचं आहे
४. कोल्हापूर मध्ये झालेले बदल
५. पुणे-कोल्हापूर NH-४ रस्त्याची सध्या
ची परिस्तिथि
६. कोल्हापूर आणि रोजगार
७. कोल्हापूर चे राजकारण
८. कोल्हापूर मधले जेवण
९. पुण्य मधल जेवण
१०. सध्या Launch झालेल्या एखाद्या नवीन
गाडी चा मॉडेल ची चर्चा.
११. आणि असलच बरंच काही.
प्रत्येक आठवड्या जाणारी येणारी बरीच
मंडळीं आहेत. त्या मुळ एकत्र जाण्या चा योग्य येत असतो. असाच एखादा मी सकाळी कोल्हापूर
ते पुणे प्रवास करत होतो. ज्याची गाडी आहे तो आपला मित्रच निघाला. तो एकदा माझा गाडीतून
आला होता. गप्पा चालूच होत्या. Driver शेजारी बसलं तर शक्यतो झोपू नये अस म्हणतात आणि
गाडी मध्ये कशी पण मला झोप येत नाही. एकटा गाडी चालवणार आणि बाकी सगळी झोपली तर एकदम
Driver ची फीलिंग येते, म्हणून शक्यतो मी झोपत पण नाही.
तो मित्र सांगत होता, एकदा तो कोल्हापूर
पुणे सकाळी निघणार होता आणि एकाचा कॉल आलेला पुण्याला येणार म्हणून.
सकाळी घरातनं निघणार तेवढ्यात धो धो
पाऊस चालू झाला. बरोबर येणारा member राहायला लांब होता. ह्याने त्याला कॉल केला, तर
तो म्हंटला पप्पा येतील सोडायला Stand वर. मित्र मला म्हंटलं "हे वाक्य ऐकलं आणि मला तुमची आठवण अली", त्याला तो म्हंटला
बाबा थांब मी येतो तुझा घरी घ्याला, उगाच पप्पांना त्रास नको.
माझा मित्र ज्याला घ्यायला गेला तो पण
खष , त्याचे घरचे पण खुष & सगळ्यात जास्त मी खूष.
“मी
जे पेरले होते, ते मला माझा समोर फुलताना दिसत होत”
माणसाची वृत्ती असते, "ट्रॅफिक
सिग्नल तोडने सर्रास आहे, पण तो काटेकोरपणे पाळणे क्वचितच".
आपण वेगळे बनले पाहिजे, जगात सर्वसाधारण
बरेच आहेत.
एकाने सिग्नल तोडला कि जनता मागे मागे
लगेच सिग्नल तोडत जाते, पण एखादा सिग्नल पाळत असेल तर त्या पाठोपाठ थांबणार नाही. म्हणून
आपण पण सिग्नल नाही पाळायचा असा होत नाही. त्या प्रमाणे आपलं सत्कार्य चालू ठेवा, भलेही
कोण काय चांगला म्हणो आगर नाही म्हणो.
मी लहान असताना १०-२० रुपयांच्या नोट
वर पेन्सिलनं सही करायचो, मला अशा होती कि ती नोट कधी ना कधी तर माझा कड जरूर परत येईल.
इतक्या वर्षात कधीच ती आली नाही, पण मी केलेली एक छोटीशी मदत, माझा पर्यंत फिरून आली,
“What goes around comes around” आयुष्यात
आणि काय पाहिजे.
“थोडक्यात सांगायचं म्हणजे, मी लिहिलेही तीच हि नोट जी परत माझा कड आली”

ह्या लिहिण्या मागे तात्पर्य आहे कि, मदत करत रहा.
स्वतः
पासनू सुरवात करा, कदाचित मदत करणारे फक्त तुम्हीच असू शकाल.
मधेच
कुणाला सोडू नका, मग तो एखाद्या व्यक्ती बरोबर चा प्रवास असो किंवा स्वतः ती व्यक्ती.
नील-एक-कथालेखक



