My Blog List

Monday, 18 March 2019

१८ वर्षाची आठवण


ह्या कथेतील जवळपास सर्व पात्र काल्पनिक आहेत, काही साम्य आढळल्यास केवळ योगा-योग समजावा J



वेळ:२०१९ सध्या.

मी थोडे दिवस कोल्हापूर ला होतो. तसा मी नोकरी ला पुण्याला असतो पण, प्रत्येक शनिवार-रविवार कोल्हापूर. पावभाजी चा बेत ठरला, मी संध्याकाळी राजारामपुरी मध्ये पाव आणायला जाणार होतो. बायको जेवणाची तयारी करण्यात लागली होती. ती म्हंटली तू जाऊन ये, मी बाकी सगळं आवरून घेते. तिने मला नेहमी प्रमाणे काय-काय आणायची आणि इतर कामाची यादी दिली. 'मिल्क कॉर्नर", आमचं पावभाज पाव चं आवडतं ठिकाण. मी दुकानात आत गेलो. दुकान तसं मोठं आहे. मी वर गेलो जिथं पाव असतात. यादी मध्ये एकदा बघितलं किती न्ह्याचे आहेत, त्या प्रमाणे मी पावाच्या लाद्या घेतल्या. चिन्मय ला कॅडबरी फार आवडते, म्हंटलं त्याला एक कॅडबरी घेऊन जाऊ. मी कॅडबरी चा फ्रीझर ओपन करणार तोपर्यंत एक छोटा मुलगा तिथं उभा राहिला. मी त्याला हातवाऱ्यानं सांगितलं मी दार उघडतो. मी दार उघडल्या उघडल्या त्यानं २-३ कॅडबरी लगेच घेतल्या. मी चिन्मय साठी एक छोटी कॅडबरी घेतली आणि एक ज्यादा घेतली. त्या बारक्या ला विचारलं एवढ्या कॅडबरी कोण खाणार, त्याने उत्तर दिलं नाही. 
मी म्हंटलं "लई कॅडबरी खाल्ली कि स्कूल मध्ये लई अभ्यास देतात, हे छोटी खा कुणाला काही कळणार नाही आणि अभ्यास पण करायला कोण सांगणार नाही".
"छोटी कॅडबरी मध्ये पॉवर असते".

हिरो ऐकून लगेच छोटी कॅडबरी घेतला आणि हसला. मी त्याच्या हातातल्या कॅडबरी घेऊन उठणार, तोपर्यंतचे तिथं बहुतेक त्याची आई आली होती. "अरे वाह, आज एकदम छोटी कॅडबरी कशी काय..??" बरका आईला म्हंटला "छोट्या कॅडबरी मध्ये पॉवर असते पॉवर, तुला माहित आहे काय..??" मी त्याने घेतलेल्या २-३ कॅडबरी परत आत ठेऊन मागं वळलो.

छोटू आईला चिकटला होता. मी त्याला एक Smile दिली. त्याने  माझा कड बोट दाखवत आईला कॅडबरी दाखवली. मी वर बघितलं, त्याची आई माझा कड बघत होती. मी एखादा नवीन चेहरा बघितला  कि मला कोना-ना-कोणाची तरी आठवण येते, नाहीतर मी ह्यांना आधी कुठंतरी बघितलंय असं वाटतंय, एकदम तसंच मला वाटलं.मी १-२ क्षण विचार केला, कि मी ह्यांना कुठं बघितलंय, मला काय आठवेना, पण मी त्यांना आधी भेटलोय हे मला वाटत होतं.

"बारक्याना कॅडबरी सर्वात जास्त आवडते", मी माझा हातातली कॅडबरी दाखवत बोललो. हे ऐकून त्या हसल्या. मी म्हणालो "हि मला नाही, माझा मुलगा आहे, एवढाच आहे, त्याला पण आवडतें, हे त्याच्या साठीचं आहे". मी नजर चुकून त्यांना निरखत होतो. मला एकदम त्यांच्या नजरेत पण कुतुहूल दिसलं. मी त्यांना विचारनार होतो, "तुम्ही के आय टी कॉलेज ला होता काय, तुम्हाला कुठं तर बघितल्या सारखं वाटतंय" पण नेहमी प्रमाणे असं  विचारनं बर दिसत नाही म्हणून मी आपलं अजून आठवतं का ते बघत होतो. मी बिलिंग काउंटर ला आलो. त्या माझा शेजारी दुसऱ्या काउंटर वर उभ्या होत्या. छोटू ला मी लॉलीपॉप कड बोट दाखवून पाहिजे का असा विचारलं, तो आई कड बघितला. त्या सामान ठेवत होत्या.

मी बिलिंग करून बाहेर पडनार, तोपर्यंत बायको चा फोन आला, दही आना म्हणून. मी लगेच आत गेलो आणि दही घेऊन बाहेर आलो. मी बाईक च्या डिक्की मध्ये सामान ठेवलं मागे बारक्या उभा होता. त्यांच्या बाईक च्या माग आणि एक बाईक होती, त्यांची गाडी निघत न्हवती. मी मागची जागा करून दिली. 

"थँक्स (थोडा विराम), तुम्ही XXXX कॉलेज ला होता काय??"
मला जे आठवत न्हवतं ते त्यांना आठवलं. 
मी होकार-अर्थी मान हलवली.

त्यांनी विचारलं "निलेश.....?????"

मी एका क्षणात माझा कॉलेज च्या युगात पोहोचलो. मला ती पुसट-पुसट आठवली. 
मी वर्तमान मध्ये आलो. "अरे आपण एका क्लास मध्ये होतो..!!" हे माझा साठी surprise होतं. मी १-२ सेकंद डोळे मिटले, आणि मला तिचं नाव आठवलं,,,नीलम.

"अत्ता लक्ष्यात आला माझा. कश्या आहेत तुम्ही..?"

"मी ठीक तू कसा आहेस आणि आठवेल तर कस, कॉलेज संपून १८ वर्ष झाली".
(१८ वर्ष फार मोठा काळ असतो, एकदम मला जाणवलं)

"तुम्ही कुठं असता, सध्या काय चालू..??मी नोकरी ला पुण्याला असतो , weekend ला कोल्हापूर".

"तुम्ही तुम्ही करू नकोस रे , माझा एवढाच आहेस तू....!!!"
"मी कोल्हापूर मधेच असते रे, एका शाळेत शिक्षिका आहे, हे माझा पिल्लू "राजवीर".
"कोल्हापूर मध्ये म्हणजे एक नंबर, निवांत आहे म्हणा".
"हो तसं निवांत आहे म्हणा".
"तुमच्यात sorry तुझ्यात फरक पडलाय ग..!!"
"कॉलेज मधली तू आणि सध्याची तू कल्पना करू शकत नाही".
"कारे असं का म्हणतोस..??"
"अग तसं नाही, तू आधी पण बेस्टच होतीस आणि त्यात , वक्त ने किया क्या हसी सीतम्..!!

(मी तेवढाच एक dialogue मारून टाकला). मनापासून लाजली ती.

मी कॉलेज चे दिवस आठवत होतो.
नीलम-  आमच्या क्लास मधली सगळ्यात उंच मुलगी, जवळ पास ५'८".
छोटे केस , बॉब कट म्हणतो ना सेम तेच.
बारा महिने जीन्स आणि टी-शर्ट.
Kinetic Honda घेऊन कॉलेज ला यायची.
प्रत्येक-वेळी नवनवीन शूज, नवीन गॉगल.
तिचे टॉप्स म्हणजे टी शिर्ट्स नेहमी शूज ला मॅचिंग असायचे.
आणि महत्वाचं म्हणजे zero मेकअप.

मला आठवत नाही मी कधी तिज्याशी बोललो पण होतो.

मी तेव्हा बहुतेक ५'६" होतो, नुकताच चष्मा लागलेला.
वजन पण जास्त न्हवतं आणि भर म्हणून कुरुळी केसं आणि तोंडावर मोड्या (Pimples).
मला असा एक न्यूनगंड तयार झाला होता.
क्लास मधली मुलं आणि माझ्यात मला जरा जास्तच फरक वाटत होता.
मी अकरावी ला सायकल न कॉलेज केलं, नंतर मला दीदी ची लुना मिळाली.
माझी "लुना" फँडेल मारून चालू करे पर्यंत, नीलम स्टार्टर मारून भुर्रर्रर्र व्हायची.
किती वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला,पण धाडस तेव्हा पण न्हवतं आणि आता पण नाही आहे.

मी एकदम वर्तमान काळात आलो. नीलम समोर उभी होती आणि महत्वाचं "ती माझाशी बोलत होती". 

(भगवान के घर देर हे, अंधेर नाही).

आताची नीलम:

एक Typical गृहिणी होती.

पंजाबी ड्रेस, लांब केस- तिने स्टेप्स STYLE केलेला (मला वाटलं होतं तिचे केस SILKY असावते),
एका मुलाची आई शोभेल असा तिचा बांधा झाला होता. मी तिच्या मुला कडे बघायच म्हणून हळूच तिच्या पाय कड पाहिलं, शूज ची जागा सँडेल ने घेतली होती.
कपाळावर चंद्रकोर टिकली, कानात छोट्याश्या रिंग्स, डोळ्यात काजळ आणि सर्वात आश्चर्य म्हणजे तिच्या नाकात नथ होती. 

"तू एकदम "कुछ कुछ होता हे" मधली काजल झालीस राव, इंटरव्हल नंतर एकदम कायापालट. ". 
ती परत लाजली, मी तिला असं नाजूक पहिल्यांदाच बघितल होतं.

"तू इतका बोलतोस माहित न्हवत रे मला, आपण एकदा पण बोलला नाही कॉलेज मध्ये..??"

"भीती ग तुझी भीती, बोबडी बसायची तुला बाहीतला कि". 

"शे, कायपण..!!""तुला माहित आहे मला तुझं नाव कस माहित..??"

मी आपल्या standard शैलीत, इशाऱ्यात सांगितलं "नाही".

"तुला आठवते मी Kinetic Hondaने  यायचे कॉलेज ला, एकदा कोणीतरी माझी गाडी मुद्दाम पार्किंग मध्ये आत लावली होती". 
Actually मला थोडं लौकर घरी जाईचा होतं आणि गाडी काय निघेना, तितक्यात तू कुठनं आलास आणि पार्किंग मध्ये गाडी लावू लागलास.

मी तुला गाडी कडून दे म्हणून सांगणार होते , पण तिथं आपले seniors उभे होते, म्हणून मी काही बोलले नाही, बहुतेक त्यांनीच माझी गाडी आत लावली होती. तोपर्यंत तू आलास आणि विचारलास "गाडी बाहेर काढून देऊ काय". मी हो म्हणायच्या आत तू एक एक गाड्या बाजूला करून माझी Kinetic बाहेर काढलीस. तुला थँक यु म्हणायचं होतं पण तोपर्यंत तुझे मित्र आले आणि मी काही न बोलता लगेच तीथून निघाले. मी तोंडाला स्कार्फ लावलेला , म्हणून मी तुला ओळखून आले नाही. मी नंतर तुला आपल्या क्लास मध्ये बघितलं, पण तू तर मुलींच्या पेक्षा लाजाळू होतास रे. आम्ही तुझा गालात पडणाऱ्या खळ्यां बद्दल नेहमी बोलायचो . तुझाशी आता बोलू नंतर बोलू म्हणत म्हणत राहिले ते राहिलेच. बहुतेक आज इतक्या वर्षांनी योग जुळून आला आणि कारण पण बघणा तेच आहे , गाडी काढण्याचं".

"पण ह्या वेळी मी तुला ओळखलं, तू तेव्हा पण "वेगळा" होतास आणि आता पण आहेसच".

मला हे सगळं स्वप्नच वाटत होतं, ज्या मुलीशी एकदा बोलणं व्हावं म्हणून आम्ही मरत होतो, तिला देखील माझाशी बोलायचे होते.

"दुनिया गोल हे भाई-पटलं मला".

"No Act of  Kindness , however small is ever wasted.

"माझी हरवली नोट आज पुन्हा मला सापडली होती".

आपल्या आयुष्यात किती बदल झाले आहेत हे आपण दुसऱ्याला भेटल्यावर कळत.

मला तिच्या बद्दल फार वेगळे समज/ Perception होते. कॉलेज मधली ती आणि आताची ती ,नाण्यांच्या दोन वेगळ्या बाजू होत्या, पण त्यावेळीच मी तेव्हा कसा होतो आणि मी आता कसा आहे, हे मला तिच्या बोलण्यातून/ नजरेतून कळालं. 

सण २०१९,

नंबर ची अदला-बदल झाली, आता आधी मधी फोन, message असतो, आम्ही चांगले मित्र झालो.

we all are special in some or the other way, It just takes someone to make us realize it.

१८ वर्ष लागली मला कळायला कि मी तेव्हा "खास" होतो आणि आता देखील आहे.

माझे वय तेव्हा १८ वर्ष होते आणि ह्या गोष्टीला १८ वर्ष झाली.

Me in College days, Me right now.....Now I know the Difference...!!!!
Glimpse of Nilam....:)





1 comment: