My Blog List

Tuesday, 9 April 2019

देव




देव:


एक शब्द, लाखो भावना आणि आणि असंख्य अनुभव.
मी देवा बद्दल काही बोलू इच्छित नाही, मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे, ज्यातून देव आणि देवपण जी सर्वाना आधीपासून माहीत आहेच फक्त थोडक्यात लक्ष्यात येईल.

माणूस हा नेहमी देवाला दोष देत असतो (मी हि त्यातलाच एक).

त्याच्या नुसार त्याने केलेल्या किंवा घेतलेल्या कष्टाचे त्याला यॊग्य फळ मिळत नाही, मग ते काहीही असो:

१. आपण एखाद्या व्यक्ती वर केलेलं प्रेम आणि त्याच्या कडून झालेला अपेक्षाभंग.
२. एखाद नातं टिकाव म्हणून सोसलेल्या यातना आणि पदरी आलेली निराशा.

हि झाली लोकप्रिय कारणं, तसंही आपण काहीही मनासारखं न झाल्यास, नेहमी एकतर डोळे बंद करून देवाला प्रश्न विचारत असतो किंवा वर बघत असतो (मीच का..??)

गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे

गोष्ट आहे कबीर ची, देवाला मानणारा आस्तिक माणूस.
तो पण इतरांसारखा नेहमी अपयश आलं कि देवाला दोष द्यायचा.
कबीर ला समुद्र फार आवडायचा. किनाऱ्यावर बसून शांत मनाने तो येणाऱ्या प्रत्येक लाटे ला बघत असे.

एकदा कबीर असाच समुद्रकिनारी बसला होता.
समुद्र शांत होता, एक एक लाट येऊन किनाऱ्यावर विलीन होत होती.
कबीर विचार करत होता, लाटे चं उदेष्य काय असेल, इतका मोठा प्रवास करायचा आणि किनारी येऊन विलीन होऊन जाईचं.

एकामागून एक लाटा येतच होत्या. एक तास ओलांडून गेला होता, कबीर त्याच जागी बसून होता.
त्याला समुद्रात आत गेलेले छोटी बोट दिसत होती, लाटांवर हेलखावे खात ते आपला तोल राखून होते.
अचानक वातारणात बदल जाणवू लागले, एकदम जोराचे वारे सुटले. लाटांचा वेग आणि उंची वाढू लागली.
कबीर किनारी बसला होता, शेजारी इतरही माणसे उभे होते.
अचानक थोडी माणसं त्या बोटी कडे बघू हातवारे इशारे करू लागली.
कबीर ने चौकशी केली असता त्याला कळलं कि त्या बोटी मध्ये एक कुटुंब आहे.
बोट फार आत पण न्हवती पण कोणी जाऊन त्यांना अनु शकेल इतना जवळ पण न्हवती.

बघता बघता समुद्राचे रौद्र रूप दिसू लागले.
आत गेलेल्या जवळ पास सगळ्या बोटी बाहेर आल्या होत्या, अडकली होती फक्त ती एक बोट.
बघता बघता लाटांचा वेग वाढला, एका मोठी लाठ अली आणि त्या बोटी ला आत घेऊन गेली.
बोट अचानक दिसेनाशी झाली, सगळी काळजीत पडलेली.
हात जोडून देवाचं चिंतन करत होती. कबीर हि त्यात होता.
आता बोट दिसेल, आता बोट दिसेल असं वाटत होतं, पण बोटी चा थानपत्ता नाही.

कबीर जो देवाची प्रार्थना करत होता, तो आता चिडला होता.

"देवा हे सगळं तुझा मूळ झालं.
तू त्यांना वाचवू शकला असतास.
ती सगळी माणसं देव दर्शनाला म्हणजे तुला भेटायला आली होती आणि तू त्यांच्या सोबत हा अनर्थ केलास.
असं कस करू शकतोस रे तू..??
असं होत राहिला तर देवावर चा विश्वास उडून जाईल..!!
अजूनही वेळ गेलेली नाही, एखादा चमत्कार दाखव आणि त्यांना वाचाव देवा..!!"

कबीर किनारी गुढग्यांवर उभारून हे सगळं जोर जोरात म्हणत होता.
अचानक त्याला एक मुंगी जोरात चावली. कबीर लगेच उभा राहिला, पाय झाडला आणि दिसेल त्या मुंगीला मारू लागला.
एक दोन क्षणा मध्ये त्याने सगळ्या मुंग्या संपवल्या.

एका क्षणा साठी तो अचानक थांबला,
त्याने समोर बोटी कड बघितलं आणि खाली पायात बघितलं.

त्याला समोर समुद्राच्या पाण्यात ती मुंगी दिसत होती आणि त्याच्या पायात ती बोट दिसत होती.

एका क्षणात त्याला कळलं देव काय असतो....!!!

कबीर ला दिसत होती ती फक्त बुडत असलेली ती एक बोट, पण आता त्याला दिसत होत्या किनारी आलेल्या इतर असंख्य बोटी.

"मनुष्य हा असाच आहे, कोण किती चांगले करते हे कधी लक्षात ठेवत नाही, पण हा कोणी वाईट केल्यास, चांगला लक्ष्यात ठेवतं."

जेव्हा तुम्हाला असं वाटेल कि आपल्याच बरोबर वाईट / चुकीचं घडत आहे, तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्यासाठी काहीतरी अजून चांगले नियोयोजिले आहे.