![]() |
| DEEP MESSAGE |
स्थळ अर्थातच पुणे.
पुणे माझं दुसरं घर. पुण्य बद्दल मला फार आपुलकी , प्रेम आणि जवळीक आहे. पुण्याने मला अपेक्षे पेक्षा जास्तच दिलं आहे, मी कायम पुण्याचा ऋणी
राहणार.
बऱ्यापैकी लोकांना माहित आहे कि
"Neil-The-Story-Teller" वर्षातून ३ महिने
"Neil-The-Mango-Seller" असतो.
"रत्नागिरी हापूस आंबा विक्री" हा पूर्णपणे व्यवसाय म्हणून
नाही, तर Part-Time म्हणून चालू केलेला माझा एक प्रामाणिक प्रयत्न. आयुष्यात कोण काय शिकवून जाईल काही सांगत येत नाही.
"म्हणतात ना माणूस हा आपल्या चुकांमधून शिकतो, पण शिकण्या साठी
चुका केल्याच पाहिजेत असं नाही, प्रत्येक क्षणा-क्षणात एक शिकवण आहे, फक्त डोळे उघडून
पहा आणि कान उघडून एका".
हापूस आंबा माझा साठी एक असा सवंगडी म्हणून आला, ज्याची मी आतुरतेने
वाट बघत असतो.
आदी आंबा खाण्यात मजा यायची, आता आंबा इतरांपर्येंत पोहोचवण्यात येते.
हापूस आंब्या मूळ मी बऱ्याच लोकांशी जोडलो गेलो. व्यवसाय म्हंटलं कि
सगळ्यात मोठा घटक "Human Resource Management".
देवा च्या कृपेने (Touch-Wood & Fingers crossed ) सगळी देव माणसं
भेटली, मग ते आंब्याचे बागायतदार असो वा Transport वाले किंवा आंब्याचे ग्राहक.
व्यसायात बोलणे फार महत्वाचे, अस म्हणतात. जर तुम्ही मला भेटला असाल
तर मी किती आणि कस बोलतो, हे आपल्याला माहित असेलच (आपलंच कौतुक कशाला 😉😉😉).
पण कधी कधी असं काही घडतं कि जे शब्दां पलीकडे असतं. जिथं शब्दांच
कुंपण नसतं , असतात फक्त आणि फक्त भावना.
हे छोटंसं लिखाण अश्याच एका अनुभवा बद्दल, जे ऐकून मी स्तब्ध झालो
आणि बराच काळ विचारात पडलो.
![]() |
घर: पालकां
शिवाय
घर म्हणजे "अनाथाश्रम“ आणि मुलां
शिवाय घर म्हणजे "वृद्धाश्रम”
|
वर्षातून मला दोन गोष्टींची फार आतुरता असते , एक म्हणजे माझा माणूस गणपती बाप्पा" आणि दुसरा महत्वाचा म्हणजे "फळांचा राजा- आंबा".
मार्च महिना आला कि हापूस आंबा येण्याची उत्सुकता चालू होते. मी माझा बागायतदार ना एक आगाऊ भेट देऊन येतो, म्हणजे आंबा हंगामाच
Timing कळतं. २ वर्षात आंब्याच्या निमित्ताने बऱ्याच माणसांशी संपर्क झाला. बरेच
"आंबा शौकीन" भेटले. एकदा का फळांचा राजा आला, कि सुट्टी देत नाही. दररोज आपलं आंबा आणणे
आणि आंबा घरपोच पोचवणे, इतकाच काम.
एके दिवशी मला आंब्याच्या Order साठी फोन आला. त्या २-३ महिन्यात अनोळखी
नंबर वरून येणारे फोन अपेक्षित असतात , पण तो फोन अपेक्षित न्हवता. फोन होता
"सदाशिव पेठ" मधून.
सदाशिव पेठ मधनं order म्हणजे "मानाचा नारळ"
मिळण्या सारखं आहे.
"नमस्कार, तुम्ही आंबे विकता ना"
"नमस्कार, हो Madam."
"आमच्या मुलाच्या मित्राने तुमच्या कडून आंबे घेतले होते, त्यांच्या
कडूनच तुमचा नंबर मिळाला".
"आम्हाला हि तशेच , अस्सल रत्नागिरी आणि एकदम चोख आंबे हवेत,
खात्रीशीर मिळतील ना..??"
"मिळणार-मिळणार, कधी, किती आणि कुठे पाहिजते तुम्हाला?"
त्यांनी मला त्यांचा घरचा पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, मी आंब्याचा बॉक्स घेऊन त्यांच्या घरी गेलो. पत्ता सापडायला काय अवघड नव्हता. सदाशिव पेठ नावाला शोभेल अशी
apartment होती, Typical construction. जुनं बांधकाम renew केलं होतं. खाली दुकानं होती आणि वर जाण्यासाठी
एक छोटासा रस्ता (Passage). मी गाडी लावून वर पहिल्या मजल्यावर गेलो. पुणेरी पाट्या तर जगभर प्रसिद्ध आहेत, पण तिथं कुठं दिसल्या नाहीत.
(सदाशिव पेठ मध्ये अपेक्षित होतं). Building renew केली होती, पण दरवाज्यावरची पाटी बहुदा जुनीच दिसत
होती. नाव एकदम ठळक अक्षरात लिहिले होते, मी दरवाज्याची घंटी वाजवायची तसदी
घेतली नाही. हलकीशी कढी वाजवली. लगेच दरवाजा उघडलेला आवाज आला.
"काकू नमस्कार, मी निलेश, रत्नागिरी हापूस आंबे, आपलं बोलणं झालं
होतं फोन वर..!!"
"अरे ये बाळ ये, घर सापडला ना लगेच, काही त्रास नाही ना".
"नाही नाही, लगेच सापडलं".
फोन वर आवाज जास्त तरुण होता, पण प्रत्येक्षात काकू बऱ्याच वयस्कर
होत्या. डोक्यात सगळी चांदीच चांदी होती.
पण उच्चार एकदम स्पष्ट (सदाशिव पेठ आहे शेवटी, अपेक्षित होतंच ते).
मी घरात आत आलो. Building बहुतेक, फक्त बाहेरून renewate केली होती.
Hall मध्ये Marble च्या Checkered tiles होत्या, ज्या ९०च्या काळी
फार प्रसिद्ध होत्या. एकाच भिंतीला खिडकी होती, त्यामुळं थोडा अंधार खोलीत जाणवत होता.
फुर्निचर जून होतं, पण सागवान होतं. एक मोठा सोफा , २ खुर्च्या आणि
मध्ये मोठा Teapoy. एका भिंतीवर LED TV निवांत लटकला होता. हॉल मधून जाण्याऱ्या
Passage ला पडदा होता, विशेष म्हणजे त्याचं Pelment पण बहुतेक सागवान होतं. घरानं भोगलेला सूख प्रत्येत गोष्ट ठळक पने सांगत होती.
काकू एक पेला पाणी घेऊन बाहेर आल्या. (पुण्यात पेलाच असतो, इतरवेळी
आम्हाला तांब्याची बघायची सवय).
मी त्यांच्या पाया पडायला वाकलो , "अरे राहूदे".
मी तरीपण पाया पडलो,"औक्षवंत हो".(हा आशीर्वाद माझा साठी
नवा होता).
मी एका खुर्चीत बसलो.
"Box उघडून आंबा दाखवतो".
"अरे पहिला पाणी पी जरा, काही गडबड नाही".
मी त्या बोले पर्यंत बॉक्स उघडून आंबा त्यांच्या समोर Teapoy वर ठेवला.
आंबा हातात घेऊन त्या म्हणाल्या "आंबा सुरेख आहे....!!".
"सुरेख" हा शब्द ऐकून मला कित्येक वर्ष झाली असतील.
"Thank You. तुम्हाला आवडला ना ह्यातच सगळं मिळालं मला".
"ओंकार आहे ना, माझा मुलगा, त्याच्या मित्राने तुझ्या कडून आंबा
घेतला आहे. त्यानेच तुझे नाव सुचवले".
"हल्ली बाजार मध्ये आंबे मिळतात, पण अस्सल रत्नागिरी च्या नवा
खाली दुसराच आंबा दिला जातो".
आमची किरकोळ बोलणी चालू होती. तितक्यात Bell वाजली.
"हे आले असतील". त्यानी गडबडीने दार उघडलं. "हे"
म्हणजे त्याचे "अहो" म्हणजेच "काका" होते. अपेक्षे प्रमाणे, काका एकदम फिट होते. जवळ पास ५,१०" उंची, कलप
केलेले केस, काळा जाड चष्मा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य.
"तुम्ही बसा मी चहा ठेवते"
मी त्यांना नमस्कार केला "मी निलेश, रत्नागिरी हापूस घेऊन आलोय".
"अरे वा , छान छान. फार कौतुक ऐकलंय तुमचं ओंकार च्या मित्रा
कडून".
"तुम्ही कुठे असता, म्हणजे मूळचे इथलेच का..??"
"माझा गाव कोल्हापूर, पुण्यात नोकरी ला असतो".
"तुमची बाग आहे का रत्नागिरीला..??"
"नाहीनाही, माझी बाग वैगेरे काही नाही आहे"
"मग हे आंबे आणि नोकरी कसं काय?"
"चालू आहे आपली धडपड, काही तरी सुचल म्हणून चालू केलंय. रत्नागिरी
मधून आणून सगळी कडे विकतो".
"मी MSEB मध्ये होतो , मागच्या वर्षी निवृत्त झालो, आता निवांत
असतो बघा. आमची Batting inning संपली"
काकांचा स्वभाव एकदम Jolly होता.
"आमचं इथंच खाली एक मेडिकल शॉप आहे, ओंकार बघतो आणि सून बाई जॉब
करते. ती
गेले आता माहेरी थोडे दिवस. नात पण तिच्या बरोबर गेली आहे, ती असती तर आंब्याचं उदघाटन अत्ताच झालं असतं".
तोपर्यंत काकू चहा घेऊन आल्या.
"तुम्ही कुठे कामाला असता ..??"
"अहो तो इथं जॉब ला असतो पुण्यात, मूळचा कोल्हापूर चा आहे",
मी काही बोलण्या आधी काकींनी सांगितलं.
चहा पीत आमचं बोलणं चालू होतं, आंबा आणि त्याचे वेग-वेगळे किस्से रंगले
होते.
कमी वेळात ते Comfort zone मध्ये आले होते.
तोपर्यंत मला एक फोन आला.
"अमेरिकेत आंबा पोच करू शकाल काय म्हणून..!!"
तो त्या दोघांनी पण ऐकला.
"तुम्ही परदेशी पण आंबा पाठवता काय, ..??", काका कुतूहलाने
म्हंटले.
"अजून तर नाही, पण प्रयत्न चालू आहेत. आपली बरीच माणसं म्हणजे
भारतीय लोक परदेशी आहेत आणि आंबा हा प्रत्येकाचा आवडीचा आणि आपुलकीचा विषय. चौकशी बरेच
लोक करत असतात, कारण फक्त आंबा बाहेर मिळतो, पण अस्सल हापूस आंबा मिळत नाही"
मी हसून म्हणालो, "अर्ध पुणे तर अमेरिकेत आहे..!!" (हे वाक्य
मी नको म्हणायला पाहिजे होतं).
ते ऐकून दोघांचे चेहर्या वरचे भाव थोडे बदलले, त्यात स्मितहास्य होतं
पण एक गंभीर छटा आलेली.
"तुमचं कोण आहे का परदेशी, म्हणजे कस जर आंबा बाहेर जायला लागला
तर आताच ऑर्डर fix करतो", मी वातावरण थोडं Normal करण्या साठी बोललो.
"नशीब आमचं, कि आमचं कोणीही परदेशी नाही", काकी एकदम म्हणाल्या.
मला त्यांचा बोलण्यातला स्वर लगेच कळाला, त्यात राग आणि तिरस्कार होता.
मी शांत बसलो होतो.
काकू परत चालू झाल्या, "काय करायचा तो पैसा, आयुष्यात पैसाच म्हणजे
सगळं असतं काय..??".
"माणसांना आणि नात्यांना काही किंमत आहे का नाही,,,, कि फक्त
Foreign-Foreign आणि Foreign....!!"
काका त्यांना सावरत म्हंटले, "आपला मुलगा आहे ना आपल्या जवळ,
तू कशाला BP वाढवून घेतेस".
"आमचे एक पाहुणे आहेत, त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे , घरी आई वडील
एकटेच असतात. वर्षातून एक-दोन महिने त्यांना तो अमेरिकेत बोलावून घेतो, इतर वेळी दोघे
घरीच असतात", काका सांगू लागले.
"ते जोडपं थोडं वयस्कर आहे. मागच्या वर्षी गणेशोत्सव ला त्या
काकांना Heart चा Problem झाला. Checkup नंतर कळलं कि ६०% blockage आहे.
Angeoplasty करावी लागणार होती. त्यांच्या मुलाने अमेरिकेतून फक्त
पैसे पाठवले आणि सांगितलं operation करून घ्या, मला कामाचा Load आहे मी नाही येऊ शकत".
"आम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबत होतो, Medical field मध्ये असल्या
मुलं ओंकार ची खूप मदत झाली. Doctor ,Hospital, औषध इत्यादी सगळं काही त्यानेच बघितलं".
मधेच काकी म्हंटल्या, "काय उपयोग असली मुलं असून...?? जीवाचं
रान करून लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्यांना कर्त्यव्यदक्ष बनवलं, हे असले दिवस बघण्या
साठी".
काकींचे डोळे पाणावले होते. काका तिला सावरत तिज जवळ जाऊन बसले,
"मनाला लावून घेऊ नकोस"
"बाळ तुला हे ऐकायची गरज नाही. पण एक सांगू, तू आमच्या घरी आल्या
आल्या माझा पाया पडलास म्हणून आपुलकीने बोलत आहे".
"तसं काही नाही काकू, तुम्ही हे म्हंटलात हेच खूप आहे माझा साठी",
मी उत्तर दिलं.
"तुला वृद्धाश्रम माहित आहे...??", हा प्रश्न अनपेक्षित
होता.
"हो माहित आहेत ना, पण कधी जाण्याचा योग आला नाही".
"नशीबवान आहेस, कधी वाटलं ना आयुष्यात आपण फार कमावले आहे, एकदा नक्की वृद्धाश्रम ला भेट दे, देवा परी विठू-माउली ला वैकुंठवारी साठी सोडून त्यांची
मुले अज्ञात वासात जातात".
"आमच्या काळी वृद्धाश्रम न्हवती, होती पण ती अनाथ वृद्धां साठी
असलेली वृद्धाश्रम होती, ज्यांचं कोणीही न्हवतं. पण आताची वृद्धाश्रम म्हणजे ज्यांचे
मुलं-मुली सुदृढ कमावती आणि मुख्य म्हणजे जिवंत आहेत पण आई वडील नको झालेत अश्याना
वृद्धांना सांभाळणारी हि वृद्धाश्रम आहेत".
काकूंच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, त्यांनी साडीच्या पदराने डोळे
पुसले आणि तसेच धरून रडू लागल्या.
"अहो हा पाहुण्यांचा आलेला अनुभव फार वाईट होता, त्यांना तर अपेक्षित
न्हवतंच आम्हाला देखील धक्का बसला, जेव्हा त्यांच्या मुलाने अमेरिकेतून येण्यास नकार
दिला आणि फक्त पैसे पाठवले".
"पैसे महत्वाचे आहेतच, मी नाही म्हणत नाही, पण आपल्या माणसांपेक्षा
नाही", काका सांगत होता.
मी फक्त शांत पणे ऐकत होतो, कारण बोलण्या साठी माझ्या कड काहीच न्हवतं.
"एक सांगू बाळ, आपण शिकावं , फार मोठं व्हावं पण आपल्या आई वडिलांना
कधी विसरू नये. फार कष्ट घेतात आईवडील मुलाला मोठा करण्यात”.
“पालकांची काजळी घेता येत नाही म्हणून जिथं ठेवतात ते वृद्धाश्रम,
पण जेव्हा मुलं
पालकांना घरी सोडून कायमचं जातात ते घर सारखं घर राहत नाही, ते पण एक
सजवलेलं वृद्धाश्रम होऊन जातं".
हे वाक्य फार खोल होतं, एकदम विचार करायला लावणारं.
"वृद्धाश्रमात पैसे घेऊन काळजी घेतात, इथं स्वतः पैसे देऊन मोकळे
होतात आणि इतर वेळी काही लागला तर आमच्या सारखी पाहुणे मंडळी आहेतच कि काळजी घ्यायला".
"त्यांचा महिना २ लाख पगार काय कामाचा, जर माझी मुलंच माझा जवळ
नाहीत”.
“मला ना फार बरं वाटतंय, कि आम्ही ओंकार ला जास्त नाही शिकवलं, नाहीतर
तो देखील
गेला असता अमेरिकेला परदेशी आणि आम्ही ह्या आमच्या २bhk फ्लॅट ला वृद्धाश्रम
करून राहिलो असतो".
काकू जे काही बोललेल्या ते मनाला सुन्न करणारं होतं. मला एक वेगळा दृष्टकोन समजला. खरंच आयुष्यात पैसे महत्वाचा आहेत,ती
सत्य परिस्थिती आहे, पण पैसे आपल्या माणसांपेक्षा मोठे नक्कीच नाही.
![]() |
| Money can buy everything, but not Affection: Neil the Story teller |









