My Blog List

Tuesday, 8 October 2019

गृहिणी






एक गृहकर्तव्यदक्ष गृहिणी:

This is how it begins, sorry for my Hand-writing (Only few understand it)

 "Working Women" बद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे.

"२१st Century, Women Empowerment, इत्यादी आज पर्यंत रंगलेले विषय आणि त्यात काही चुकीचं हि नाहीOff course लिहीलं तर पाहिजेच त्यात दुमत नाही . माझं इतकंच म्हणणे आहे, जसं "Working Women", बद्दल कौतुकाने, उत्साहाने, प्रोत्साहने लिहिले जाते, तसेच "एक गृहिणी" बद्दल थोडे फार लिहिले पाहिजे, त्यात माझा मते थोडा दुजाभाव होतो..!!

गृहिणी बद्दल हा छोटासा लेख,,,,!!!

"गृहिणी" आजकाल त्यांना "House-Wife" अशी पदवी/ उपमा देण्यात अली आहे, हि प्रत्येक घरात असते, घरा-घरात असते, पण तिचा अस्तित्व कधी कुणाला जाणवत नाही, तशी तिची इच्छाही नसते. "मी आणि माझा परिवार" इतकाच काय ते तिचं आयुष्य...!!!

कधी विचार केलाय तिच्याही घरच्यांपासून काही अपेक्षा असतील, इतरांच सोडा, तिच्या स्वतः पासून पण काही अपेक्षा असतीलच कि...??? पण परिवारा पुढं सगळं विसरून जाते- ती गृहिणी,
मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचा वर्तमानाची अग्नी देते- ती गृहिणीघरच्यांच्या आनंदा साठी, स्वतःची हौस विसरते- ती गृहिणी......!!!!

तशी उदाहरण बरीच आहेत, पण सांगण्या चा मुद्दा/ हेतू काय, ती जितकं  करते, तेवढं कौतुक/ महत्व (Appreciation- Corporate शद्बकोश) केलं जातं का...???

तिच्या आयुष्यातील फक्त एक दिवस अनुभवा, तिचे कष्ट तुमच्या लक्ष्यात येतील.

दिवसाची सुरवात:

सूर्योदय होण्या आधी "तिचा" दिवस सुरु झालेला असतो. ती नेहमी आणि सातत्याने सूर्योदय च्या आधीच उठतेसूर्याची पहिली किरणे पडण्या आधी "ती" बरीच कामं मार्गी लावते, जसं कि, तिची अंघोळ, व्हरांडाह साफ करणे, देवपुजे साठी फुले वेचणे, देव पूजा करणे, दारातली रांगोळी, तुळशीला पाणी घालणे इत्यादी.

"ती" शक्यततो उगवत्या सूर्याला वंदन करायला कधी चुकत नाही, त्यांची भेट हि ठरलेली, मग तो कोणता हि ऋतू असो.

"ती पाहिलं नातं जपते "शिष्तीचं/ Discipline चं".

घरातील इतर सदस्य उठण्या आधी , कुणाचीही झोप मोड नं करता, ती नाश्ता तयार करते, पण त्या आधी नंबर लागतो देवपुजे चातसं तिचं आणि देवाचा नातं फार जुनं.

ते म्हणतात ना "ती देवा कड काही मागत नाही आणि देव पण तिला कधी कमी पडू देत नाही"

"ती नातं जपते "अध्यात्माचे आणि विश्वासाचे""...!!!

"तिला" छान छान लहान गोंडस मुले आहेत, ज्यांची शाळा सकाळी लौकर असते .
त्यांचा "डबा", ती सर्वात आधी तयार करते. मग एका-एकाला तयार करते. त्यांची आवरा-आवार म्हणजे दात घासणे, अंघोळ, शाळेचे कपडे ईत्यादी. मुलांना ती आवडीने नाश्ता पण भरवते.

"ती नातं जपते " मायेचे""....!!!

मुलं आवारे पर्यंत घरातील मोठे म्हणजेच सासू-सासरे उठलेले असतात . त्यांच्या उठण्या आधीच त्यांचा नास्ता पण तयार झालेला आसतो.
सगळं एकदम, well planned and Systematic.

"ती नातं जपते "आदरा चे "".....!!!

आता वेळ होते तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीची, तीचे "अहो" किंवा "XXX चे बाबा" अर्थात तिचे पतीदेव...!!!
कोणत्याही गृहिणी साठी तिचा संसार हे माहेर नंतरचं दुसरे घर असतं आणि त्या दुसऱ्या घरात पहिली महत्वाची व्यक्ती म्हणजे "नवरा", तिचं लग्न नंतरचं आयुष्य त्याच्या भावतीच असतं.

" त्यांची असते एकमेकांशी गाठ, चांगल्या वाईट समई सर्वांग साथ".

तो उठायच्या आधी ती सगळं घर आवरून घेते. काही नवरदेव सकाळी फिरायला (Morning walk) ला जातात आणि त्यातले फारच मोजके त्यांच्या बायकोला देखील बरोबर घेऊन जातात.

I personally respect such people as they don’t just care for their own health, but also make sure their better half is also better, healthy & fit.

ती त्याला कामावर जाण्या आधी नाश्ता देते आणि घरातून निघण्या आधी दुपारचा डबा देखील देते.

"त्याच बरोबर ती नातं जपते "प्रेमा चे ""....!!!!

शक्यततो हा दिनक्रम सर्वांना माहीत असतो कारण आपण त्या वेळी घरी हजर असतो.
"घरकाम" इतकच असतं, असा बऱ्याच  "जणांचा" गैरसजम आहेखरा दिवस तर इथून पुढे चालू होतो...!!!!
घरातून सगळे बाहेर पडले कि "तिच्या" समोर बरीच कामं असतातनाश्ता अटापटाच वेळ होते दुपारच्या जेवणाचीजेवण आटपून पुढची कामं म्हणजे कपडे धुणे (सगळ्या च गृहिणींच्या नशिबात कपडे धुणारी बाई नसते.....:))

आणि  एक गैरसमज, घरी "Washing machine" आहे म्हणजे कपडे नुसते त्यातले टाकले कि काम झालं.

पण मुळात पहिले कपडे भिजवून , चोळून , पिळावी लागतात. Washing Machine ते बाहेर कपडे वाळत घातलेली दोरीचा प्रवास हा Gym मधल्या Weight Lifting एवढाच अवघड असतो.
Washing Machine असलं तरी, there are efforts to be taken.

कपडे संपे पर्यंत वेळ होते दुपारच्या जेवणाची. घर म्हणजे "गृहिणी" चा "Workplace" आणि ते तिला कसं Clean and tidy लागतंअख्ख घर लोटून पुसायचं म्हणजे कंबर कामातून जाते. (सगळ्याच गृहिणींच्या नशिबात घरकामाला बाई नसते......☺)

आणि एक गैरसमज "घरकामाला, धुणे-भांडी आणि फरशी पुसायला कामवाली बाई आहे म्हणजे घरी काहीच काम नसतं"- अतिशय चुक, असं मुळीच नस्त हे लक्ष्यात घ्या.....!!!!!

घर कामाला जरी बाई असली, तरी तिच्या समोर थांबून हे सर्व करून घ्याल लागत. हे संपे पर्यंत अर्धा दिवस तर बघता-बघता निघून जातो.

"Power Nap " हि संकल्पना बहुतेक "गृहिणी" वरून अली असावी, कारण तिला मनसोक्त अशी झोप मिळतच नाही, तिच्या आणि निद्रा देवीचं कधी जमत नाही. थोडा वेळ मिळाला तर ती थोडी झोप घेते किंवा काल -पाहिलेले "Daily Soap" बघून घेते. (Remote चा control मिळाला तर-Conditions apply).

संध्याकाळ ची चाहूल लगे पर्यंत मुलांचा शाळेतून परतीचा प्रवास चालू झालेला असतो.
थोड निवांत पणे ती "दोन घोट" स्वतःच केलेल्या "चहा" चा अस्वाद घेते.

थोड्याच वेळात मुलं घरी येतात, आल्या आल्या घरात त्यांचा किलबिलाट चालू होतो. 
ती त्यांना आवरून घेते आणि थोडी फार न्याहारी देते. मिळेल त्या वेळेत तिला मुलांचा अभ्यास हि घायचा असतोआणि एक गैरसमज, "खाजगी शकवणी (Class) ला घातलं म्हणजे आपलं कर्तव्य संपल...!!!". असं कधीच होत नाहीजरी Class लावला असला तरी, "ती" स्वतः त्यांचा -चुकता अभ्यास घेते.

एक जुनी "TAG LINE" होती, "अडाणी आई, घर वाया जाई".
वाक्यात सत्य आहे, पण अर्ध.

माझा मते, आई चं शिक्षण महत्वाच नसतं, कारण ती अभ्यास शिकवत नाही , ती शिकवते "संस्कार".
मुलांच्या "व्यक्तिमत्वात/ Personality" घडवण्यात "तिचा" सगळ्यात जास्त प्रभाव असतो.

तोपर्यंत "तिचा" "तो " म्हणजेच "नवरा" देखील घरी येतो. त्याला हसतमुखाने "ती" स्वागत करते.
त्याच्या आवरायचा आत त्यात हातात गरम चहाचा कप देखील देते.

हे सगळं होई पर्यंत , सूर्याची duty देखील संपते, पण "तिची" अजून चालूच असते.
वेळ झालेली असते रात्रीच्या जवणाची- Dinner.
"गृहिणी " साठी एक पेच-प्रसंग, तिला जेवणात सर्वांची "आवड-निवड/ Choice " लक्ष्यात ठेवावी लागतेघरी सर्वांना काय आवडते तेच बनविले जाते आणि "ती" हि कधी जेवणाच्या "Choice"बद्दल अट्टाहास करत नाही, कारण "तिचा आनंद तिच्या कुटुंबात असतो".

आणि एक गैरसमज- "रात्री जेवण झालं म्हणजे "गृहिणी"च्या दिवस संपला.....!!!!!"
"Kitchen कट्टा आवरणे" कधी ऐकलं आहे का...??? नसला तर एकदा अनुभवा . कमीत कमी ३० मिनिट जातात ह्या कामात.

चांदो-मामा उगवतो, तरी देखील "ती" जागी असते. शक्यतो मुलांना झोपताना बाबांपेक्षा आई लागते.
त्यांना छान छान गोष्टी सांगून ती झोपवते.

तशी "ती" स्वतःहून कधी काही मागत नाही, पण तिच्या हि नवऱ्या कडून काही अपेक्षा असतात.
दिवस कसा गेला हे सांगावा, त्याच्या कडून हि थोडा ऐकावं ,,,,,म्हणतात ना "Quality-Time & Quality -Conversation".

पण फार कमी "गृहिणी" ना हे नशिबात असतं.  "तिला " सांगून काय फायदा, असा विचार बरेच नवरे करतात, Technically ते बरोबर देखील आहे, कारण ती "Technical" उत्तर/ उपाय नाही देऊ शकत, पण अश्या दैनंदिन गोष्टी Share केल्याने विश्वास वाढतो आणि मुख्य म्हणजे नातं घट्ट आणि अतूट होतं

घरात सगळ्यात पहिला उठते आणि सर्वात शेवटी झोपते ती म्हणजे "गृहिणी".

हा जो आपण पहिला हा तिचा दैनंदिन दिनक्रम, मग ह्यात आधी मढी येतात ते सण-त्योहार, लग्न समारंभ, संकष्टी-पौर्णिमा-एकादशी, दिवाळी,दसरा , घरच्यांचे वाढदिवस ,,,,,,,इत्यादी. हे सर्व देखील ती दररोज ची कामं सांभाळून करते .

मला "Working women" बद्दल हि तितकाच आदर आहे, "Corporate job" चं tension काही औरच असतं, "Its not everyone’s cup of tea”, अगदी तश्या आणि त्याच प्रमाणे एक गृहिणी देखील तितकेच किंवा त्या पेक्षा जास्त कष्ट घेते, पण मोबदला "शून्य", कारण ती एक गृहिणी आहे- "Taken for Granted".
कधी विचार किंवा Observe केलं आहे का, "एके गृहिणी
 चा दिवसातला जास्तीत जास्त वेळ हा Kitchen मध्ये जातो आणि तोच देखील "उभे राहून",,,,,!!!!
घरात सगळ्यात पहिला उठते आणि सर्वात शेवटी झोपते ती म्हणजे "गृहिणी".
एक दिवस तिला अख्खा दिवस साथ देऊन पहा, तिचे कष्ट लक्ष्यात येतील.
I have been in the corporate world business, its an hourly business. An individual is busy or loaded Maximum upo 75-80% & that too to quite often.

Simple funda, “काम खतम” & your free to go. But that isn’t the case with a “House-wife”, her role, duties & responsibilities are freezed right on the day she is married & they remain with there for her entire life. When people are overloaded with duties or work on similar projects again and again, what do they do,,,,,,,They Switch jobs…!!!
But house-wives duties go on increasing day by day without any remuneration & they don’t have an option to quit or switch job. They don’t even have medical leaves nor they have paid leaves , as a matter of fact they don’t have any kind of leaves,,,,,,,,Sad but True…!!!

Working women आणि "गृहिणी" दोन्ही वेग-वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या आहेत.

Just because “Working women” earn money & a “House-wife” doesn't , it should never be interpreted or portrayed, that a “House-Wife” is less important.

तिचे कष्ट ती तितकेच महत्वाचे असतात.....!!!!!

कारण She is the Missing Link. ती एककूटूंबाला जोडते, वेगवेगळ्या धाग्यांनी , जी असतात, मायेची, शिष्तीची , आपुलकीची , आदराची संस्काराची आणि प्रेमाची....!!!!

ती प्रेमाची सावली, आपुलकीची माउली,
देई अपलं  सर्वस्व कुटंब पायी अर्पूनि,
ती एक गृहिणी, ती एक गृहिणी.




SAD BUT TRUE
  
ROUTINE FOR HOUSEWIVES