| THE 20 YEAR OLD MEMORY |
आठवणी / Memories असं काहीतरी Catchy नाव ठेवायचं
होतं , पण म्हंटलं आठवण "Old School" मग नाव पण "Old School
type" असावं.
आठवणींचा डब्बा: I
प्रत्येकाच्या आयुष्यात "आठवणींना" फार फार महत्व असतं आणि असतं म्हणजे असतंच.
काही उघडपणे दाखवतात / सांगतात, तर काही एकांतात त्यात रमतात.
काही आठवणी मनातून जातात आणि काही मनात कायमचं घर करून बसतात.
आठवण काहीही असूशकते,:
एखादी घटना (VERY COMMON)
एखादा क्षण (रसिक लोकांना ह्या जरा जास्त)
एखादी व्यक्ती (अपवाद नाही- सर्वात जास्त जपून ठेवलेलं Secret- पण शक्यतो एकांतात रमणारं असतं)
एखादी वस्तू.
मजा तर तेव्हा येते, जेव्हा ती आठवण आठवल्यास तो क्षण डोळ्या समोर जिवंत होतो,
We live
it once again.
एखादी आठवण कधी , कुठे आणि कशी समोर येईल काही सांगता येत नाही.
आणि जेव्हा ती येते, Its like Nuclear Chain reaction, एका मागून एक, एका मागून एक नुसता Flashback.
उचकी लागली कि म्हणतात कोणीतरी आठवण काढत असते,
झोप न लागणे म्हणजे दुसऱ्याच्या स्वप्नात जागे आहोत,
असं खरंच असेल का,,,,,???
उचकी लागली कि म्हणतात कोणीतरी आठवण काढत असते,
झोप न लागणे म्हणजे दुसऱ्याच्या स्वप्नात जागे आहोत,
असं खरंच असेल का,,,,,???
| उचकी: आठवणींच्या खेळामधला एक अविभाज्य घटक...❤❤❤ |
![]() |
| छोटी सी बात- Sometime the Smallest thing takes the biggest place in Heart |
आठवणींचा डब्बा: II
महिन्यातून एकदा साफ सफाई.
Space
Management कधीच मला जमलं नाही, त्यावर शक्यतो बायकांचं राज्य असतं.
नीलम माझी बायको, तिला सगळं एकदम व्यवस्तीत लागतं , जिथलं तिथं.
माझं असतं "एकदा फेकलं कि उचले पर्यंत तिथंच".☺☺
एकदा कपाट साफ करताना एक बॉक्स सापडला. तसं प्रत्येकाला कशात काय आहे हे माहित असतं, मी नीलम ला बॉक्स उघडायला लावला.
बॉक्स मध्ये बऱ्याच गोष्टी होत्या:
१. माझं शाळेतलं I-Card,
२. १२वी च्या परीक्षे चं हॉल तिकीट,
३. Newcastle मधलं पाहिलं बस तिकीट,
४. शाळेतली छोटी स्लॅम बुक,
५. १० च्या पेपर ला वापरलेला मोती कलर चा "HERO" पेन,
६. CBZ ची Original किल्ली,
आणि बरंच काही.
मी प्रत्येक वस्तू बघून, तिची आठवण नीलम ला सांगत होतो.
माझं लक्ष्य बॉक्स च्या आत आणि एक छोटा बॉक्स होता, त्यावर गेलं.
मी तो उघडला, तर त्यात मी साठवलेल्या "Currency- नोटा" होत्या.
एक एक नोट मी बघू लागलो, त्यात बरेच चिल्लर देखील होते.
हा Pound , हा cent , हा dollar , हा दिनार,,, एक एक नाणं आम्ही बघत होतो.
त्यात आपले भारतीय चलन पण होते. ५-१०-२५-५० ची नाणी, १-२-५-१०-२०-५०-१०० च्या जुन्या नोटा.
नीलम ला त्यात ५० पैसे सापडले, "हे कसलं नाणं आहे, असं का झालं आहे हे"
मी तो निरखून बघितला आणि माझा समोर तो क्षण उभा राहिला.
"रेल्वे खाली सपाट झालेलं ५० पैश्याचं नाणं"
आठवणींचा डब्बा: III
शाळा आयुष्यातिल सर्वात निरागस काळ. शाळेत असताना प्रत्येकाचा एक आवडता गट असतो,
तसा माझा पण होता. तेव्हा शाळा पण कमी होत्या आणि वर्गात मुलं ही.
शाळेच्या जवळपास सगळ्यांची घर असायची. शाळा- ते घर आणि घर- ते शाळा हा दररोज चा दिनक्रम.
शाळे बाहेर जग असतं, हे तेव्हा माहितीचं नसतं.
आयुष्य छोटं पण सुखी असतं, दुनियादारी पासून अलिप्त.
Very
often, Bench partner is the best friend in the class.
माझा बेंच पार्टनर "विराज पाटील". विऱ्या माझा LKG पासून चा मित्र, आम्ही LKG ते Engineering एकत्र,
" अपना बॉण्ड ही अलग हे".❤❤
आम्ही सगळी एकमेकांच्या घरी नेहमी खेळायला जायचो.
विऱ्याचं घर एकदम मोठं -वाडाच जणू. भल मोठं आंगण आणि भरपूर झाडे.
खेळायला मज्जाच मज्जा यायची.
विऱ्या च्या घराची आणखी एक गोष्ट "Location", बरोबर रेल्वे रुळा समोर.
तेव्हा ना रेल्वे crossing होतं, ना फाटक, ना पूल.
अख्या भारताचा आवडता खेळ "क्रिकेट", आम्ही पण तोच खेळत खेळात मोठे झालो.
क्रिकेट संपला की , आंब्यांच्या झाडावर "सूर-पारंब्या", मग पत्ते , कार्टून नेटवर्क वर "Swat-Cats", सगळं काही ठरलेलं.
हे सगळं करून घरच्यांचं लक्ष्य चुकवून आम्ही रेल्वे रुळावर दगड ठेवायचो, दगडाचा एका क्षणात बुक्काच.
त्या वेळी किशात जेमतेम १-२ रुपये असायचे , खरतर कधी गरज पण भासली नाही,
बहुतेक तेव्हा सोनं , जमिनी आणि वेळ पण एकदम स्वस्त होता.
Those days’
people had less money but they valued their relations, what do we have now..??
आमच्या कड ५० पैश्यांचं नाणं होतं, आम्ही त्याची आहुती द्यायचं ठरवलं.
त्याला थेट रेल्वे रुळावर ठेवलं. रेल्वेच्या चाकाखाली नक्की होतंय काय, नेमकं हे माहित नव्हतं आणि त्या वयात उत्सुकता जरा जास्तच असते.
नाणं ठेवलं आणि आम्ही झुडपात लपून बसलो.
१-२ चाकातच नाणं उडालं. बऱ्याच शोधा-शोधी नंतर ते सापडलं.
नाणं एकदम सपाट झालं होतं.
ते नाणं घरातल्या बॉक्स मध्ये बघून सगळं Flashback डोळ्यांसमोर आला.
२०२० असतं तर Slow-Motion मध्ये recording केला असतं आम्ही,
पण ती आठवण आज ही, मनात आहे तशीच आहे, त्याला ना कॅमेरा लागतो ना मोबाईल.
More than
20 years, but dint even took 20 seconds & I re-lived the entire moment
again.
ते म्हणतात ना, सर्वात चंचल/ हळवी गोष्ट म्हणजे "मन", ते बऱ्याचदा अश्या अनेक आठवणी आपल्या कळत नकळत मनात साठवून ठेवत.
काही आठवणी ह्या ठळक पणे लक्ष्यात राहतात:
१. पहिल्या बाईक ची पहिली फेरी
२. मामा झालो तो क्षण
३. Engineering ला शेवटचा राऊंड ला admission
४. Football match ला last minute goal
५. कार ला लावलेला पहिलं १२० चं स्पीड
आणि बरंच काही.
ह्या झाल्या ठळक आठवणी ज्या कायम स्वरूपी आपल्या बरोबर असतात,
पण अश्या बऱ्याच आठवणी असतात ज्या आपल्या लक्षात देखील नसतात,
ते काय ते असतं ना "subconscious
mind", हा त्याचा खेळ, बरीच जादू असते त्याच्या कडे.
कधी कधी एखादा आवाज, सुगंध, नुसतं "हॅलो" म्हणायची शैली देखील एका व्यक्ती ची मनात साठवलेली आठवण आणून देते.❤❤
पण सर्वात महत्वाचं काय, आठवणी तयार करण्या साठी त्या जगाव्या लागतात.
You have
to enjoy your today, “the present moment”, so tomorrow you can recall & say,
“Those were the days”.
"स्वतः तर जगाचं , पण इतरांच्या आयुष्यात एक आठवण म्हणून पण जगा, उसमे Kick हे"
आणि राहिला आमचा विषय, "Like I always say,
I help people create memories”
| 1999-2020- The 2 Musketeers |
मग , काय आहे तुमची अशी एखादी आठवण ,,,,???
NEIL-THE-STORY-TELLER

