My Blog List

Sunday, 2 February 2025

सुप्रिया पिळगावकर: The North Star

सुप्रिया पिळगावकर: The North Star


Then & Now (Photo Credit Supriya Pilgaonkar Insta account)

तरुणपण एक उत्साह,

तरुणपण एक निरागसपणा,

तरुणपण एक नशा,

तरुणपण एक छंद,

तरुणपण एक जिद्द,

तरुणपण एक शिस्त,

तारूपं एक वेड,

तरुणपण एक आवड,

तरुणपण एक निखळ प्रेम,

तरुणपण एक चेहरा,

तरुणपण एक आठवण,

तरुणपण एक व्यक्ती......!!!


आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट TV होता, पण केबल न्हवती.

कार्यक्रम पण तशे ठराविकच होते. 

मी शाळेत, आठवी मध्ये आमच्या घरी कलर TV आला.

अक्खी चाळ TV बघायला आली होती. २१ इंची Sony Trinitron. 

सपाट TV कसा असतो ह्याचे कौतुक. 

प्रत्येक रविवारी गाण्यांचा कार्यक्रम असायचा "चित्रहार" आणि "छायागीत". 

नव नवीन सिनेमांची गाणी त्यावर लागायची आणि कधी कधी सिनेमाही. 


त्याच TV वर तिला मी पहिल्यांदा बाहीतले.

उभा चेहरा,

कुरळे केस,

एका गालावर किंचितशी खळी,

दाट भुवया,

बोलके पाणीदार डोळे,

चटपटीत आवाज.

मिश्किल स्वभाव....!!!!

माझी आवडती नटी, "सुप्रिया". 


जसं जसं वय वाढत गेलं, बरेच नवनवीन हिरो-हेरॉईन थोडक्यात नवे चेहरे येऊ लागले,

पण आमची गाडी तिथेच होती.

म्हणतात ना "पहिला क्रश" (क्रश ला मराठी मध्ये काय म्हणतात, मला तर नाही महित) नेहमी लक्ष्यात राहतो.

तसाच तिचा चेहरा कुठे तर माझा मनावर छापला गेला होता.


Time-Lapse:२५ - ३० वर्षांनी: सध्या २०२५


सुप्रिया चा प्रवास चालूच होता आणि आमचा ही. 

बऱ्याच वर्षांनी तिचा नवीन सिनेमा आला,"नवरा माझा नवसाचा-२".


मी तिला परत पाहत होतो,

जुन्या आठवणी जागा झाल्या.

पण ती आता तरुण राहिली न्हवती.

चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या,

केस आता मागे गेले होते,

डोळे अजूनही बोलकेच आहेत, पण डोळ्या खाली सुरकुत्या दिसू लागल्या होत्या,

दाट भुवया आता पातळ झाल्या होत्या,

आवाज हि थोडा, शांत शांत झाला होता.


पण अजूनपण ती मला तितकीच आवडते, ह्यात काडी मात्र हि शंका नाही.

बघण्यात आणि दिसण्यात फरक पडला असेल पण नातं आणि आपुलकी तीच आहे. 

Now that she has grown I mean aged she doesn't look the same, But I still like her.

My looks might have changed but the affection is the same.

But at the same time, I have grown has well...!!


एक गोष्ट माझा लक्षात अली, जशी सुप्रिया वयस्कर झाली आहे, मी तर कुठे लहान राहिलो आहे.

तेव्हाची सुप्रिया आणि आताची सुप्रिया ह्यात फरक आहे,

तसंच मी तेव्हाचा मी आणि आताचा मी ह्यात पण बराच फरक आहे.

पण साम्य आहे ते म्हणजे, प्रेम, आपुलकी आणि न तुटलेलं नातं.


सांगण्याचे तात्पर्य काय आहे:

वेळ हि बदलत असते, वेळा बरोबर आपल्या भवतीचे लोक देखील बदलतात,

(बदल म्हणजे दिसण्यात बदल), पण त्यांच्या बरोबर असलेली नाती, प्रेम आणि आपुलकी कधीच बदलत नाही.

इथे आपण सुप्रिया बद्दल बोलत नाही, सुप्रिया सारखेच आपल्या ओळखीच्या अश्या बऱ्याच व्यक्ती पण असतात ज्या आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक असतात.

आपल्या बरोबर त्यांचे आयुष्य देखील तितकेच बदलले असते, पण तुम्ही एकमेकांचे "साक्षीदार" असता.

Those are the Witnessers in your journey, as in "Partners in Crime".

These are people, who we admire irrelevant of there age and those are constant. 

Who change with time physically, but the attachment is the same.

Coz they have been there ever since.

I fondly address them as "NORTH STAR", they are the symbol of guidance and direction.

Have such people in your BUSY LIFE & dont let them go at ANY COST,

Coz they have been there ever since.

We might not see them everyday, but we know that they, WERE there , they ARE there & they will ALWAYS be there, to guide you through the dark i.e. the toughest times or situations or even People.

Me then who Liked Supriya,  Me Now who Still Likes Supriya...!!!

Few Quotes on North Star: