सकाळी चहा चा कप देणे म्हणजे प्रेम,
बेडरूम मधले अंथरून काढणे म्हणजे पण प्रेम,
दारात रांगोळी काढणे म्हणजे प्रेम,
आठवड्यातून एकदा घर साफ करण्यात तिची मदत म्हणजे पण प्रेम.
मुलांना शाळेत आवरून पाठवणे म्हणजे प्रेम,
रात्री मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे पण प्रेम,
पाहुण्यांसमोर अहो-जाओ करणे म्हणजे प्रेम,
एकांतात अरे-तुरे करणे म्हणजे पण प्रेम,
कामावर जाताना डबा देणे म्हणजे प्रेम,
डबा घेताना "येतो" म्हणणे म्हणजे पण प्रेम,
आवडती भाजी नसली तर हळूच डब्यात लोणचे देणे म्हणजे प्रेम,
जेवणात कधी कधी मीठ कमी असले, तरी आवडीने खाणे म्हणजे पण प्रेम,
कामावर पोहोचलास कि मेसेज कर असं म्हणणे म्हणजे प्रेम,
तो कामात व्यस्त असला तरी जेवला काय चौकशी करणे म्हणजे पण प्रेम,
घरी आल्यावर खिडकीतून हळूच बघणे म्हणजे प्रेम,
डबा, रुमाल, पाकीट, बॅग जागच्या जागी ठेवणे म्हणजे पण प्रेम,
आवडीने जेवण करणे म्हणजे प्रेम,
ती जेवण करताना, कट्ट्यावर बसून गप्पा मारणे म्हणजे पण प्रेम,
महालक्ष्मी मंदिरात गणपती मंदिर मध्ये कुंकूंची स्वतः ला टिकली लावून, त्याच चिमटीतून त्याला टिळा लावून म्हणजे प्रेम,
मंदिरात आपल्याबरोबर, तिचे पण चप्पल देखील, चप्पल उचलून स्टॅन्ड मध्ये ठेवणे म्हणजे प्रेम,
त्याची आवडती भाजी करणे म्हणजे प्रेम,
भाजी आणायला गेल्यावर, भाजीची पिशवी धरणे म्हणजे पण प्रेम,
त्याला आवडणारी साडी नेसणे म्हणजे प्रेम,
कधीतरी एकदा, तिला आवडता गजरा आणणे म्हणजे पण प्रेम,
रंकाळ्यावर बसून काहीच न बोलता, सगळं काही बोलणे म्हणजे प्रेम,
आरतीच्या ताटातला कापूर संपण्या आधी, कापूराची वडी देणे म्हणजे पण प्रेम,
सासू सासऱ्यांची तब्येतीची काळजी घेणे म्हणजे प्रेम,
सासर सोबत महेर सांभाळणे म्हणजे पण प्रेम.
अश्या असंख्या गोष्टी आहेत, ज्या सांगता येत नाही, समजून घ्याव्या लागतात.
प्रेमाला व्याख्या नाही, त्याला मोजमाप नाही.
प्रेम एका छोट्या गोष्टीतून देखील दिसते.
पू ल देशपांडे यांचे फार छान वाक्य आहे, संस्कार हे चप्पल दारात कशे ठेवता त्यावरून पण कळतात,
अगदी तसेच, प्रेम हे डोळ्यात बघून, न बोलता पण, व्यक्त करता येते.
म्हणतात ना एका संभाषणाला दोनच गोष्टी लागतात,
एक सांगणारा आणि एक ऐकणारा.
तसेच एका नात्याला आणि प्रेमाला दोनच गोष्टी लागतात,
एक प्रेम करणारा आणि दुसरा प्रेम जपणारा.
अशी बरेच व्यक्ती आणि वल्ली आहेत, जे न बोलून सर्व काही निभावतात,
मोबल्याची अपेक्षा नाही, इतरांना देण्यात मोज माप नाही,
आहे तर आहे, आपलं असंच आहे,
अश्या सर्वाना समर्पित.
तुम्हारे थे,
तुम्हारे हे,
तुम्हारे ही रहेगे हम...!!
लग्नानंतर चा वॅलेंटाईन...!!!!
![]() |
| किरकोळ मध्ये वॅलेंटाईन बरोबर विषय...!!! |
