My Blog List

Friday, 19 July 2019

५५९०: एक स्मित हास्य





लोक/ व्यक्ती/ माणसं: आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक.
दररोजच्या दिनक्रमात आपण बऱ्याच भिन्न-भिन्न लोकांना भेटतो.
प्रत्येकाची आयुष्याशी लढाई चालूच असते.
"आयुष्यात सर्व-सुखी आणि संतुष्ट असं कोणीच नाही",
फक्त काही ते दाखवतात आणि काही ते लपवतात.
हे छोटं लेखन अश्या सर्वां साठी.

हे मला लिहू वाटलं, त्याला कारण माझा बरोबर घडलेला एक प्रसंग.
आमचा घरचा Transport चा व्यवसाय. मागच्या वर्षी ह्याच वेळेला, आमच्या ट्रक चा भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता, कि ट्रक चं केबिन तुटून पडलं होतं, काही म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नाही.
फक्त नशीब बलवत्तर म्हणून ड्राइवर थोडक्यात वाचला.
ट्रक चा एक आणि एक भागाचा चुररा झाला होता.
नुकसान दुरुस्ती पलीकडे झाले होते,  It was Total Loss.
ट्रक भंगार वाला घेऊन गेला.
ट्रक म्हणजे आम्हाला आमच्या घरच्या सदस्य सारखा आहे आणि त्याची ती विद्रुप अवस्था मला बघवत न्हवती. पण व्यवसाय म्हंटलं कि हे सगळं आलंच.
वर्ष सरलं, आम्ही त्या धक्क्यातून हळू हळू सावरलो.
एक दिवस मी आणि मम्मी काही कामा निम्मित बाहेर जात होतो.

आणि अचानक एका वळणावर "तो" दिसला.
माझा छातीत एकदम धस्स झालं, एक ठोका बहुतेक चुकला असावा.
"तो", दिमाखात उभा होता, तेच रूप, तोच थाट, तीच शान, तो होता माझा ट्रक-MH०९-५५९०.
मला दुसऱ्याच क्षणात आटवलं, त्याचा झालेला अपघात आणि त्याची ती वाईट परिस्थिती.
पण आता समोर होता तो नव्याने उभारलेला, नव्या जोश मध्ये, नव्या चेहऱ्याचा "५५९०".
जुनं रूप आठवून जे माझं मन सुन्न झालेलं, ते आता सध्याची स्थिती पाहून प्रफुल्लित झालं.
"आपलाच ५५९० आहे, मी आलोच", मी  गाडीतून उतरलो आणि दोन क्षण त्याच्या समोर  थांबलो आणि त्याला स्पर्श केला.
तो आता माझा नव्हता पण आमचं नातं अजूनही अबाधित होतं.



CONNECTIONS ARE MADE WITH HEART NOT WITH TONGUE.

मी गाडीत येऊन बसलो, "आपलाच आहे, तयार केलाय त्याला परत".
मम्मी पण एकदम नि:शब्दपणे त्याला बघत होती. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं.
"अगं रडायला काय झालं..!!".
"बऱ्याच कष्टानं घेतलेला रे हा ट्रक आपण, अपघात झाला तेव्हा फार वाईट वाटलं मला".
"मुला सारखा जपला आपण त्याला आणि त्याचा एकदम कचरा झाला त्या अपघातात".
"म्हणून देऊन टाकलं त्याला आपण, पण आता परत त्याचं, आहे तसं जुनं रूप बघून, मन भरून आलं".

ते शब्द ऐकून कळलं, नातं काय असतं, ते माणसा पुरतं मर्यादित राहत नाही, ते त्या पलीकडे असते.

मला असाच एक विचार आला, जो काल पर्यंत संपूर्णपणे तुटलेला एक ट्रक, जर आज परत उभारू शकतो, 
तर अशी कित्येक तुटलेली माणसं देखील आहेत, जी एखाद्या घटना/ नियतीचा आघात/ वाईट अनुभव अश्या बऱ्याच कारणांमुळं खचली होती आणि ती परत पुनर्संचयित (Restore) झाली असतील/ आहेत.

जुन्याच नवं केलेलं कळतं, थोडा फार समजूनही  येतं, पण कधी बिखरलेली व्यक्ती परत एकजूट झाली कि ओळखता येणं फारचं कठीण.




५५९० माझा साठी एक नवी उमंग आहे, कधी वाटलं कि आयुष्याची नाव ह्या अथांग समुद्रात भरकटत आहे, मी ५५९० ला आठवतो. शून्यातून जसा तो परत उभा होता, तो एक आदर्श उद्धरण होता.

माझा साठी ५५९० एक प्रतीक आहे, तुटलेल्या/ नियतीपुढं हरलेल्या व्यक्तींचं,
जी एका घटने मूळ, ती काही हि असेल, जसं कि:
एखादा जीव घेणा अपघात,  एखादा चुकलेला निर्णय,  एखादी व्यक्ती आयुष्यातून हरपणे….!!!
किंवा एखादा छोटा प्रसंग असेल, जसं कि आपल्या एखाद्या माणसा बरोबर झालेलं भांडण, घरगुती तंटे, नात्यात दुरावा , कामाचा तणाव इत्यादी.
अशी बरीच कारणे आहेत, ज्या मुळे कित्येक माणसं निराश (Depression) होतात.
त्यातून सावर्ण हे देखील कठीण असतं, कधी कधी तो "एकेरि मार्ग" असतो.
पण अश्या परिस्थितींवर मात करून जे बाहेर येतात ती खरी प्रबळ माणसं म्हणावी लागतील.

हे बोलणं जितकं सोपं, तेवढंच ते अमलात आणणं त्याहून कठीण.
मला हे पण मान्य आहे मी जे उधाहरण देत आहे ते एका "ट्रक" चं आहे, Its a Machine, ते यंत्र आहे, तो  सजीव नाही, पण ह्याचं तात्पर्य किंवा बोध काय, ते म्हणतात ना,

"पतझड़ के बाद ही आते हैं दिन बहार के, जीना क्या है जीवन से हार के".

"पावसा नंतरच इंद्रधनुष्य दिसतो."














अश्या कठोर परिस्थिती, व्यक्तिमत्व" बनवतात आणि कालांतराने फक्त तीच आपल्याबरोबर राहते.
तात्पर्य काय, जर तुम्ही अश्या परिस्थिती मध्ये सापडला, तर स्वतः वर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं
"चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य ठेवा".





Friday, 12 July 2019

गुलमोहर_भाग- ५: One-Way-Ticket


Sometimes all it takes is a Promise - Neil-The-Story-Teller


प्रेम कथा पुढे चालू राहिली.
मोबाईल चा खाजगी आयुष्यात नुकताच प्रवेश झाला होता.
Calling महाग असलं तरी संपर्क त्वरित होत होता.
तेजू ला घरातनं मोबाईल फोन मिळाला, पण RD अजुनपण Landline जिंदाबाद.
त्याला घरचे पण म्हंटले मोबाईल घे पण RD चं "नाही म्हणजे नाही".
हॉस्टेल च्या लँडलाइन वर बोलण्यात त्याला जास्त आनंद होता.
पण हा , त्याच्या Room-mate कड फोन होता, तो Emergency ला लागला तर Back-up म्हणून होता.
दोघे नेहमी एकत्र असायचे, वेळ कळत न कळत सरत होता. 
त्यांनी भविष्याबद्दल कधीही चर्चा केली नाही, त्यांना माहित होतं कि ते अनिश्चित आहे, ते फक्त आज चा आनंद घेत होते.
RD चा पुढे शिकण्याचा प्लॅन होता, पण तो घरच्यांच्या निर्णयावर अवलंबून होता.
तेजू ने आधीच GRE चे Classes चालू केले होते, तिचं US ला MS ठरलं होतं.

त्यांच हे कॉलेज चं शेवटचं वर्ष होतं. RD ला चिंता परीक्षेची न्हवती, परीक्षे नंतर ची होती. 
त्या दोघांना हि पुढं काय वाढून ठेवलंय हे माहित नव्हतं.
Engineering संपलं कि depressing दिवस असतात.
आयुष्यातला ४ वर्षांचा सुवर्ण काळ संपलेला असतो पुढे असते "वास्तव".
Engineering lasts only for 4 years, but the memories last forever.
RD आणि तेजू कड अश्या बऱ्याच आठवणी होत्या.


परीक्षेनंतर सर्व विद्यार्थी त्यांच्या गावी गेले, तसा RD पण गेला. 
RD जेव्हा त्याच्या गावी असायचा, तो एकदम अलिप्त असायचा, जगाशी काही देणं-घेणं नाही, फक्त मी आणि माझे आई-वडील, शेती आणि जनावरं.
तो शेतीला थोडा हात-भार लावत असे.
ह्या वेळी मात्र, तो गावी असून पण त्याला तेजू ची आठवत येत होती . तो तिला आठवड्यातून एकदोन वेळा फोन करायचा.
एकदा तेजू म्हंटली, "परत कधी येणार आहेस इकडे..??"
"Result आहे १-२ आठवड्या , तेव्हा येईन".
"उद्या येशील please, मला तुझी फार आठवण येत आहे रे..!!"
RD ला तिच्या आवाजात काहीतरी जाणवलं.
"काय झालं, घरी काही अडचण..??"
"नाही रे, सगळं ठीक आहे, फक्त तू भेट ना, तुला बघून फार दिवस झाले".
"तुझ्या मिठीत मला हरवायचं आहे, फार आठवण  येत आहे..!!"
"काय झालं बाळ, एकदम असं का मधनंच..??"
"तू ये मग सांगते, येणार ना..?".
"तुमने बुलाया और हम चले आये,,, आलोच,,!!"
"बर मला फक्त याच्या आधी सांग, मी भेटायचं प्लॅन करते, OK".
"चालतंय कि, तु म्हणशील तसं".
४-५ दिवसांनी RD, शहरात पोचला, त्याने तेजू ला एक दिवस आधी फोन केला होताच.
ठरल्या प्रमाणे, दोघे एका बागेत भेटले. एकमेकाला बघून फार दिवस झालेले.
प्रियकराला भेटायचा आनंद काय वेगळाच असतो, हे दोघां कड बघून जाणवत होतं.
"बाकी, घरी कशे आहेत सगळे, आपलं शेत कसं आहे..??"
"एकदम निवांत, सगळं ठीक-ठाक. तू सांग, तू कशी आहेस..?"
"मी ठीक आहे रे, घरचे पण निवांत एकदम".
RD ने तेजू चे हात आपल्या हातात घेतले, "काय झाला तेजू..??"
त्याला तिच्या डोळ्यात, काहीतरी जाणवत होतं.
तुम्ही सगळं लपवू शकता, डोळ्यात ले भाव लपवणे एकदम अवघड आणि RD ने ते ओळखले होते.
तेजू ने RD ला घट्ट मिठी मारली, RD ला हे अपेक्षित नव्हते.
त्याने तेजू च्या पाठी वरण हळुवार हात फिरवला. तेजू मिठी सोडायला तयार नव्हती.
RD ला एकदम तिचा रडतेला आवाज ऐकू आला, RD गोंधळाला.
त्याला चिंता वाटू लागली, "अग रडूबाई, काय झाला सांग तर मला,,??"
"काही नाही रे"
"तू नाही सांगितलं तरी कळते ग मला, तुझे डोळे ओरडून ओरडून सगळ सांगत आहेत".
तेजू ला रडणे अनावर झाले, ते अजून जोरात रडू लागली.
RD ने परत तिला मिठीत घेतले आणि सांत्वन करू लागला.
"बास रे बाळ बास, शांत हो जरा, मला सांगशील का झालाय तरी काय?".
तेजू स्वतः ला सावरत डोळे पुसू लागली.
"GRE चा result लागला माझा"
"चांगलंच आहे कि मग, काय काय झालं?".
"चांगले grades मिळाले मला आणि मुख्य म्हणजे मला पाहिजे असलेल्या US मधल्या University मध्ये admission पण मिळालं".
"अग वेडाबाई, रडतेस कशाला मग, चांगली बातमी आहे कि हि. हेच तर तुझं स्वप्न होतं ना". 
"तुला काळत कसं नाही रे"
"काय झालं?"
"अरे माझा स्वप्न होतं माहित आहे मला, पण तुला कळत कसं नाही, या सगळ्याचा अर्थ कळला काय..??"
"मी तुझ्यापासून दूर एकदम दूर जाणार आणि ते पण किती दिवस माहित नाही".
तेजू ने परत हुंदका फोडला.
RD च्या चेहऱ्या वरचा हर्ष गायब झाला होता, त्याला तेजू काय म्हणत होती ते कळून चुकलं.
तो RD साठी पण एक धक्का होता, त्याचे डोळे आणि मन भरून आलं.
त्याला तेजू ची व्याकुळता आणि परिस्थिती समजली. हे सगळं ऐकून त्याची पण स्थिती काही वेगळी नव्हती.
RD चे डोळे देखील पाणवले होते.
That moment had freezed their hearts & both dint knew how to express the feelings.

मन सर्वात स्वार्थी असतं ,त्याच्या मर्जी प्रमाणे काही नाही झालं, कि ते सगळ्यात पहिला डोळ्यांना त्रास देतं.
डोळे: अश्रूंचा बांध फोडतं,
शरीर: शरीरा वरचा ताबा घेतं,
वाचा: तोंडातले शब्द काडून घेतं.

त्या वेळी दोघांच्या मनात विचारांच वादळ उठलं होतं.

भरल्या डोळ्यांनी दोघांनी निरपो घेतला. RD स्तब्द होता.
घरी परतून तो रात्र भर विचार करत बसला.
निद्रादेवी त्या रात्री गायब होती. दोन जीव होणाऱ्या ताटा-तुटी मूळ व्याकुळ झाले होते.
रात्र सरता सरत नव्हती.
Deep Message



कधी विचार केलाय "आपली आवडती व्यक्ती आपल्या पासून दूर जाण्याचा..??"
त्रास ती व्यक्ती जाताना नाही होत, त्रास होतो एकांतात त्या व्यक्ती चा सहवास नसण्याचा.
RD त्या विचाराने खचत होता.











तेजू ची Admission process जवळ पास पूर्ण झाली होती आणि अमेरिकेला निघण्या साठी आता फक्त एक महिना राहिला होता.

एक एक दिवस संपत होता आणि RD चा संयम पण.
त्यांची परत भेट नव्हती झाली, शक्यतो फोन वर बोलणं होत होतं.
RD स्वतः जरी खचला असला तरी तो तेजू ला धीर देत होता.
बघता बघता शेवटचा दिवस जवळ आला. तेजू चा सगळं मित्र परिवार तिला भेटायला घरी गेला , RD पण त्यात होता.
त्यांनी Dinner ची योजना केली. RD त्याचीच उत्सुकतेने वाट पाहत होता.
ठरल्या प्रमाणे सगळे हॉटेल मध्ये आले.
प्रत्येकजण अमेरिकेतलं life कसं असेल याबद्दल बोलत होतं.
RD एका कोपऱ्यात तेजू वर डोळे रोखून बसला होता. तिच्या ते लक्ष्यात आलं होतं, पण सगळी होती म्हणून तू शांत बसली होती.
जेवण झाल्यावर शेवटचा किरकोळ निरोप समारंभ झाला, तिला पुष्पगुच्छ, चॉकलेट चा डब्बा आणि सगळ्यांच्या शुभेच्छा असलेला greeting कार्ड दिलं.
RD म्हंटला तो तेजू ला घरी सोडेल. एक एक करून सगळा मित्र परिवार भेट घेऊन निघाला.
शेवटी RD आणि तेजू राहिले. दोघं टेबल वर सामोरा समोर बसले होते.
RD आणि तेजू चे डोळे एकमेकात खिळून होते. पापणी पण बंद होत नव्हती.
थोड्या वेळात अश्रूंचा एक थेंब हळूच डोकाउ लागला आणि बघता बघता डोळ्यातून वाहू लागला.
तो थेंब होता RD चा, फक्त तो एक थेंब पाहून तेजू चा बांध फुटला, पाणावलेल्या डोळ्यातून प्रवाह चालू झाला.
RD ने तेजू चा हात त्याच्या हातात घट्ट पकडला. तो तिला काही न बोलता, डोळ्यांनी समजावत होता.
ती थोडीशी शांत झाल्यावर दोघे तिथून निघाले.
तेजू RD ला घट्ट धरून बसली होती.

"त्या गडावरच्या पहिल्या पावसा" नंतर ची हि तशीच वेळ होती कि, त्यांना वाटत होतं वाटत होतं , वेळेनं असंच थांबावं.
पण म्हणतात ना, "वेळ चांगला असो किंवा वाईट, ती निघून जाते".
तेजू RD ला घट्ट धरून,  घरच्या प्रवासात ती एक शब्द पण नाही बोलली.
गाडी तेजू च्या घर जवळ आली, घरी थोडेफार पाहुणे आले होते.
RD ने तेजूचा हात हातात घेतला आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला,
"काही काळजी करू नको, मी ठीक आहे , I am just Fine. तू फक्त तुझी काळजी घे बाळा. हे तर तुझं स्वप्न आहे, ह्यासाठीच तर इतकी मेहनत घेतलीस तू. होय ना..?"
तेजू समोर उभी होती, पण त्याच्या डोळ्यात बघायला टाळत होती.
"हे तुझा स्वप्न आहे, हे तुझा बाबांचा स्वप्न आहे, हे विसरू नको. मी ठीक आहे आणि हि फक्त काही महिन्यांची बाब आहे.
वेळ असाच निघून जाईल आणि तू परत येशील and  you know what I will be waiting for you. Just dont worry, I will be fine".
तेजूच्या डोळ्यात आता अश्रू संपले होते, she was just numb. तिला माहित होतं, प्रत्येक वेळी RD म्हणत होता ,तो ठीक आहे", ते खोटं होतं.
She was worried, but the words made her feel better.
तिने RD चे हात हातात घेतले आणि gently Kiss केलं.
"RD, you know, you are an important part of my Heart, not my life, my heart doesn't beat without you. 
Just take care of yourself & be in touch".
ती घरात आत गेली.
आत गेल्या गेल्या ती आई ला बिलगून रडू लागली.
ती रात्र कोणीच झोपलं नाही. ना तेजू, ना RD आणि ना तेजूचे आई-वडील.
मुलीला परदेशी ते म्हणजे "साता समुद्रा पार" एका अनोळखी ठिकाणी पाठवण्याचा तो एक कठीण निर्णय तिच्या वडिलांनी घेतला होता.
त्यांना पण काळजी लागली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी तेजू मुंबईला गेली. ती RD च्या फोन चा वाट बघत होती, पण त्याचा फोन आला नाही.
तिने hostel वर फोन केला, तिथं RD रात्री राहायला थांबला होता.
RD ने भरल्या मनाने तिचा निरोप घेतला.
Online आणि Emails वर भेटू असं ठरवून बोलणं संपलं.


कुणाला हि कल्पना नव्हती, हि त्यांची शेवटची भेट होती.


To be Continued.....!!!!!

Friday, 5 July 2019

The Burning Desire: "उस रात की सुबह नहीं"


The Burning Desire

This is undoubtedly, the most debatable, disputable & controversial write-up I have written 
until date.
Reason to write in English & मराठी is the Content & the Context of the write up are quite  sensitive & sometimes only English can justice the situations & emotions, मराठी might make it look Vulgar/ Erotic.

Most importantly, let me be very clear, the Characters, Locations, Names, Situations etc, everything of the write-up is Fictional & imaginary. It doesn’t resemble any of my known  
peoples. The write-up came across my mind after I recently read some online articles.

मला माहित आहे की, एकपण reader , ना उत्तर ना हि comment देणार, पण  मला वाटतं किमान  ते मी लिहू तर शकतो

Please have patience while you read & request you to read in it one stretch.

ह्या काल्पनिक कथे मध्ये 2 मुख्य पात्र आहेत "संग्राम" आणि "मेघा",

“Divided by Society but Connected by Hearts...???”

(There’s a reason for that question mark..!!)


संग्राम- जवळपास 30-32 वर्षांचा. म्हणजे असं वय ना धड पक्का माणूस आणि नाही धड कच्चा मुलगा, अध्यात-मध्यात..!! त्याचं सध्याचं वास्तव्य मुंबई मध्ये. संग्राम MBBS आहे. त्याचे स्वतःचे clinic आहे, जिथे तो संध्याकाळी - असतो आणि नोकरी म्हणून एका नामवंत दवाखान्यात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.

जेवढा संग्राम स्वभावाने रंगीत आहे तेवढाच त्याचा इतिहास. त्याने ज्या मुलीवर प्रेम केले तिच्याशीच लग्न देखील केलं; फक्त Love Marriage नाही Intense Love Marriage. Intense कारण दोन्ही कुटुंबांचा लग्नाला विरोध आणि Standard कारण त्यांची "CASTE".

But as it’s historically said, everything is fair in Love & War, “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” it  was slightly changed to दिलवाले दुल्हनिया भगाके ले जाएंगे”.

आपल्या मित्रांच्या मदतीने संग्रामने एका मध्यरात्री मेघाला पळवले आणि साध-simple मंदिरात लग्न केलं. परिस्थिती गंभीर होती; दोन्ही कुटुंब एकमेकांना दोष देत होतीलग्ना नंतर देखील त्यांच्यात बरीच हाना-मारी झाली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

संग्राम आणि मेघा जवळजवळ 26-27 वर्षांचे असताना लग्न केले. डॉक्टर असण्याचा फायदा म्हणजे आपण जिथे आहोत तिथेच आणि कधीपण स्वतः चं  क्लिनिक / प्रॅक्टिस सुरू करू शकता, ही त्याच्या बरोबर एक सकारात्मक गोष्ट होती; मेघा पण बी.एड. qualified होती आणि लग्नापूर्वी तिच्या गावात शिक्षक म्हणून काम करीत होती.

दोघांनाही त्यांच्या कुटुंबांनी स्वीकारले नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्या शहरात जाण्याचा आणि नवीन जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते मुंबईला आले आणि सर्वांना ठाऊक की मुंबई कधीही निराश करत नाही, काही महिन्यांत संग्राम ला नोकरी मिळाली. मेघालाही त्यांच्या घराजवळील एका शाळेत नोकरी मिळाली.

ते जोडप आता आनंदी होतं, पण अजूनपण ते फक्त जोडपंच होतं ,"कुटुंब/ परिवार" झालेलं नव्हतं.

बघता बघता वर्ष निघून गेली. दोघे सुखी होते पण कुठे ना कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात घरातील लोकांची कमी भासत होतीदोघांनी मन जुळवण्याचा बराच प्रयत्न केला आणि एके दिवशी त्यात त्यांना यश आलं. संग्रामच्या घरातले पहिला पाघळले, त्यांनी दोघांना स्वीकारलं.

पण आता दोघेही मुंबईकर झाले होते, मुंबईने त्यांना आपलंसं केलं होतं. ते आता  वरचे वर आपल्या घरी आपल्या गावी येत जात होते.

आणि एका वर्षात त्यांना  कन्या रत्न झालं, घरी एकदम खुशीचं वातावरण झालेलं.

मेघाचं पाहिलं बाळंतपण त्यांनी सासरीच केलं, कारण माहेर म्हणायला आता कुठं काही राहिलंच नव्हतं

एक दिवस मेघा घरी बसली असताना तिचे आई-वडील आपल्या लेकी ला आणि त्यांच्या नातीला भेटायला आलेअश्रूंचा बांध फुटला आणि त्यात सगळे रुसवे-फुगवे , राग सगळं वाहून गेलं, मेघाने लेगचं हि बातमी संग्राम ला कळवलीसंग्राम मुंबई ला होता, तो लगेच येऊन तिच्या आई-वडिलांना भेटून गेलाआता त्यांचा संसार संपूर्ण झाला होता.

त्यांनी आवडीने मुलीचे नाव "अस्मिता" ठेवला, तिला प्रेमाने सगळे "अस्मी" म्हणतात.
वर्षांनी मेघा, अस्मी सह मुंबई ला परत आली. संग्राम ने त्यांचं जंगी स्वागत केलं
जो पर्यंत अस्मी शाळेत जात नाही तोपर्यंत मेघा नोकरी करणार नव्हती, हा दोघांचाही निर्णय होता.

वेळ त्याच्या वेगाने धावत होता, संग्राम ला बऱ्याच वेळा काम निम्मित इतर शहरात जावे लागत होतेमेघा अस्मी आणि घर व्यास्तीत manage करत होती.

पहिली भेट: पहिले नं मी तुला - तू मला नं पहिले

एकदा संग्राम कामानिम्मत बेंगलोर ला गेला होता, सकाळ ची Flight होती आणि त्याच दिवशी  return. आपलं काम आटपून संग्राम विमानतळ वर येऊन बसला, flight रात्री ची होतीआता कुठसे वाजले होते. त्याने आपला लॅपटॉप काढला आणि किरकोळ काम करू लागलात्याच्या कडे Mac-Book होते (One of the attractive laptops). तो आपल्या कामात गुंग होता.

आणि त्याच्या शेजारी ती आली.

तिच्या डाव्या हातात कॉफीचा कप होता आणि उजव्या हातात जॅकेट. तिने लॅपटॉप बॅग खांद्याला लटकवलेली होती. Strip कलर केलेल्या केसां मध्ये goggle अडकवलेला, कानात मोठ्या rings. ती Suit मध्ये  होती, त्याचेच जॅकेट तिने हात मध्ये पकडलेले.
राखाडी कलर ची फॉर्मल trouser होती आणि White कलर चा शर्ट. ती तशी उंच नव्हती पण hills मुळे उठून दिसत होती.
ती संग्राम च्या शेजार च्या टेबल वर येऊन बसली.
संग्राम त्याच्या कामात व्यस्त होता.
तिने कप टेबल वर ठेवला आणि बॅग मधून लॅपटॉप काढला.
तिच्या कडेपण Mac-Book होता, ती कॉफी चा एक-एक घोट घेत तिच्या कामात गुंग झाली.
तिला एक महत्वाचा ई-मेल पाठवायचा होता आणि तितक्यात तिचा लॅपटॉप ची बॅटरी संपत आली आणि  तिचा चार्जेर ऑफिस मध्ये विसरला होता.
तोपर्यंत संग्राम ला मेघा चा फोन आला, तो तिथून उठून थोडं लांब जाऊन बोलू लागला.
तो उठताच "तिला" संग्राम चा Mac-Book चा चमकतेला लोगो चा लाईट दिसला. "तिच्या"  लॅपटॉप ची बॅटरी जवळ-पास संपत आली होती.
ती instant उठली आणि संग्राम ला म्हणाली ", Excuse me, If you don’t mind, Can I please borrow your Laptop charger for sometime…? I have an important email to be sent, but m out of Battery right now".
संग्राम ने स्वतः चार्जेर दिला, तो परत फोन वर बोलू लागला आणि "ती" लॅपटॉप वर कामात गुंग झाली.
फोन झाल्यावर संग्राम त्याच्या टेबल वर बसला, "ती" अजून कामात व्यस्त होती.
थोड्याच वेळात Fight ची announcement झाली. संग्राम ने "तिला" खुणावले.
"Ohh,,,Just २ minutes,,,M almost done".
संग्राम ने आपली बॅग पॅक केली आणि तिच्या शेजारी येऊन उभा राहिला.
त्याने आपला फोन काढला आणि त्यात काहीतरी चाळू लागल.
"Done,……हुश्शह्ह"....!!!
"Thanks for your help; it’s so kind of you”
"Pleasure is all mine”, संग्राम उत्तर दिले.
"By the way, M Minakshi", तिने हात पुढे केला.
"संग्राम, Nice to meet you Minakshi".
"I should rather say that, Nice meeting you".
दोघेही हसले. "Actually M an Architect & I have an important meeting tomorrow in Mumbai . I had to send the presentation to client for the same, Just fortunate that you were here and you had a Mac”. 
“I guess, this was the very moment I had bought the Mac”,
मीनाक्षी हे ऐकून एकदम हसली.
"I guess 3 of us are going to Mumbai tonight then..!!” संग्राम म्हणाला.
मीनाक्षी ला कळलं नाही, ती इकडे तिकडे बघत म्हणाली ," 3 of us..??”
"You, me & the Flight", संग्राम हसत म्हणाला.
"Thats too Lame", मीनाक्षी हसत म्हणाली.
दोघे Flight board करायला निघाले.
"You travelling alone or you have company..??", संग्राम म्हणाला.
"Nop, M on my own today".
दोघांनी एकत्र check-in केल्यामुळं त्यांना जवळ जवळ seats मिळाल्या.
"Can I have the Window seat, if you dont mind", तिने केविलवाणा चेहरा करून विचारलं.
"Please", संग्राम ने तिले आत बसायला इशारा केला.
बॅग्स ठेऊन दोघे बसले, तोपर्यंत air-hostess येऊन विचारली, "Mrs. Menakshi  Ghorpade..??"
"Yeah, thats me".
"Mam, you have asked for Veg meal during flight..??"
"Yes, I did".
"Just wanted to confirm, it will served shortly".
संग्राम हे सगळं ऐकत होता.
भुवया उंच करून "घोरपडे..??"
"Yes, thats my surname".
"म्हणजे तुम्हाला मराठी येत असलेच कि..??"
"हाडाची मराठी आहे मी", दोघे हि हसले.
"एक नंबर", संग्राम म्हणाला.
"मग मगासपासून मराठी मध्ये का नाही बोलला?"
"ऑफिस मध्ये आणि शक्यतो बाहेर पण एकतर इथं इंग्लिश चालतं नाहीतर हिंदी. तशी सवय लागली आहे आता".
संग्राम ने होकारार्थी मान डोलावली.
म्हणतात ना Wavelength (Tuning) match होते, तसंच ह्या दोघांचा हि झालं.
ते एकमेकांना आपल्या बद्दल थोडं थोडं सांगू लागले.
संग्राम ने आपला परिवार आणि त्याची Love-Story सांगितली.
मीनाक्षी सांगू लागली.
ती मूळची नागपूर ची होती आणि तिथूनच Architecture degree घेतली होती.
तिचं पाहुण्यातल्याच एका मुलाशी Arrange Marriage झालं होतं. तिच्या लग्नाला नुकतेच ३ वर्ष पूर्ण झाले होते.
राकेश तिचा नवरा Software Engineer होता आणि घरी फक्त त्याची सासू होती. छोटासा सुखी परिवार. ती बेंगलोर मध्ये एका मोठ्या फर्म मध्ये Architect होती आणि तिलाही कामानिमित्त बरंच फिरावं लागत होतं. तशी flight फक्त १:३० तास ची होती, पण ह्या वेळेत दोघांनी आपला सगळा जीवन प्रवास थोडक्यात एकमेकांना सांगितला.
वेळ कसा गेला ते दोघांना हि कळलं नाही. ९:३० च्या आसपास flight मुंबई मध्ये land झाली.
संग्राम कडे luggage बॅग नव्हती, पण मीनाक्षी कडे एक छोटी luggage बॅग होती.
संग्राम तिच्या बरोबर luggage बॅग घेण्यासाठी बॅग काउंटर ला आला. थोड्याच वेळात तिची बॅग आली.
दोघांनीही टॅक्सी book केली होती. Exit ला दोघे भेटले.
"फार छान वाटलं तुम्हाला भेटून, प्रवास एकदम मस्त झाला".
"Same Pinch", मीनाक्षी म्हणाली. 
फोन नंबर exchange झाले आणि परत भेटू ह्या वाक्यावर दोघे आप-आपल्या वाटेवर निघाले.

"Sometimes we have to depart to Meet again"

संग्राम घरी पोहोचला, अस्मी त्याच्या शिवाय झोपत नाही हे त्याला माहित होते.
दिवस फार मोठा होता, थकल्या अंगाने संग्राम झोपी गेला.
मीनाक्षी हॉटेल वर पोहोचली आणि फ्रेश होऊन ती पण झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे संग्राम दवाख्यात गेला. तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं त्याचा चार्जेर मीनाक्षी कडेच राहिला आहे.
त्याने मीनाक्षी ला फोन केला, पण तिने उचलला नाही
"Good luck with your presentation", असा message संग्राम ने केला.
तिचा message आला, "Thanks a Lot, bit busy rt. now, Will call you back".
दुपारी मीनाक्षी चा फोन आला.
संग्राम, "नमस्कार, कस झालं presentation तुमचं?"
"खूपच छान, Thanks".
"Thanks कशा बद्दल..!!"
"तुमचा charger मिळाला नस्ता तर मला काल presentation पाठवता आला नसतं, Plus मी रात्री हॉटेल वर येऊन बरंच काम आटपलं माझं लॅपटॉप वर".
"अर्रर्रर्र, तुमचा charger माझ्या कडेच राहिला कि काल..!!", मीनाक्षी ला आता हे लक्ष्यात आलं.
"I m so Sorry, खरंच कामाच्या नादात charger द्यायचा राहिलाच".
"No Problem, इस्का मतलब समजते हो, हमारे नसीब मे फिरसे मिलना लिखा हे".
"क्या बात..!! खरं आहे".
"मी आज रात्री return जाणार आहे बँगलोर ला, काल सारखीच late night flight आहे.
Airport जवळ भेटू शकाल, if you are free..!!"
"चालेल ना, किती वाजता भेटूया?"
"मी इथून आटपलं कि तुम्हाला कॉल करते".
"Done".
संग्राम ने मेघाला फोन करून सगळं सांगितलं आणि रात्री जमलं तर जेऊन येईन असा निरोप दिला. मीनाक्षी चा ६ वाजता फोन आला आणि भेटण्याचे ठिकाण ठरले.
दोघेही ठरल्या वेळेला तिथे आले, ते एक छानसं हॉटेल होत.

दुसरी भेट: औपचारिकता


मस्त मंद प्रकाश आणि शांत संगीत, एकदम मोहक. ती संग्राम च्या होटेल choice ने impress झाली.
"तुमचा Charger, Thanks a lot, once again".
"बोला ना, Pleasure is all Mine आणि मी Mac कदाचित तुम्हाला लागणार म्हणून घेतला असावा". 
दोघे हि पुन्हा त्याच विनोदावर हसले.
इकडच्या-तिकडच्या गप्पा चालू होत्या.
"मी मेघाला म्हणजे माझ्या बायकोला सांगितलं आपल्या charger किस्सा बद्दल, ती म्हंटली मीच विसरलो असणार चार्जेर तुमच्या कडे".
"पुढच्या वेळी आलो कि भेटतो त्यांना हि".
"म्हणजे परत दौरा आहे तर?"
"जर आज चे हे काम मिळालं तर, आता १-२ वर्ष दौरेच दौरे आहेत".
काय माहित पण मीनाक्षी परत भेटणार ह्या बातमीने संग्राम खुश झाला.
त्याच प्रमाणे संग्राम चे पण दौरे बंगलोर ला वाढणार होते, पण त्याने हे मीनाक्षी ला आताच नाही सांगितले.
संग्राम ने मीनाक्षी ला त्याच्या नवऱ्या बद्दल विचारले, "तो आता US ला on-site आहे, next month येईल येईल".
गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या, जेवण आटपून दोघे हॉटेल बाहेर पडले.
संग्राम तिला Airport ला त्याच्या कार ने सोडतो म्हणाला, तिने होकार दिला.
You know, I don’t like to be at Airport to Drop anyone,,,!!”, संग्राम म्हणाला.
"असं म्हणायला कारण काय..??"
I hate to say good-byes,,,,!!"
मीनाक्षी ला आज च्या दिवसातला आवडलेला हा सगळ्यात आवडता क्षण होता.
She was very much impressed by his gesture and affectionate nature.
दोघांच्यात एक Bond तयार झालेला. They Greeted each other.
"मुंबईत परत आला कि नक्की फोन करा".
"करणार तर, पण तुम्ही कधी बँगलोर ला आला, तर लक्ष्यात ठेवा कोणतरी आहे बँगलोर ला".
संग्राम तिला सोडून पार्किंग कडे निघाला.
"Thanks for everything dear, you made my day..!!, मीनाक्षी चा लगेच message आला.
"As always, Pleasure is all Mine", संग्राम ने लगेच reply केला.
"Cant wait to be back in Mumbai,,!!"
"Me-too", संग्राम ने message type केला, पण पाठवू का नको पाठवू का नको विचार चालू होता. त्याने message delete केला आणि "Whenever ur back, just let me know", असा message पाठवला.
मीनाक्षी ला ह्या message ची अपेक्षा नव्हती, तरीपण ,"Definitely" असा reply तिने दिला. संग्राम घरी पोहोचला, त्याच्या फोन वर मीनाक्षीचा आणि एक message आला होता.
"Thanks Sangram, I really enjoyed the day, looking forward to see you again. Flight is about to take off. Good night & Take Care".
Sangram was quite amused to see the message.



Reply करू का नको म्हणत त्याने फोन बाजूला ठेवला आणि झोपी गेला.
बऱ्याच दिवसांनी संग्राम इतकं मोकळं पणाने वागला होता.
एकदम झालेलं लग्न, घराची आणि मुलीची जबाबदारी ह्यात कुठं तर तो हरवून गेला होता.
का कुणास ठाऊक इतक्या छोट्या भेटी मध्ये त्याला एकदम निश्चिंत आणि Stress-free वाटतं होतं.
मीनाक्षी पण अश्याच मसनिक स्थितीत होती, तिचा नवरा बऱ्याच वेळा परदेशी असायचा आणि घरी फक्त सासू, म्हणून तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं होता.
कुणाशी जवळीक नाही, निकटचे मैत्री नाही, फक्त काम एके काम.
त्यात झालेली हि छोटी भेट, संग्राम तिला फारच आवडला. आपल्या आयुष्यात असा कोणीतरी जीव -लग मित्र असावा असं तिला वाटू लागलं.
घरी पोचे पर्यंत तिने संग्राम च्या message ची वाट पहिली, पण message काय आला नाही. तिला वाटलं, उगाचच आपण हवेत एक चित्र बनवत आहे. ती व्याकुळ मनाने झोपी गेली.

If you cant sleep, it means you are awake in someone else's dreams.


Chatting-Chatting:

Next day everything was normal. दोघेही आप-आपापल्या आयुष्यात मग्न झाले.
संग्राम ला हॉस्पिटल मध्ये बरेच काम होती आणि नंतर clinic ला पण बरंच काम होतं.
मीनाक्षी ऑफिस ला जाऊन post-meeting presentation देत होती.
लॅपटॉप चा चार्जेर तिला अधून मधून संग्राम ची आठवण करून देत होता, पण कामा मध्ये ती विसरून जाईची.
दुपारचं जेवण झालं. मोकळ्या वेळेत Mobile चाळणे सध्याचा सार्वजनिक उपक्रम आहे.

मीनाक्षी ने Whatsapp वर संग्राम चा फोटो पहिला, छान असा DP होता, संग्राम, मेघा आणि त्यांच्या मध्ये छोटी अस्मी.
संग्राम पण तेच करत होता, मीनाक्षी च्या DP मध्ये तिने US मधला तिच्या नवऱ्या सोबतचा फोटो ठेवलेला.
दोघं हि Online होते, पण Who will break the Ice first अशी परिस्थिती होती.
"Hello", मीनाक्षी ने पहिला message केला.
संग्राम वाट बघतच होता, instant reply आला, "Hi, how was the return flight..??"
"Was Boring, actually Person seating beside me missing....hahaha".
"Hahaha,,,,, जेवण झालं का,,,,?"
"हो झालं ना,, तुमचं,,,घरातनं डब्बा येत असेल ना.. Wow किती छान..!!"
"हो आताच जेवलो, मेघा बनवते जेवण. Actually, तुम्ही घरीच यायला पाहिजे होते काल. मस्त काय तर जेवण केलं असत घरी".
"Next time Fix".
"तुम्ही जेवता कुठ, I mean मेस आहे का घरातून येतो डब्बा".
"इतकं माझा नशीब कुठं, कधी तर आणते कधीतरी बाहेर".
"Ohhh".
"बहुतेक प्रोजेक्ट मिळेल मुंबई चा, so next week might visit Mumbai again".
"एक नंबर, या या मुंबईत तुमचे स्वागत आहे".
"सध्या तर अशेच धावते दौरे असतील, काम चालू झाला कि १-१ आठवडा राहावं लागेल".
"Ok, Good yaar. पण travelling चा कंटाळ येत नाही तुम्हाला..?"
"Travelling चा छे मुळीच नाही. I like to travel & Explore new destinations. कामातून वेळ मिळाला कि माझी कुठे ना कुठे तरी भटकंती चालू असते".
"चांगलं आहे, I believe travelling keeps you young".
"वो तो हे".
"DP छान आहे, कुठे गेला होता फिरायला..??"
"तो last month राकेश कडे गेले होते US ला, तेव्हा चा आहे".
"मस्त आहे फोटो".
"Thanks, फोटो तर तुमचा पण भारी आहे"
"हो ना, अस्मी आता पासूनच pose देत असते फोटो ला".
"Cute couple आहे तुमचं".
"Thanks a lot".
"एक बोलू..??", संग्राम.
"बोला ना".
"एक compliment द्यायची आहे तुम्हाला".
"अरे बापरे हो का,,,, द्या कि मग".
"हे अरे बापरे काय, असं डायरेक्ट बोलण्या पेक्षा विचारून केलेलं बरं असतं कधी पण".
"बोला बोला".
"तुमची Smile फार छान आहे, especially तो सुळा दात तर एक नंबर".
"M Pink & blushing already" मीनाक्षी म्हणाली

The Chat continued for almost an Hour. नंतर दोघे आयुष्यात मग्न झाले.

Breaking the Protocol: Formal to Special

फोन-message अधून-मधून चालू होते. Communication was intact. 
तिथून पुढे बऱ्याच वेळा मीनाक्षी मुंबई ला येऊन गेली, तिने न चुकता प्रत्येक वेळी संग्रामशी संपर्क देखील केला.
१-२ वेळा ती संग्राम च्या घरी देखील येऊन गेली. तिची ओळख आता मेघा आणि अस्मी ला पण झाली होती.
Love Marriage असल्या मूळ मेघा आणि संग्राम दोघांना एकमेकांचा जवळ पास सगळा मित्रपरिवार माहित होता, त्यात पडलेली "मीनाक्षी" एक भर.
संग्राम देखील Medical Conference साठी बँगलोर ले जाईल तेव्हा मीनाक्षी ला भेटतं असे.
बघता बघता १ वर्ष झालं, नव्या मैत्री चं रोपटं आता मोठा वृक्ष झालं होतं.
"अहो-जाओ" आता "अरे-तुरे" वर आलेलं. नातं घट्ट झालं होतं.

मे महिन्याच्या सुट्टी मध्ये मेघा गावी जाणार होती. ती शिक्षिका असल्यामुळं १-२ महिन्याची मोठी सुट्टी होती.
संग्राम त्यांना सोडून १ आठवडा गावी राहून परत मुंबई ला आला.
Schedule तेच होतं, फक्त त्यात मेघ आणि अस्मी नव्हती.
दिवस कामात जाईचा, त्याला कंटाळा फक्त रात्री यायचा. तो क्लिनिक मधून उशिरा यायचा.
मेघाने जाण्या आधी जेवण करायला एक मावशी लावली होती, ती सकाळ-संघ्याकाळ जेवण करून जायची.
एका संध्याकाळी संग्राम क्लिनिक मध्ये होता, पेशंट कमी होतं.
त्याने मीनाक्षी ला Whatsapp वर "नमस्कार" असा message केला.
ती अर्ध्या तासाने तिचा reply आला, "नमस्कार साहेब".
"चहा झाला काय, कुठे ऑफिस का घर..??"
"अरे  आताच घरी येऊन fresh झाले. आता चहा घेणार".
"Ok. राकेश कुठं आहे..??"
"राकेश, काल Australia ला गेलाय. २-३ महिने दौरा आहे त्याचा. सासू नंदे कडे राहायला गेल्या आहेत. मे महिने नातवंडां बरोबर जरा वेळ म्हणून".
"Ohhh, तू एकटी आहेस म्हणजे, एकटा जीव सदाशिव".
"बघ ना, एकटं एकदम कंटाळा येतो, मला तर घरी यालाच नको वाटतंय".
"Same pinch, अपनी हालत भी वैसी हि हे".
"म्हणजे?"
"अग मेघा आणि अस्मी गावी गेलेत, मी पण एकटाच आहे घरी".
मीनाक्षी ने चहा च्या कप चा फोटो पाठवला with comment "ये मग चहा प्यायला".
"आलोच"
"खरंच ये, मारी चं बिस्कीट पण आहे, तुला आवडते ना चहा बरोबर".
"तुला चांगला लक्ष्यात आहे कि तुझा".
"म्हणजे काय, Womens Brain works more than mens brain, you know that..!!"
"काहीही".
"अरे खरंच, आपण जेव्हा जेव्हा वेळा भेटलो, तेव्हा तेव्हा तू कोणता शर्ट घाटलेलास मला सगळं आठवतं".
संग्राम ने तिला २-३ प्रसंग विचारले, तिला खरंच सगळं लक्ष्यात होतं.
He was quite impressed with it.
तिने संग्राम ला काही प्रश्न विचारले, पण संग्राम पण त्यात सरस ठरला.
पहिल्या भेटीला मीनाक्षीच्या गळ्यातल्या नेकलेस पासून तिच्या hills पर्यंत त्याला हि सगळं पाठ होतं.
"तुझे स्ट्रीप केलेले केस छान दिसत होते तेव्हा".
"Thank you. आता नवीन कट केलाय, स्टेप कट प्लस बर्गंडी स्ट्रिप्स".
"एक नंबर"
मीनाक्षी ने तिचा selfie पाठवला.
This was the first time Sangram felt the attraction towards Meenakshi.
Photo without Makeup, but she was looking Stunning.
Typical style मध्ये एका side ने view plus Pout नं केलेली केलेली pose होती.
"एकदम कडक".
"पण सुळा दात कुठं आहे ह्यात".
तिने  लगेच हसत असलेला फोटो पाठवला,
ज्यात सुळा दात दिसत होता.
"हा,,,,, हा best आहे".
"वजन वाढलाय कि तुझं, good news आहे काय..?"
"ए गप रे, काय पण..!!"
तिने आरश्या समोर उभा राहून एक फोटो काडून पाठवला, "बघ मी आहे तशी आहे, आता सांग". ती T-Shirt आणि Shorts मध्ये होती.

In the moment of hurry, she dint realized, that she has sent a photo in Shorts to Sangram. The T-shirt was with long neck, with revealing cleavage & also the legs were visible in the shorts. Her body measures were easily visible through it.

संग्राम ने त्या फोटोवर Heart smiley ने reply दिला.
"तू इकडे असतास तर किती बरे झाले असते. आपण भेटलो असतो रे".
"मी हि तेच म्हणणार होतो, hahaha"
संग्राम ने तिला एक selfie पाठवला.
"काय रे बायको गावाला गेली वजन कमी झाला कि तुझं"
"Hahaha, तसं काही नाही, आहे तेवढच आहे".
"Gym चालू आहे वाटतं, डॉक्टर एकदम fit. पेशंट impress होत असतील तुझा दवाख्यात येणारं, तुझी तब्येत बघून".
"तू impress झालीस ना, तेवढच बास आहे मला".
"I m already impressed रे, you know that".
"Already impressed म्हणजे..!!"
"सगळं सांगायचं नसतं,,,Hahaha".

हे chatting आता रोजचंच झालं होतं, त्याची दोघांनाही सवय झाली होती. कधी Call कधी chatting, late night पर्यंत चालायचं. एक न-सुटणार जाळं हळू हळू तयार होत होतं, याची त्यांना जाणीव नव्हती. ते एक मृगजळ होतं, फक्त लांबूनच बघण्या सारखं.

वादळ पूर्वीची शांतता:

दोघं हि आयुष्यात खुश होते, संग्राम चं तर Love marriage होतं आणि मीनाक्षी ने पण तिच्या मनाप्रमाणे आवडणाऱ्या मुलाशी लग्न केलं होतं.
पण का कुणाशी ठाऊक, दोघांना एकमेका बद्दल जवळीक वाटू लागली होती.
Something like a burning desire.

पावसाळ्याचे दिवस होते, एकदा संग्राम बँगलोर ला गेला होता, ह्यावेळी त्याची conference ३ दिवस होती. दिवसभर काम आटपून त्याने मीनाक्षी ला बँगलोर ला आल्याचं सांगितलं. 
ती भलतीच खुश झाली. संध्याकाळी भेटायचा प्लॅन ठरला. तिने छान अश्या हॉटेल मध्ये त्याला जेवल्या बोलावलं.
दोघे बऱ्याच दिवसांनी समोरासमोर भेटत होते, का कुणास ठाऊक पण हा वेळ काही वेगळच होता.
Both were sharing intense eye contact.
कमीत कमी बोलणं आणि जास्तीस्त जास्त डोळ्यांनी बोलणं चालू होतं.
"तू Drinks घेतोस का रे...??"
संग्राम एकदम हे ऐकून दचकला, "डॉक्टर आहे रे मी, मी नाही घेत..!!"
"डॉक्टर नि प्यायची नाही असा कुठं लिहिलं आहे का...!!"
दोघेही हसले, "आज बिअर पिऊ वाटत आहे मला. तू आलास इकडे फार बरं केलास, फार एकटं वाटत आहे रे मला..!!"
तिचे डोळे एकदम पाणावले, "मिनू काय झाला ग, एकदम असं का बोलत आहेस.??"
"घरी काही प्रॉब्लेम आहे का..??"
"नाही रे, सगळं एकदम मस्त आहे. जे मला पाहिजे होतं त्याही पेक्षा सगळं छान आहे".
"चांगला caring नवरा, समजूतदार सासू, मना सारखा जॉब आणि काय पाहिजे रे एकाला आयुष्यातनं".
संग्राम थोडं गोंधळला, जो तो तिला समजावून सांगणार होता बरोबर तेच ती त्याला सांगत होती.
"सगळं आहे रे आयुष्यात, पण मी कुठे "मी" तरी हरवत चालली आहे".
She dint knew but, both were sailing in the same boat.
संग्राम काही बोलला नाही, तिला उगाच म्हणतोय असं वाटेल म्हणून.
तो फक्त तिला निहाळत होता, तिचा हे रूप त्याने पाहल्यांदाच अनुभवलं होतं.
"मला फार बोलायचं आहे रे तुझाशी,,,!!"
"मग बोल ना, मी आहे तुझा समोर..!!"
"इथं नाही रे बोलता येणार, कसं समजत रे नाही तुला".
"दिले मी कुछ मत राखों, बोल दो".
"सगळंच बोलायचं नसतं रे, थोडं समजायचं पण असतं".
"आणि मला माहित आहे तुला समजतं, तुला नक्की समजतं".
"काय ग तू, काय झालाय तुला एकदम..??"
"एकदम नाही अरे बरेच दिवस झाले, फक्त आता बाहेर येत आहे, म्हणून थोड धाडस म्हणून म्हंटलं बिअर प्यावीशी वाटते".
"बिअर पिल्याने धाडस येते,,??"
"नाही येत, पण डोकं बधिर होतं आणि शब्द direct हृदयातून येतात".
"वाह,, आवडलं मला समीकरण".
"खरंच, पिऊन बघ एकदा".
"नको ग बाई, I am happy the way I am".
Shit yaar,,,,Its not about being happy the way you are, its about why are you happy, the way you are..??”
"सोड, जाऊंदे. किती दिवस आहे दौरा?"
"अग बोल ना मधेच काय झालं, विषय का बदलालास..??
"काही नाही रे, तू सांग ना किती दिवस आहेस, का उद्या पाळणार लगेच?"
"आहे अजून २ दिवस इथेच".
"Great, कुठं आहे राहायची arrangement".
"हॉटेल book केलं आहे, इथून जवळचं".
"Ok, मग अस करू, उद्या dinner माझा घरी करू".
"चालेल ना, मी काम आटपलं कि तुला कॉल करतो".
"Done".
दोघे जेवण आवरून तिथून निघाले.
रात्री १०-१०:३० च्या आस पास मीनाक्षी चा message आला, "मी जे काही बोलले त्याच राग नाही ना..?"
"राग नाही ग, फक्त एकदम बोललीस ना, हे अपेक्षित न्हवतं".
"Sorry"
"No No , काय तू पण, Dont be Sorry, its Ok to Speak your heart out, That’s why we have friends, don’t we..??
"हो ते पण बरोबर आहे. पण तू कुठे काय बोलतो, सगळं कसं मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात दडवून ठेवतोस".
"तसं काही नाही"
"तसंच आहे, मला तोच अंधारलेला कोपरा बघायचा आहे".
"तसं काही नाही ग, जे आहे ते मी सगळं सांगतो ना".

Chatting बराच वेळ चालू होतं.

मीनाक्षी ने एका अंगावर झोपलेला closeup selfie पाठवला.
संग्राम ला तिच्या डोळ्यात बरंच काही दिसलं.
त्याने फक्त Heart चे Smilyes पाठवले.
दोघेही chatting करत झोपी गेले.

तो मोहक क्षण:

ती रात्र फार मोठी होती. दोघांच्या मनात विचार फिरत होते. 
सकाळ जड डोक्याने दोघेही कामावर गेले. Office कामात असले कि दोघे मग्न असायचे, फक्त मोकळा वेळ मिळाला कि विचारांचा भूत अधून मधून येत होतं.
मीनाक्षीचं कामात मुळीच लक्ष नव्हतं, ती फक्त सूर्यास्ता ची वाट पाहत होती.
फक्त संग्राम च्या message ची वाट बघत होती.
संग्राम कामावरून ७ ला निघाला. मीनाक्षी ला पण एक meeting होती.
मोठा पाऊस असल्या मूळ मीनाक्षी च्या घरी पोहोचे पर्यंत ८ वाजले होते.
तिच्या Apartment जवळ रस्त्याचं काम चालू होतं, म्हणून Taxi थोडा लांब थांबली.
तो पावसात पळत पळत तिच्या अपार्टमेंट मध्ये आला.
पावसा मूळ कपडे थोडे भिजले होते. बघतोतर फ्लॅट ला कुलूप.
त्याने  मीनाक्षी ला फोन केला, "अग कुठं आहेस तू, मी तुझ्या फ्लॅट च्या बाहेर आहे..??"
"एकचं मिंट थांब आले मी".
थोड्या वेळात मीनाक्षी आली.
पावसामुळं ती पूर्ण भिजली होती.
"वाह, मुंबईकरांना बँगलोर चा पाऊस कसा वाटला..!!" ती हसून म्हणाली.
संग्राम तिज ते भिजलेलं रूप बघत होता. तिच्या हातामध्ये एक छोटी बॅग होती.
पंजाबी ड्रेस अंगाला चिकटला होता, तिची पूर्ण body-line दिसत होती.
त्यातून तिचे inners हि ठळक पणे दिसत होते. संग्राम न राहून चोरट्या नजरेने पाहत होता.
"तू आता ऑफिस मधून आलीस..?"
"अरे नाही रे, थोडं घरचं सामान आणायला गेले होते. तू आत येणा".
तिने दरवाजा उघडला.
दोघे आत आले. तो फ्लॅट न्याहाळत होता, जिथं तो उभा आहे तो waiting area होता, मोठं Shoe-Rack होते आणि भिंतीवर एक मोठा लाकडी शिल्प होतं. त्याने Shoes काढले.
"तू पण भिजलास रे, Washroom इकडे आहे, तू fresh हो मी पण आवरून घेते".
तो हॉल मध्ये आला, हॉल एकदम मोठा होता. एका Architecture ला शोधावं तसं ते Lavish घर होतं.
Wooden Flooring, भिंतींवर Wallpaper, Fancy False ceiling आणि बरंच काही.
हॉल च्या दोन्ही कोपऱ्यात बुद्धा चे मोठे पुतळे होते.
संग्राम वॉशरूम मध्ये आला, त्याचा शर्ट पूर्ण भिजला होता.
तो तसाच भिजलेला शर्ट घालून हॉल मध्ये येऊन बसला. मीनाक्षी तिच्या बेडरूम मधून आवरून आली.
"अरे शर्ट भिजलाय रे तुझा, सर्दी होईल असा बसला तर, थांब मी तुला कपडे देतो".
"नको नको, काही प्रॉब्लेम नाही".
"एक मिंट आलो मी थांब", ती एक T-शर्ट आणि पायजमा घेऊन आली.
"हे घाल, बसतील तुला, राकेश चे आहेत". तिने जोर लावल्या मूळ त्याला नाही म्हणता नाही आलं.
"अरे तू काही घेणार, चहा-कॉफी..?"
"कॉफ़ी चालेल..??"
"आलेच", ती थोड्या वेळात कॉफी घेऊन आली.
तो खुर्चीत बसली आणि ती सोफ्यावर.
तिने Sleeve-less T-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते.
तिचे भिजलेले केस , त्यात तिचं without make-up चेहरा, एकदम मनोहर दिसत होता.
ती सोप्यावर मांडीवर उशी घेऊन बसली.
"समोर बस ना माझ्या..!"
संग्राम समोर आला, राकेश चे कपडे त्याला व्यास्तीत बसली होती.
"बोला".
"मी बोलतोच रे, तू बोलत नाहीस काही".
संग्राम समोर बघत होता, तिच्याशी कमीत कमी नजर मिळवत होता.
त्याला माहित होतं, नजरेला नजर मिळाली तर गोष्टी दुसरी कड जाणार.
"खरंच, मेघा खूप नशीबवान आहे रे, तुझा सारखा नवरा मिळाला तिला".
संग्राम नुसता हसला, कारण reply साठी काही नव्हतंच.
"एक विचारू..??"
"२ विचार".
"मेघाच्या आधी मी तुला भेटले असते तर तू माझाशी लग्न लग्न केला असतास".
"हा काय प्रश्न आहे..??"
"अरे सांग ना, जर तसं झाला असतं तर..??"
"जर-तर मध्ये आयुष्य नसते ग, आहे ते सत्य आहे".
"काय तू, फार लाजतोस..!!"
संग्राम काही बोलला नाही.
"एक सांगू,,,!!"
"सांग ना".
"तू हळूच माझा कड बघतोस ना, माझं लक्ष नसताना, मला आवडते ते, पण असं direct बघितलंस तरी चालेल", मीनाक्षी म्हणाली.
Sangram was Quite amused by her words.
असं होत होतं जे त्याला बोलायचे आहे, ते सगळं शब्द आणि शब्द ती बोलत होती.
थोड्या वेळात कॉफी संपली.
तिने तिच्या खांद्यावरून स्वतः चा हात फिरवला.
"तुला थंडी वाजत आहे काही काय..??"
"अरे आता भिजले ना, थोडी वाजायचीच".
"तुला नाही वाजत का..?"
"वाजते ना, पण जास्त नाही".
"एक सांगू, चिडणार नाहीस ना..??"
"जो बोलणं हे बोलना हे बोल दो".
"तुला माहित आहे ना मला तू खूप आवडतोस..!!"
Direct प्रश्न, संग्राम पण लगेच म्हणाला, "हो ते तुझा डोळ्यात दिसतं मला".
"वाह, कधी बोलला नाहीस मग, अजून काय दिसत माझा डोळ्यात".
"बरंच काही".
"सांग मला मग", असं म्हणून ती एकदम त्याच्या जवळ येऊन बसली.
संग्राम सोफ्याच्या एका कोपऱ्यात होता. ती एकदम जवळ आली होती.
तिची मांडी संग्राम च्या मांडीवर होती. त्यात तिने शॉर्ट्स घातले होते.
संग्राम चा एक हात सोफ्यावर होता, ते बरोबर त्याच्याखांद्या जवळ येऊन बसली.
संग्राम चा श्वास वाढला होता, ती एकदम जवळ त्याला त्यालाही पाहिजे होती, पण तो क्षण आला हे त्याला पटत नव्हतं.
Truth is stranger than Fiction, सत्य कल्पना रे परे होता हे.
दोघं हि एकमेका कडे फक्त बघत होते, डोळ्यांची रासलीला चालू होती.
मीनाक्षी संग्राम च्या ओठांकडे आणि मग डोळ्यांकडे पाहत होती.
संग्राम फक्त आणि फक्त तिच्या डोळ्यात हरवला होता.
२ मिंट असेच गेले.
Can I Hug you..??”, मीनाक्षी हळू आवाजात म्हणाली.
संग्राम ने डोळ्यांनी होकार दर्शविला.
ती तशिच त्याच्या मिठीत आली, तिने त्याला एकदम घट्ट धरले.
He could feel her body’s warmness.
त्याने अलगद पणे त्याची मिठी बंद केली.
ती हळू हळू त्याच्या मिठी मध्ये लुप्त होत होती.
तो हि तिला साथ देत होता, त्याने हळुवार पने तिच्या पाठीवरून हात फिरवला.
थोड्यावेळाने संग्राम किंचित हलला, मीनाक्षी "हलू नको ना please, मला हा क्षण साठवू दे"
ती त्याच्या कुशीत शांत रमली होती.
"तू मला आधी का रे नाही भेटलास..?"
"काही बोलू नको, शांत रहा".
ती कुशीतून बाहेर पडत होती, त्याने तिला परत कुशीत घेतले.
मिळत असलेली साथ बघून ती पण सुखावली.
"मला असं का वाटतं , तू नेमही माझा बरोबर असावं, सदैव माझा सोबत", मीनाक्षी म्हणाली.
"काय झालं बाळ, आज अचानक एकदम असं का विचारात आहेस".
"काल तू मला "मिनू", म्हणालास आठवते का, ती हाक ऐकून सगळं बाहेर आलं रे".
"मला माहित आहे, तू माझा होऊ नाही शकणार, ते माझा डोक्याला पटते, पण ह्या हृदयाचं काय".
"दिवस एकदम शांत जातो, त्रास होतो तो रात्री, सारखा तुझी आठवण येते, वाटतं तू समोर असावास, तुझाशी सारखा बोलावं".
"पण ते माझा नशिबात नाही आहे".  मीनाक्षीला एकदम भरून आलं आणि डोळ्यात ला पहिला थेंब बाहेर आला.
तिचा बदललेला आवाज संग्राम ला जाणवला. त्याने तिला मानेला हळुवार धरून, चेहरा वर केला.
त्याचा झालेला स्पर्श मीनाक्षी ला रोमांचित करत होता, संग्राम ला हि तिचं उबदार शरीर जाणवत होतं.
त्याने तिचा चेहरा दोन्ही हातानी पकडला, ती खाली बघत होती.
"रडू नको, माझा कडे बघ".
तिने त्याला गळ्याला मिठी मारली. तिचा अंगाचा संपूर्ण स्पर्श त्याला झाला होता.
Sangram was feeling her PhysicIt triggered the burning desires, which were hidden somewhere in the corner of the heart.
संग्राम ने  तिला पुढं घेतलं, आणि  चेहरा समोर धरला.
ती रडत होती आणि ते पाहून संग्राम च्या पण डोळ्यात पाणी आला.
त्याने त्याचे कपाळ तिच्या कपाळावर ठेवले, "I M So Sorry मिनू"
"Dont be Sorry ,you are the best thing that ever happened to me", मीनाक्षी म्हणाली.
आणि दुसऱ्याच क्षणी तिचे ओठ त्याच्या ओठांवर होते.
संग्राम ने तिला जोरात मिठीत घेतलं, त्याचा हात तिच्या अंगावर फिरत होता आणि तिला ते आवडतं हि होतं.
संग्राम ने हळूच तिच्या मानेवर Kiss केला, त्यांचा रोमांच शिगेला पोहोचला होता.
तिने तिचा T-शर्ट स्वतः काढला आणि संग्राम चा T-शर्ट हि काढू लागली.
"आपण जे करतो आहे ते बरोबर आहे काय..??", संग्राम म्हणाला.
"मला नाही माहित,,,!!", ती म्हणाली.
You are married, so am I. I do not want to do something, which will ruin our lives. मी काय म्हणतोय तुला समजत आहे काय...??"
"समजत रे , सगळं समजत , त्याचंच तर दुःख आहे".
तिने हळुवार पने त्याला Kiss केला.
"मला फक्त एकदा तुला अनुभवायचं आहे, तुझा सहवास अनुभवायचा आहे रे.
आयुष्यात फार कमी लोकांना पाहिजे असलेलं प्रेम मिळत, दुर्दैवाने मी त्यातली नाही. पण माझा कड तू आहेस.
माझा आयुष्य फार छान आहे, राकेश माझी सगळी काळजी घेतो, पण कुठं काय तर कमी आहे आणि कमी म्हणजे तू.
माझा सर्वात चांगला मित्र, गरज असताना माझा जवळ असणारा, माझी काळजी घेणारा, मी 
चूक केली तर सावरणारा आणि थोडा वेळ का असेना पण फक्त माझा आहेस. मला माहित आहे तुझ्यावर मेघाचा पूर्ण हक्क आहे आणि तो मी घेणार हि नाही".

संग्राम च्या मनात लाखो विचारांचे  आले होते.

संग्राम आणि मीनाक्षी, दोघेच तिथं होते, तिसरं कुणीही नाही आणि याची कुणालाच कानोकान माहिती नव्हती. त्या क्षणी जे होत आहे आणि जे होणार आहे, ते कधी कुणाला कळणार हि नव्हतं.

It was a perfect Bounty, what happens in their remains between them.

प्रश्न आहे, काय झाले असेल किंवा काय व्हायला हवं होतं,,,,,,????


THE STORY ENDS HERE, WHICH 2 CONCLUSIONS:

First Conclusion:

तिने तिचा T-शर्ट स्वतः काढला आणि संग्राम चा हि काढू लागली.
संग्राम आणि मीनाक्षी दोघं हि त्याक्षणाच्या ओघात होते. एकामागून एक कपडे निघत गेले, दोघांचे हि शरीर एकजीव झाले होते. 
I wouldn’t say "they got physical",rather it was an purest emotion, which was flowing through the bodies.
दोन नं भेटणारी टोकं एक झाले होते, जशी पृथ्वी-आकाश. क्षितिजा प्रमाणे ते हि दृश्य होतं.

ती रात्र दोघांनी एकत्र अनुभवली, त्यांना माहित होतं हे परत होणार नाही.
मीनाक्षी ने त्या रात्रीचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेतला होता.
"आपण काही चुकीचं नाही केलं, जे घडल ते चांगलच आहे. एक इच्छा जी कायम मनात राहिली असती ती आज पूर्ण झाली आणि त्याची मला खंत नाही", मीनाक्षी म्हणाली.
त्या रात्री जे झालं ते फक्त आणि फक्त दोघांच्यात राहिला, "The Untold-Truth".

"Sometimes the best moments in Life are ones you cant tell anyone about"

"ती रात्र" फार मोठी होती.



Second Conclusion:

तिने तिचा T-शर्ट स्वतः काढला आणि संग्राम चा हि काढू लागली. 
दोघंही अचानक एकदम थांबले. मीनाक्षी ने संग्राम ला एकदम घट्ट मिठी मारलं.
पण काही चुकीचं करत आहे, हे दोघांना जाणवलं. दोघं हि एकमेकाला बिलगून रडू लागले.
त्यांना माहित होतं ते कधी हि एकत्र नसणार. दोघांनी एकत्र जेवण केलं आणि संग्राम रात्री हॉटेल वर परत गेला. जाताना मीनाक्षी ने त्याला एक घट्ट मिठी मारली,  "मला तू आयुष्यभरा साठी हवा आहेस, एक मित्र म्हणून का असेना पण तू हवा आहेस...!!" 
"कधी माझ्या भावना वर खाली झाल्या तर तू आहेस मला सांभाळायला हे माहित आहे मला. माझी साथ कायम ठेवशील ना संग्राम..??
एवढा करशील ना माझा साठी".
संग्राम ने तिला कपाळावर Kiss केला आणि म्हणाला, "You have my Half Heart now..!तेरे बिना मे जी नही सक्ता, तू दोस्त थी, हे और हमेशा रहेगी,,,,,Promise ,,,,,,,"Cross my heart and hope to die".




शेवट:

संग्राम काम आटपून बँगलोर हुन मुंबई ला आला.
मेघा नि अस्मी त्याची आतुरतेने वाट बघत होते. तो दोघांना एकदम प्रेमाने भेटला.
मीनाक्षी हि कामात मग्न झाली. १ वर्षाने तिला मुलगा झाला आणि तिने त्याचे नाव "संग्राम" ठेवल. दोघेही एकमेकांच्या संपर्कात राहिले, अधून मधून भेट होत होती, Eventually they became best of friends for life.

The questions remains, was the First Conclusion right or was second or was there any 3rd option....!!!!

"प्रत्येतक "संग्राम" च्या आयुष्यात एक "मीनाक्षी" असते आणि प्रत्येक "मीनाक्षी" च्या आयुष्यात एक "संग्राम", Life is how you handle Love over Lust & Friendship over a Relation.


आयुष्यात बऱ्याच व्यक्ती फक्त प्रेमात पडण्या साठी असतात, पण एकत्र राहण्या साठी नाही.
Neil-The-Story-Teller