My Blog List

Friday, 31 May 2019

गुलमोहर_भाग-३: तू हि रे माझा मितवा


पहिली भेट


RD कॉलेज हॉस्टेल वर पोहोचला. ते सरकारी कॉलेज असल्यामुळं सगळं एकदम सूट-सुटीत होतं.
कॉलेज पासून हॉस्टेल जवळच होतं आणि मेस (खानावळ) सुद्धा. महत्त्वाचे म्हणजे त्याच आवारात फुटबॉल ग्राउंड आणि जिम्नॅशियम देखील होतं.

RD was a charmer by words आणि त्यात भर म्हणून तो एक खेळाडू आणि नियमित तालिम  मेंबर. जन्मापासूनच त्याने  शेतात काम केले होते, so he had a good physic.

RD ने त्याच्या Engineering Life मध्ये अनेक मित्र केले. अभ्यासात सरासरीपेक्षा जास्त होता. एक गोष्ट ते कधीही कोणत्याही Year ला Fail झाला नाही, त्याने इंजिनीरिंग ४ वर्षात पूर्ण केले.

RD कॉलेज फुटबॉल संघाचा Captain होता. त्याने कॉलेज ला बऱ्याच टूर्नामेंट झिंकून दिल्या.

Engineering ला जवळजवळ सर्व चांगल्या दिसणार्या मुली एकतर Computers, Electronics or IT ला असतात. Annual Social gathering आणि Technical Paper presentation Event ला RD discipline committee member होता. RD वर पुष्कळ Rose-Messages आणि Fish-Pond पडले.

Gathering कॉलेज च्या Open Air Theatre मध्ये होते. शेवटच्या दिवशी, सर्व प्राध्यापक, विध्यार्ती आणि office staff ला एकत्रितपणे Dinner होता.
RD त्याच्या मित्रांसोबत होता. Dinner सुरू होऊन बराच वेळ झालेला. RD मित्रां बरोबर जेवणाकडे निघाला. ताट हातात घेणार तोपर्यंत त्याला कोणीतरी हाक मारली.
सुकन्या मॅडम नी RD ला बोलावून विचारलं, "जेवलास काय"..??
RD, "नाही अजून, जेवणार आता. तुम्ही जेवला काय..???"
सुकन्या, "अरे Just Dinner चालू झालाय, Directors आता आले. मला सांग तुला Car चालवता येते काय ?"
RD, "हो, पण काय झालं .. ??"
सुकन्या, "Dinner आता चालू झालाय, मी मधेच सोडू शकत नाही आणि मला तेजू आणि रुजूता यांना त्यांच्या घरी सोडायचं होतं , मी त्यांच्या पालकांना शब्द दिला होता, की मी त्यांना रात्रीच्या जेवणा नंतर घरी सोडेन. Dinner संपायला तास तरी लागेल. एक काम कर माझ please, माझी कार घे आणि त्या दोघीना त्यांच्या घरी सोड तेवढ".

RD ने होकारात्मक मान डोलावली.
सुकन्या मॅडम नी तेजू आणि रुजूता ला बोलावलं. RD कडे इशारा करून त्या म्हणाल्या , "हा राजशेखर देशमुख. My last Year Student. माझ्या कारमध्ये तुम्हाला घरी सोडेल. तुम्ही घरी पोहोचला कि मला कॉल करायला विसरू नका".

RD ला तेजू माहित होती, She was one of the many crushes (good looking girls) in college.

RD गालातल्या गालात लाजत होता, कारण पहिल्यांदाच त्याच्या सोबत एक नाही तर दोन-दोन मुली कार ने प्रवास करत होत्या. ते तिघेही Car Parking कडे निघाले. अपेक्षेनुसार दोन्ही मागच्या seat वर बसल्या. 

RD ने समोर चा Mirror adjust केला ,असा कि त्यात बघितला कि direct तेजू चे डोळे दिसावेत.
ऋजुता चा घर वाटेवर पहिला होत, तिने RD ला पहिला तिला सोडायला विनंती केली. छोटासा प्रवास सुरु झाला.

RD was a good driver & quite passionate @ cars too.

रुजूता तिच्या घरचा रास्ता दाखवत होती. RD वरच्या वर आरश्यात हळूच तेजू च्या डोळ्यात बघत होता. तेजू एकदम शांत बसली होती. १५-२० मिनिटांनी ऋजुता च घर आले, तिची आई बाहेर वाट पाहत होती. तिघेही गाडीतून बाहेर आले.तेजुनी रुजूता आणि तिची आईला Good Night केला आणि कारच्या मागच्या दरवाज्याच्या दिशेने निघाली. त्या क्षणाची RD वाट पाहत होता, रुजूता आणि तिची आई घरात जात होत्या.
RD ने पुढचा दरवाजा हळूच उघडला. तेजू च्या हे लक्ष्यात आलं, पण ना पहिल्या सारखं करून तिने मागचा दरवाजा उघडला. RD थोडा नाराज झाला. तेजू ने मागचे दार उघडले आणि ऋजुता आत गेलेला पाहून, दार पुन्हा बंद केले. ती समोरच्या सीट वर येऊन बसली.
RD च्या आनंदाला सीमा राहिली न्हवती. त्याचे हृदयाचे ठोके दुप्पट झाले होते.
जेव्हा तुमचा Crush तुमच्या बरोबर गाडीच्या समोरच्या सीट वर बसतो, "Simply Priceless".
RD रेडिओ लागतो का बघत होता, पण त्याला काय जमलं नाही.
तेजू तिच्या घरचा रास्ता दाखवत होती.
RD, "ह्या time ला रेडिओ ला जुनी गाणी लागतात, छान वाटतं ऐकाला, मला वाटलं तुला पण आवडेल म्हणून रेडिओ लागतो का बघत होतो". 
तेजू, "तू गाडी चालव, मी लावतो रेडिओ".
RHTDM मधला टगाणं लागलं "दिल को तुम्से प्यार हुआ ,पेहली बार हुआ".

The best track those days. RD was just blushing a lot.

"तू फुटबॉल टीम चा कॅप्टन आहेस ना?"
"तु मला ओळखतेस म्हणजे "
"मला खेळाबद्दल जास्त माहिती नाही, पण हो मी तुला ओळखतो".
तिने सांगितले की तिचे घर पुढच्या वळणावर आहे, छोटासा प्रवास जवळजवळ संपत आला होता आणि रेडिओ चा गाणं पण.
RD ने तेजूच्या घराच्या समोर गाडी थांबविली
दोघेही गाडीबाहेर आले.
तेजू "धन्यवाद राजशेखर सर"
No Formalities आणि हा फक्त RD म्हणा, आवडेल मला"
"ओके सर, I mean RD ".

तेजू ने Shake-Hand साठी हात पुढे केला (RD त्याचीच वाट पाहत होता).
"Thanks & Good Night" दोघेही एकाच वेळी म्हणाले.
Co-incidence are funny & smile is the most honest type of emotion, specially when the cheeks are red & Pink.

तिने डोके लाजून हलवले आणि ती घर कडे निघाली. 
ती कंपाऊंड गेट बंद करणार होती, तोपर्यंत "तेजू"
"काय झाले?"
"काही नाही, सुकन्या मॅम ला फोन कर, की तू घरी पोहोचली म्हणून".
तिने होकारार्थी मान हलवली.
RD पहिला कॉलेज आणि जेऊन वसतिगृहात पोहोचला.
हि रात्री मोठी असणार होती. RD च्या डोळ्या समोर एक सारखा Flash-Back चालू होता.

पुढचा दिवस देखील RD साठी गुलाबी होता. त्या दिवशी तो एकटाच होता. Library मध्ये थोडा वेळ कसातरी काडून तो कॅन्टीन मध्ये आला. काउंटर वर अभि मालक बसले होते. त्यांच्या गप्पा चालू त्या तोपर्यंत तिथं तेजू  तिच्या मैत्रिणींच्या सोबत आली. 
RD ने तिला पाहिले. RD ची  नजर अभि दादा ला चुकवून तेजू कडेच होती, आता बघेल मग बघेल, हेच चालू होतं. तेजू ने चहा साठी म्हणून अभिदादा कांदा बघितला आणि शेजारी बसलेला RD तिच्या नजरेस पडला. तेजस ग्रुपने वेटरला ऑर्डर देण्यास सांगितले आणि दरम्यानच्या काळात प्रथम डोळा संपर्क आला.

"Blush-Blush-Blush", one word to express the scenario.

काहीतरी झाले होते, दोघेही एकमेकांकड नजर चुकवून बघत होते न्हवते. RD ने अभि ला विचारले  त्याला मुलींना ओळखतॊस काय..?? "तुला का पाहिजे माहिती?? घरात सांगू काय " अभि-दादाकडून पहिला प्रश्न. "फक्त असंच ओ मालक, बाकी काही नाही". कॉलेज च्या एक आणि एक विध्यार्थी ची माहित असण्याचे ठिकाण म्हणजे कॉलेज कॅन्टीन. अभि ने RD ला किरकोळ, पण कामाची माहिती दिली.


The Friendship Bond:

RD Project च्या कामात व्यस्त होता आणि तो नेहमी कॉलेजमध्ये उशीरा थांबत असे. 
त्याचा ग्रुप एकदम  खोडकर होता, त्यांनी कॉलेज च्या Principal कडनं पण एकदा पार्टी घेतली होती, त्यांना पण सोडलं नाही.

कॉलेज चा परिसर मोठा होता आणि सगळ्या गेट वर Security असायची.
कधी कधी काहीजण गडबडीत गाडीची किल्ली गाडीला विसरून जायचे. Security गाडी नंबर नोटीस बोर्ड वर लिहायचे आणि त्यांना किल्ली परत द्यायचे. 
RD चा ग्रुप security कडून किल्ली घ्याचा आणि नोटीस बोर्ड वर त्याच्या क्लास च नाव टाकायचा.
"Bike no. XXXX Keys found, Contact BE Class"
ज्याची कुणाची किल्ली सापडेल त्याच्या कडनं हि सगळी कार्यकर्ते Penalty/ दंड म्हणू Treat (किरकोळ पार्टी) घ्यायचे. कोण ना कोण तर २-३ दिवसात सापडायचंच.

एक दिवस RD ग्राउंड वर फुटबॉलचा सराव करत होता. बाकी सगळे मित्र एका Paper Presentation event ला गेले होते. Security सापडलेली किल्ली घेऊन RD कड आला. Security ला या कामाचे किरकोळ खर्च म्हणून त्याला ५०-१००/- मिळायचे. RD ने किल्ली बॅग मध्ये ठेवली आणि सराव चालू ठेवला. थोड्या वेळाने २ मुली ग्राउंड कड आल्या. RD सराव मध्ये गुंग होता. 
त्याला आवाज ऐकू आला "RD सर". त्याने वळून पहिले. त्यातल्या एकीने हाताने गाडीच्या किल्लीच इशारा केला. RD ने त्यांना ग्राउंड वर बोलावलं. त्या जश्या जवळ येऊ लागल्या, RD ला चेहरा ओळखू लागला. त्यातली एक तेजू होती. त्या ग्राउंड वर RD जवळ आल्या. RD चं लक्ष्य तेजू कड होता आणि तेजू च देखील. RD बोलणार इतक्यात, "सर, माझा गाडीची किल्ली राहिली होती गाडी ला, ती तुमच्या कड आहे ना", तेजू बरोबर ची मुलगी म्हणाली. हे वाक्य ऐकून झाल्यावर RD चा एक  "Standard dialogue" होता.

"हे खरोखरच निष्काळजी वागणं आहे, कोण गाडी चोरली असती तर, कितीला पडलं असतं हे... !!". 

"मी किल्ली देतो, पण त्या बदल्यात तुम्हाला दंड म्हणून आमच्या ग्रुप ला किरकोळ पार्टी दद्यावी लागेल". पार्टी म्हणजे कॅन्टीन मध्ये किरकोळ नाश्ता असायचा. ती मुलगी हि इतरांसारखी हो म्हणाली, कारण दुसरा पर्याय नसायचा. RD ने तिला किल्ली दिली. दरम्यान, तेजू एक शब्द पण नं बोलता RD कड बघत होती. खरंतर RD ला पण हे जाणवले होते, पण त्याने मुद्दाम बघून नं बघितल्या सारखे केले. त्या किल्ली घेऊन परत जाऊ लागल्या. RD हाता मध्ये पाण्याची बाटली घेऊन उभा होता.  त्या थोड्या लांब गेल्यावर RD ने तेजू ला हाक मारली. तेजू पण त्याचीच वाट बघत होती. त्या मागे वाळल्या. RD ने त्याच्या कडे परत येण्याचा इशारा केला. दोघी चालू लागल्या.
RD ने तेजू कडे बोट दाखवले आणि फक्त तूच ये असं सांगितलं.

"ती तुझी खास मैत्रीण आहे काय, असली तर सांग, पार्टी ची गरज नाही".
"हो खास मैत्रीण आहे, पण बाइक तिची नाही, माझी आहे". 
RD हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं, पण तेजू असं का म्हंटली त्याची उत्सुकता लागून राहिली.
"खोटं का बोललीस तू, माझी भीती वाटते काय..??".
"तसं काही नाही, असंच . बघू म्हंटलं तुमचं इतरांशी वागणं कसं आहे ते", तेजू जरा हसली.
"पण मी पार्टी देतो, पण फक्त तुला , OK, गर्दी नको".

RD ने फ़ुटबाँल सराव करून जेवढे हृदयाचे ठोके वाढले नसतील, तेवढे हे वाक्य ऐकून झाले.

छोटीशी पार्टी  कॅन्टीन मध्ये करायची असं ठरलं होतं. आयुष्यात जश्या बऱ्याच गोष्टी ठरल्या प्रमाणे घडत नाही, कारण जे घडायचे ते आधीच ठरलेलं असतं.
(Everything is Written- जिंदगी मिलेगी ना दोबारा) तसं इथं देखील झालं.

आपला हिरो तयार होऊन आला, एकदम सटा-सट "Gillet look", Deo-Spray आणि त्या वर मित्रा कढणं  घेतलेला Perfume.

थोड्या वेळाने तेजू कॅन्टीन मध्ये आली.





दोघांचे डोळे एकमेकाला शोधत होते. "what you seek is seeking you-Rumi".




पहिली भेट असली ना, कि एक विलक्षण ओढ़ किंवा जी आतुरता असते, ती दोघांच्या डोळ्यात दिसत होती.

त्या गर्दीत शेवटी नजरेला-नजर भिडली. तेजू ने डोळे मोठे करून डोळ्यांनी " अरे कुठे आहेस तू, मी शोधत आहे तुला?".

RD ने एक भुई उडून आणि गालातल्या गालात हसून, तेजू छान दिसत आहे असा इशारा केला.
तेजू जराशी लाजली.

RD ने लांबूनच, डोळ्या ने इशारा केला. कॅन्टीन मध्ये तेजू च्या मैत्रिणी तर होत्याच, त्यात भर म्हणून RD चा आखा ग्रुप पण तिथं होता.
RD ने तेजू ला लायब्ररी मध्ये जाण्याचा इशारा केला. 
दोघे ही तिथून कुणालाच ना कळत, बाहेर पडले.
"काय टाईमिंग आहे, दररोज कॅन्टीन मोकळं असतं, पण आज जत्रा आहे तिथं..!!"
"इथ तर, आपल्याला नीट बोलता पण येणार नाही", RD म्हणाला. 
"बघ ना", तेजू नाराज स्वरात म्हणाली. 

RD थोडंसं दबक्या आवाजात म्हणाला "बाहेर कुठंतर जाऊया काय, तुला काही हरकत नसेल तर..!!".
तेजू ने मान नं हलवता, फक्त डोळे RD कड फिरवले आणि पुन्हा समोर पाहू लागली.
तसा विचार तेजू च्या पण मनात आला होता, पण बोलू का नको बोलू..!!
Teju was a dual state of mind, here heart was willing to go, but the mind wasn't.

"लेकिन बात जब प्यार कि हो, हमेशा दिल कि सुनो"

RD ला पण कळेना, काही उत्तर नाही. वातावरण जरा Normal करायचा म्हणून आपण इथंच थांबू अअसं म्हणणार होता , तोपर्यंत.... 

"चालतंय की", तेजू म्हणाली.

RD डायरेक्ट चंद्रावर.ते शब्द ऐकून त्याच्या पोटात फुलपाखरू उडू लागली. 

"तुझी गाडी कुठं आहे..??"
"पार्किंग मध्ये आहे".
"चल मग".
तेजू पार्किंग मधनं गाडी घेऊन अली.
"तू चालव, मी बसते माग".
RD ने गाडी घेतली.

This was the very first time, that a girl had sat behind him on a Bike.

"पण आपण चाललोय कुठं?"
"तुला कळलंच ग..!!"
तो छोटा प्रवास चालू झाला.
तेजू दर २ मिनिटांनी विचारत होती, "कुठं चालतोय आपण??"
पण RD एकदम शांत , काहीच उत्तर नाही. रस्ता तेजू च्या ओळखीचा होता, पण तिला काही कळायला मार्ग नाही.
जरा वेळाने RD ने गाडी मुख्य रस्त्या पासून गाडी आत घेतली. ती direct एका तलावा जवळ येऊन थांबवली.
"उतारा कि मॅडम, अपनी मंजिल आ गायी".जसे अपेक्षित होते, तेजू इकडे-तिकडे बघू लागली, म्हणजे नेमका ठिकाण कोणतं, शेजारी वर्दळ आहे का ,,,,,जे साहजिक होते. 

"किरकोळ का असेना, public असतंय इथं, Tension घेऊ नका".
तेजू हलूच गालात हसली.
तलावा जवळ एक मोठं पिंपळाचं झाड होतं, दोघं तिथं जाऊन बसले.
तेजू एका दगडावर बसली, RD शेजारी उभा होता.

RD ने छोटे छोटे दगड घेतले आणि तळ्यात टाकू लागला.
तसं बघायलाग गेलं तर दोघे हि बोलणारी माणसं, पण आज सगळं कसं शांत शांत होतं.
RD ने फेकलेल्या प्रत्येक दगडाचा आवाज सगळी कडे घुमत होता.

"दगडं संपतील आता बसा खाली". 

RD ने एक शेवटचा दगड एकदम लांब फेकला आणि तेजू समोर येऊन बसला.
एकदम शांन्ततः होती.

१ मिंट झाला.... 
२ मिंट झाली..... 
५ मिंट झाली....

एकपण शब्द नाही, फक्त एकमेकाची नजर चुकवून, एकमेकाला बघणे चालू होते.
Eyes were doing all the  talking. 
RD नजर खाली घालून हाताने माती मध्ये गोल काडत होता, हे तेजूच्या हि लक्ष्यात आलं होतं. 
"मी तुला इतकं शांत कधी नाही पाहिलं...!!"
"तसं काही नाही, मी शांत पण असतो कधी कधी , फक्त आता बोलायला शब्द मिळेना झालेत...!!"
हे ऐकून तेजू हसली. तेजू ला डाव्या बाजूला सुळा दात होता, जो हसला कि दिसायचा.
RD ते हास्य एकदम मोहक वाटत असे.

तेजू केसाची बट कानात अडकवत म्हणाली,"बोल रे निवांत, जे काही बोलशील हे फक्त आणि फक्त आपल्यात राहील".
तिनं RD चा हात as a gesture म्हणून पकडला आणि इशाऱ्या ने विचारला प्रश्न विचारला.
RD ने मान डोलवली आणि दोन्ही हातानी तिचा हात पकडला.
दोघांना हि त्या स्पर्शातला उबदार पणा जाणवला.

एका मागे एक, गोष्टी संपत न्हाव्त्या. शेतात जस एका पांदीतून पाणी खळखळत सुटते तसं हे मनाचे पाणी हि सुटले होते. एक सर भरली कि दुसरी, दुसरी झाली कि तिसरी.

बोलता बोलता वेळेचं भान देखील राहिलं नाही. They eventually sat there for more than 2-3 hours. मनाचे दरवाजे उघडले होते आणि मनमोकळ्या पणाने भावना वाहत होत्या, मैत्री चा पाया भक्कम होत होता.

जेव्हा आपलंसं वाटणारं माणूस आपल्या जवळ आपल्या समोर असतं, वेळेचं भान राहत नाही.

कारण आपण त्या क्षणी खरं आयुष्य जगत असतो. सूर्य जेव्हा मावळू लागला तेव्हा, त्यांना वेळेचं भान आलं. तसं बघितलं तर दोघांना हि तिथून हलायची इच्छा न्हवती, पण ते इथे असल्याचं कोणाला माहित न्हवतं.
"त्या दोघांसाठी तो एक अविस्मरणीय दिवस होता".
दोघेही कॉलेज टाइम मध्ये कॉलेज वर परत आले आणि तिथून दोघे आपल्या मार्गी लागले.दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले होते. तेजूच्या घरचा आणि RD चा हॉस्टेल चा.
इतरांसाठी तसा तो एक सर्व-साधारण दिवस होता, पण ह्या दोघांसाठी तोच एक आठवणींचा साठा झाला होता. ती संध्याकाळ एकदम रमणीय होती, दोघेही दिवसा झालेली बोलणी आठवत होती. 
फोन करू का नको, एकाच प्रश्न दोघांना पडला होता. ती रात्र तशीच हळुवार मावळली.

ते आता चांगले मित्र झाले होते आणि बर्याचदा भेटायचे ,शक्यतो कॉलेज मध्ये. 
RD weekend हॉस्टेल मध्ये घालवायचा एके दिवशी त्याला हॉस्टेल वर फोन आला.

"हॅलो RD...!!". कोण बोलताय हे सांगण्या आधी RD ने ओळखले कि तो आवाज तेजू चा होता. तो एकदम आनंदित झाला.
तेजू चे आई-वडील बाहेर गावी गेले होते, ती घरी एकटीच होती. फोने तसं-तास चालू होता.

दोघे हि बोलण्यात "Charmer" होते आणि एकमेकाला समजत होते.
हे "Calling-Calling" केवळ सुरूवात होती, जी पहिला Weekend to weekend चालू झाली, नंतर ती जवळ पास रोज-च्या-रोज होऊ लागली.


>>>>>>>>>> भाग  समाप्त<<<<<<<<<<

Link to Next Chapter






गुलमोहर_भाग-२: राजशेखर

राजशेखर 
(आपल्या कथेचा नायक)

राजशेखर तानाजी देशमुख: जन्म आणि कर्म भूमी सांगली. ह्यांचं जरा वेगळं आहे.
राजशेखर हा सांगली जवळील एका छोट्या गावात वाढलेला पोरगा. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचा एकुलता एक लेक. छोटे कुटुंब  होतं.

वडील : तानाजी बाबुराव देशमुख (शेतकरी)
आई  : वैशाली ( शेतकरी )
मुलगा: राजशेखर, आपण त्याला RD म्हणू.

प्रत्यक्षात RD चं प्रचंड मोठं कुटुंब आहे. सांगलीवाडीत देशमुख हे सुप्रसिद्ध नाव होते.
त्यांचा "देशमुख वाडा" अख्या गावात प्रसिद्ध होता . एका घरात एकूण 32 कुटुंबे. (32 उंब्रे)
पण आपल्या इतिहासा प्रमाणे "भावकीची भांडण". वाडा वेगळा झालेला आणि त्या प्रमाणे इतरही वाटण्या झाल्या होत्या.

तानाजींनी बाहेर पडण्याचा आणि पुन्हा कधीही त्यांचा चेहरा दिसण्याचा निर्णय घेतला नाही. त्यानंतर ते कधीही देशमुखांच्या वाड्याकडे गेले नाहीत.
त्यांनी त्यांच्या शेतात छान असं आपल घर बांधलं. एकंदरीत ते प्रेमळ, काळजी घेणारे आणि छान कुटुंब होते.

RD एकदम special होता आणि विशेषतः त्याच्या पालकांसाठी कारण "नवसाचं पोर" होतं.
आई वडिलांनी त्याला लहानपणा पासून फार लाडाने वाढवले होते.
RD चं घर देखील RD प्रमाणे Special होते.
गावा कड घर बांधताना,  सुटसुटीत काम असतं कारण, "Whole वावर is Our".







मुख्य प्रवेशद्वारातुन आत गेल्या वर मोकळी जागा, ज्याला आपण "Open to Sky" म्हणतो. उजव्या बाजूला धान्य भांडारहोता , ज्या मध्ये धान्य, गहू, तांदूळ इत्यादी दोन-तीन मोठे कंटेनर होते. आत गेल्या गेल्या चौरस होता. एक बाजूला मुख्य द्वार आणि बाकी ३ बाजूला ४-५ पायऱ्या होत्या. मोकळ्या जागेत पाण्याचा एक हौद होता आणि सुरेख असा "तुळशी चा कट्टा".




स्वयंपाक घर मुख्य प्रवेशद्वारच्या डाव्या बाजूला होतं आणि त्या नंतर घराच्या परिक्रमा मध्ये २-३ शयन कक्ष होती.

याशिवाय एक आकर्षण म्हणजे एक छान असा "सागवानी झोपाला" होता. RD  ची आवडती जागा. शौचालय मागील बाजूस घराबाहेर होते. संपूर्ण घराला लाकडी खांब होते.



तानाजींनी त्यांच्या कुटुंबासाठी स्वप्नातले घर बांधले होते.

त्यांचा “गोठा” घरा शेजारी होता.गोठ्यात बरेच प्राणी होते"

2 म्हशी, 1 गाय, एक जोडी बैल, ४ शेळ्या, एक डझन कोंबड्या आणि एक कुत्रा "वाघ्या".

वैशाली RD ची आई, RD च्या वडिलांपेक्षा जास्त शिक्षित होती. त्याकाळी स्त्रियांनी नोकऱ्या पण कमी होत्या आणि त्यात भर म्हणून त्यांच्या घरी माणसं फक्त ३. तरीपण त्या तानाजींना शेतीत पूर्णपणे मदत करायच्या.

एका शेतकरयांची बायको कधीच फक्त "गृहिणी" नसते, तिला घर आणि शेत दोनीही बघावे लागते.

ती घर आणि शेती दोनीही व्यास्तीत सांभाळायची.

RD एकुलता मुलगा होता. त्याची मावशी म्हणजे वैशालीची छोटी बहीण त्यांच्याबरोबर रहायची. आई वडील शेतात गेले कि मावशी त्याची काळजी घेत असे.

RD च्या परिवार बरोबर त्यांच्या शेतात काम करणारे कुटुंब देखील.  त्यात माणिक, त्यांची पत्नी अक्का आणि मुले अशोक आणि उषा होत्या. अशोक RD च्याच वयाचा होता.

RD ७वी पर्यंत गावातील मराठी शाळेत गेला . मग माध्यमिक शाळा सांगली येथे होती.
सकाळची शाळा आणि नंतर शेत, असा दिन क्रम होता.

RD चांगला खेळाडू होता. तानाजी स्वत: एक कुस्तीपटू होते म्हणून त्यांनी RD ला लहान पण पासून आखाड्याची सवय लावली होती. RD नियमित पाने तालीम करायचा. शाळा पूर्ण करून RD नं , सांगली मधनं १२ विज्ञान पूर्ण केले. तानाजी कधीही देशमुख वाड्याकडे गेले नाहीत, परंतु नाते-संबंध अखंड होते. सना-सुदीला सर्वांची भेट होत असे.

RD फुटबॉलचा चा मोठा शौकीन होता. आधी शाळा नंतर कॉलेज च्या फुटबॉल टीम मध्ये होता. त्याने युनिव्हर्सिटी पातळी वर १८ वर्षाखालील संघात सहभाग केला होता.
RD ला १२वी चांगल्या मार्कांनी पास झाला.
तानाजींनी RD ला सांगितले होते, तुझा शिक्षणाचा निर्णय तू आणि वैशाली ने घ्यावा, जो काही असेल त्याला माझी संमती असेल.

त्या दिवसांत आयटी (IT) क्षेत्र जोरदार चालू होतं आणि त्याला बरेच विद्यार्थी आकर्षित झाले होते. आरडी त्यापैकी एक होता. विद्यापीठातील खेळाडू असल्यामुळे RD ला Sports Quota मधून प्रवेश मिळाला.

तानाजी आणि वैशाली अभिमानी पालक होते. RD आज्ञाधारक मुलगा होता. आजपर्यंत त्याने आपल्या पालकांच्या प्रत्येक शब्दाचे पालन केले होते.
कपडे, केसांची शैली, सवयी आणि जे काही असेल ते , त्याने आईच्या म्हणण्यानुसार केले होते.
तानाजींनी RD ची जवळपास एक आणि एक इच्छा पूर्ण केली होती, तरीही RD ने कधीच कश्याची तक्रार नाही केली.

त्याला कॉलेज ला जाताना Bike हवी होती,
त्याला फुटबॉल खेळायचा होता कुस्ती नाही,
त्याला सणासुदीला म्हणजे दिवाळी ला देशमुख वाड्यात जायचे होते, परंतु त्यांनी कधीच तक्रार केली नाही.
आई-वडिलांनी केलेल्या कष्टांची त्याला जाणीव होती.

RD चा इंजिनीरिंग प्रवास नुकताच सुरू होणार होता. त्याला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता जो त्याच्या घरापासून दूर होता.

आपल्याला माहित आहे की ती व्यक्ती कोण आहे, जो सर्वात जास्त दुःखी, व्यथित आणि दुःखी असेल त्या व्यक्तीला सोडून "वडील". आई तिला जे वाटते ते सांगते, व्यक्त करते , परंतु एवढं भाग्य वडिलांच नाही. आईपेक्षा ती अधिक नाजूक वडील असतात , पण बाप रडत नाहीत, तो कधीही त्यांच्या मनातून बोलू शकत नाहीत, ते व्यक्त करत नाहीत. जसे तानाजी होते.

RD चा निगण्याचा दिवस आला.
वैशाली संपूर्ण रात्री रडत होती आणि तानाजी तिला समजावत होते.
जन्मल्या पासून RD त्यांच्या डोळ्यांपासून कधीही दूर न्हवता.


Most difficult part in life, is the absence your loved once.

जीवनात सर्वात कठीण क्षण  आपल्या आवडत्या व्यक्तीची अनुपस्थिती.

संपूर्ण देशमुख कुटुंबासाठी ही एक कठीण परिस्थिती होती. परंतु हीच कुटुंबाची सुंदरता असते ,Nuclear Chain, एक आणि एक धागा जोडलेला. एका गावातला मुलगा आता एक मोठ्या शहरात निघाला होता. जेव्हा तो गावातून निघत होता तेव्हा संपूर्ण देशमुख (संपूर्ण 32 कुटुंब) एकत्र होते, ते असे काहीतरी होते जे कधीच झाले न्हवते, कारण माहित आहे, RD was the Missing Link. सगळ्यांना जोडणारा धागा RD होता.

RD न आपल्या घराला एक शेवटची फेरी मारली.

तो सगळं डोळे भरून बघत होता, त्याच घर, शेत, गायी, मेंढी आणि शेवटला भेटला त्याचा आवडते मित्र "वाघ्या". RD वाघ्या जवळ ५ मिंट शांत बसला.

I personally believe Dogs connect very honestly, they do understand emotions 
with any words.

त्याने आई च्या डोळ्यांत बघण्या आधी एक मोठा श्वास घेतला, आई शी नजर मिळवताच आई ढसा-ढसा रडू लागली. वैशालीने त्याला कवटाळले.भावना डोळ्यां मार्गे वाहत होत्या. त्याने आपल्या पालकांच्या पाया पडला. तानाजींनी पापणी पण हलवली नाही, ना ते काही बोलले, नाहीते रडले, ते फक्त शांत निशब्द उभे होते.


RD चा प्रवास चालू झाले, नशिबात पुढे काय वाढून ठेवलाय हे त्याला माहित न्हवते.



>>>>>>>>>> भाग २ समाप्त<<<<<<<<<<

Link to Next Chapter




Wednesday, 22 May 2019

गुलमोहर_भाग-१: दीपशिखा

कधी कधी प्रेम मिळायला आयुष्यं कमी पडत, पण कधी कधी एका वळणावर हवं असलेलं प्रेम क्षणात मिळून जातं.

It’s never too late to write your First story....!!!


An honest attempt to write a long literature, please have patience while reading.


हि कथा आणि त्या मधील सर्व पात्र जवळ-पास काल्पनिक आहेत.

पण मी स्वतः लिहीत असल्या मूळ, त्यावर बऱ्याच जीवित पात्रांचा प्रभाव दिसेल.
Being a writer, you can enjoy the liberty. तुम्ही स्वत:ला कुठेतरी कथे मध्ये नक्की अनुभवाल.

सारांश:

ही कथा एक Arranged-Love Marriage आणि त्याच्याशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींविषयी आहे अपने स्टोरी की हेरॉईन हे "दीपशिखा" आणि हिरो आहे "राजशेखर".
कथा 2000 सालची आहे, जेव्हा नाती , वेळ आणि प्रामाणिकपणा यासारख्या गोष्टी महत्त्वपूर्ण होत्या. 

दोन व्यक्ती, दोन वेगळी आयुष्य, दोन वेगळे प्रवास, दोन वेगळे अनुभव आणि एक छोट वळणं.

कधी कधी प्रेम मिळायला आयुष्यं कमी पडत, पण कधी कधी एका वळणावर हवं असलेलं प्रेम क्षणात मिळून जातं.


भाग-१: दीपशिखा

(आपल्या कथेची नायिका)

आपल्या कथेची नायिका "दीपशिका" यापुढे तिला आपण "दीपू" म्हणू,  ती इतरांसारखीच होती, ९० च्या दशकातली एक सामान्य मुलगी.


दिपू चे डोळे एकदम मोठे आणि चमकदार होते. 
Silky केस , तिला आई दररोज दोन शेंड्या बांधत असे.
डोक्यात एक छान पट्टा आणि कानात छोटेशे मणी.

तिला टिकली फार आवडायची. लहानपणा पासून तिला नट्टा-पट्टा फार आवडत असे आवडत असे.

दीपू तेव्हा शाळेत होती. दिपूच्या परिवारात बरेच सदस्य होते. संयुक्त परिवार (Joint-Family) ही गोष्ट जी आज जवळजवळ विलुप्त होत आहे, ही त्या वेळी सर्रास होती.

दिपूच्या च्या घरी बरेच सदस्य होते:

आजोबा (सवंत्रसैनिक आणि एक आदर्श शेतकरी),
आजी (गृहिणी),
वडील (रमेश पाटील- बँक मॅनेजर),
आई (प्राथमिक शाळेतील शिक्षिका), 
काका- वडिलांचे मोठे भाऊ (Ex-Army)
काकी (गृहिणी) आणि त्यांची मुले.

ते एक सामान्य महाराष्ट्रीय कुटुंब होते.

दिपू चे काका , निवृत्त भारतीय सेना अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते दीपुच्या आजी-आजोबां सोबत "पाठ-पन्हाळा" येथे राहत होते.
दिपू चे वडील त्यांच्या बँक नोकरीमुळे "कोल्हापूर" मध्ये असत.

"कोल्हापूर" मध्ये पाटील कुटुंबांचे अतिशय छान आणि सुंदर घर होते. जवळ पास ६० वर्षां पूर्वीचं कोरलेल्या ३'६" भिंतीच बांधकाम होतं.

Ground floor ला एक छोटा प्रतीक्षा कक्ष, 400 चौ. फुटांपेक्षा मोठा HALL, पूर्वेकडे एक छान मोठा स्वयंपाकघर, ज्याच्या दारात एक छान असा तुळशी कट्टा होता. 2 मास्टर बेड आणि २ REGULAR बेडरूम  होत्या . घराचं एक आकर्षण म्हणजे त्यात १० x १० फूट इतक मोठ पूजागृह होतं. दिपूच्या वडिलांनी नंतर एक मजला वाढवला, ज्यात ४ bedrooms , एक मोठा hall & टेरेस होतं. आजोबानी स्वप्नातील एक घर तयार केले होते. 

दिपू ला वेगळे बेडरूम होते, ती तशी नशीबवान होतीच.

घराचं नाव "गुलममोहर" होतं . घर च्या सभोवताली बरेच झाडं होती.

2 हापूस आंब्याची, 2 गोटी आंब्याची, पांढरा पेरू, लाल पेरू, सीताफळ, चिक्कू, आवळा, नारळाचे 3 झाड आणि प्लॉटच्या पुढच्या बाजूला अशोकाची झाडे होती ह्या व्यतिरिक्त मुख्य आकर्षण होते ते म्हणजे "गुलमोहर" च झाड, जे असा म्हणतात कि दिपूच्या घर पेक्षा ही जुनं आहे. म्हणून आजोबानी घराचं नाव "गुलमोहर" ठेवलेलं. गुलमोहर इतका मोठा होता कि, १००० यार्ड वरून तो सहज दिसायचा.

गुलमोहर मध्ये एक विहीर पण होती, जी बांधकामाच्या वेळी बांधण्यात अली होती. थोडक्यात काय, गुलमोहर म्हणेज प्रेम, करुणा, दयाळूपणा आणि अत्यंत कठोर परिश्रम करून दिपूच्या आजी-आजोबांनी बांधलेले एक घर होते.


अपने स्टोरी कि हिरोईन, शाळेत एकदम लोकप्रिय होती (हिरोईन हे , she has to be smart right). शिक्षकांची मुलगी असल्यामुळे ती हुशार पाहिजेच...??
लहान असताना आपल्याला तथाकथित समाजाकडून पुष्कळ अपेक्षा सहन कराव्या लागतात आणि आपल्या पालकांच्या व्यवसायावर बरेच अवलंबून असते. जसं कि शिक्षक, डॉक्टर, सरकारी अधिकारी इत्यादी. असो ते सोडा आपली स्टोरी राहील बाजूला.

दिपू मराठी शाळेची विद्यार्थी होती, Co-Education न्हवते. ती अभ्यासात हुशार होती. नेहमी जागृत, आज्ञाधारक आणि प्रामाणिक. ती तिच्या वर्गाची मॉनिटर होती.

ती SSC with Distinction पास झाली, तिचे  संपूर्ण कुटुंब आनंदी होते. दीपक तिचा भाऊ 12 commerce ला होता , तो देखील चांगल्या मार्कनी पास झाला. दीपक त्याच्या वडिलांच्या पायऱ्यांवर पाय ठेवणार होता. त्याचा उद्देश CA करून वडिलांप्रमाणे नोकरी चा होता. 
पण दिपू च शिक्षणा बद्दल पुढे काय करायचं हे दीपूला ठाऊक नव्हते Result नंतर दिपूच्या शिक्षणाबद्दल एक दीर्घ कौटुंबिक बैठक झाली. 
दिपूचंही इतर मुलांसारखं होतं, जे मित्र करतील ते आपण पण करायचे, (तू करणार, मी पण करणार मग..!!) 
ते वर्ष 2000 चे होते, जेव्हा आयटी क्षेत्र भरभराटीचं होतं. बर्याच कौटुंबिक सदस्यांनी तिला अभियांत्रिकी करायचा सल्ला दिला. 
रमेश पाटील (RP) - दिपूचे वडील,  एक नम्र आणि शांत  व्यक्ती होते आणि इतर वडिलांप्रमाणे त्यांचं त्यांच्या मुलीशी घट्ट नातं होतं.
दीर्घ चर्चेनंतर, शून्य निष्कर्ष निघाला. सर्वानी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला की दीपू दोन्ही group घेणार (Maths & Science).
ज्या विषयात जास्त Mark , त्यानुसार पुढचा प्रवास.

RB ने आपल्या मुलीच्या अभ्यासासाठी पुरेशी बचत केले होती. त्या बैठकीत ते काहीच बोलले नाहीत. नंतर दिपू एकटी असताना तिला ते म्हंटले "तु सगळ्यांना फक्त हो म्हणत जा, जे काय आहे ते आपलं आपलं ठरवू . ठिक आहे. तुला जे आवडेल तु तेच कर आणि कधीही काहीही लागलं तर बाबा आहेतंच ना" हे RB चे शब्द होते, ज्या मूळ नेहमीच दिपूला प्रोत्साहन आणि आत्मविश्वास द्यायचे.

दिपूला शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. ठरल्या प्रमाणे तिने दोन्ही Group (PCMB ) घेतले. वेळ पटापट जातो आणि दीपू 12 व्या परीक्षेत दोन्ही group मध्ये चांगल्या Marks नि उत्तीर्ण होते. ती वडिलांना सांगते की तिची महत्वाकांक्षा Medical Field आहे , Engineering नाही. दिपू RP ची लहान परी होती, त्यांनी आजपर्यंत दिपूची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती, ते तिला नाही म्हणू शकतच न्हवते.

दिपूचे BHMS Doctor होण्याचे भाग्य आता ठरले होते

>>>>>>>>>> भाग 1 समाप्त<<<<<<<<<<