The day since I have been writing, there’s a Jinks (My personally belief), If I write something about a friend of mine or a known person, they somehow tend to disappear from my life. So, even though I have a lot to write, I limit myself to the subject. I am at such stage of life that, I have a limited number of people around & I don’t want to lose even one of them. However, the writeup which I am about to write is also based on a close person, but she is already tooooo far from me & she cant disappear more then she already has. So, I m planning to take the risk this time.
आई नंतर सर्वात महत्वाचा दोन अक्षरी शब्द , ज्यात आई ची माया, मावशीची छाया, वडिलांचं प्रेम आणि सर्व नात्यांचा गोडवा असतो, तो म्हणजे "मामी".
काही नाती रक्ताची नसतात, पण रक्ताच्या नात्याच्या पलीकडे असतात.
एक छोटासा प्रयत्न अश्याच एका व्यक्ती साठी आणि आमच्यातल्या नात्या विषयी.
कोल्हापूर- आमचा जिव्हाळी चा विषय. जन्म कोल्हापूर, धर्म कोल्हापूर आणि कर्म पण कोल्हापूरच.
माझं शाळे पर्यंत चा प्रवास राजारामपुरी मध्ये गेला, नंतर आम्ही उचगाव ला स्थलांतर झालो.
शहरी भागातून थेट ग्रामपंचायत मध्ये. आमची तशी छोटीच कॉलनी होती, जेम-तेम १५-२० घरे.
माझा वयाची बरेच पोरं होती, So कॉलनी मध्ये वेळ छान जायचा. प्रत्येक कॉलनी-एरिया-गल्ली मध्ये आपल्या घरा नंतर आपलंसं वाटणारं एक घर असतं. आमच ते घर म्हणजे "मामी" चं घर.
> क्रिकेट खेळताना विकेट म्हणजे मामीच्या घरातला स्टूल,
> सायकल चं पार्किंग म्हणजे मामी च घर,
> गप्पा गोष्टी करायला मामी च्या घरचा कट्टा,
> जेवणा नंतर फिरायला मामी च्या दारात,
> मंडळाच्या गणपती चं "सामान-पैसे-वस्तु" ठेवायची हक्काची Official जागा- मामी चं घर,
> मंडळाची मीटिंग -मामी च्या दारात,
> एकूण सांगायचं झाले तर, जसं कोल्हापुरात एक म्हण आहे "अरुण-फिरून गंगावेस"
आमचं सगळं अरुण फिरून मामी कड.
RELATIONS are like SLOW POISON. ते अचानक होत नाहीत, हळू हळू -One moment after another.
कॉलनी मध्ये मामी आमचा एक Eternal भाग होत्या. कित्येक वेळा आम्ही घरी न जेवता मामी च्या घरी जेवलो असेल. कित्येक रात्री आम्ही मामी च्या अंगणात गप्पा मारत घालवल्या.
मामा-मामी ना एकुलता एक मुलगा आहे जो परदेशी असतो, So unlike other parents, ते दोघे त्याच्या सोबत परदेशी गेले.
मला आठवते मी जेव्हा कामा निमित्त बाहेर गावी होतो, मी मामी ना फोन करून आमच्या घरची चौकशी करायचो. मामी न चुकता माझा घरी जाऊन थोडा वेळ थांबून यायच्या.
त्या माझा आणि मम्मी च्या Mediator होत्या. काही संवाद त्यांच्या माध्यमातून होत होते.
आपण म्हणतो ना "Indirect Speech"- तसंच काय तर.
पण मामी was a way of communication with my family, when I was not around them.
आता जेव्हा मी माझा घरी माझा फॅमिली सोबत आहे, पण आज मामी आमच्या पासून फार दूर आहे.
Communication एकदम सोपं आहे सध्या, बटण दाबलं कि व्यक्ती समोर मोबाईल वर दिसते.
पण आपली माणसं समोर बसून बघण्यात जे सुख आहे, ते ऑनलाईन मध्ये नाही.
मी तेव्हा पण, बाहेर जाता-येता मामींच्या दारातून यायचो , तेव्हा दारात हसतमुख मामा-मामी दिसायचे ,
आताही रास्ता तोच, घर तेच, फक्त मामी च्या घराचे बंद दाराचे कुलूप दिसते.
मी वाट पाहतो आहे, मामी परत आमच्यात येण्याची, आज ना उद्या तो क्षण नक्की येणार आणि आम्ही स्वागता साठी तयार असू.
मामी- नात्यांपलीकडची नाती.
