Last working day:
![]() |
| Last Working Day |
रोटी, कपडा और मकान- ३ बेसिक गरजा, मग ह्यात पैश्या प्रमाणे bifurcation आहे.
मोठ्या हॉटेल मध्ये जेवण, ब्रँडेड कपडे आणि टुमदार घरं.
पृथ्वीतलावर तुम्ही कसे ,कुठं ,कधी ,केव्हा आणि काय पण करा, Bottomline "पैसा".
पैसा आला तेव्हा पासूनच कलयुग चालू झाला म्हणतात, ते काय खोटं नाही.
"Everthing is possbile if you have the right amount in your bank account" - पैसे फेक तमाशा देख.
Ugly to Beautiful,
Bad to good,
It can even make society forget your past - पैसा हे तो मुमकिन हे.
पैसे कमवायचे बरेच प्रकार, कमी शिकला असला तर पर्याय भरपूर, Direct काही पण चालू करता येतं.
पण चुकून शिकला असाल आणि त्यातल्या त्यात इंजिनिर असाल तर पर्याय एकच "नोकरी".
हुशार पोरं सरकारी नोकरी माग लागतात, काटावर पास झालेली घरचा व्ययसाय पुढं चालवतात, बाकी राहिला आमच्या सारख पब्लिक,
Above average below Distinction ह्यांची वाईट गोची होते.
ना घरका ना घाट का. चांगल्या नोकऱ्या हुशार पोरं घेतात आणि व्यायसाय करू म्हंटलं तर तिथं पैसेवाले Lobbing करात.
पण after graduation आयुष्यात एकमेव ध्येय असतं, "नौकरी और छोकरी" and these 2 go hand in hand.
Its very rare to get a girl without proper job , however money adds a lot of glory.
नोकरी फार महत्वाची ,त्यामुळं पैसा तर मिळतोच पण additional perks म्हणजे "मान-सम्मान" inshort -Status.
माझी सुरवात पण अश्याच एका छोट्याश्या नोकरी पासून झाली. १ वर्ष मग "Switch" मग आणि १-२ वर्ष परत "Switch".
असं करता करता एका corporate कंपनी मध्ये विसावलो.
कुठं तर वाचलं होतं, "Do the things your like or you have to like the things you do"
Thanks to my parents I had the liberty to do, what I want to do.
नोकरी जेव्हा तुम्ही गरज म्हणून करता, डोक्यावर नेहमी मानसिक ताण असतो, you dont enjoy, you only work.
गोष्टीत एक गोष्टसांगतो: Recruitment:
एक माणूस मरण पावतो.यम त्याला घेऊन वर स्वर्ग लोकात जातो.तिथं चित्र गुप्त त्याचा हिशोब सांगतो आणि २ पर्याय देतो.
बाळ तू बरी-वाईट दोन्ही गोष्टी केल्या आहेस, म्हणून तुला २ पर्याय आहेत, स्वर किंवा नर्क, तू ठरव.
तो माणूस म्हणतो, मला एकदा स्वर्ग आणि नर्क बघुद्या मग मी ठरवतो.
चित्रगुप्त त्याला घेऊन मार्गी लागतो, समोर दोन दरवाजे असतात, "आपण पहिला स्वर पाहू".
स्वर्ग म्हणजे सुख ,स्वर्ग म्हणजे आनंद स्वर्ग म्हणजे मुक्ती असा आपला समज असतो पण
तो दरवाजा उघडतो आणि आत एकदम शांतता. प्रत्येत जण निवांत असतो, कोण पुस्तक वाचत असतो, तर कोणी लिखाण करत असतो ,सगळे कामात मग्न.
"अहो हा कसला स्वर्ग ,काय हे कंटाळ वाणे राहणे, अस तर काहीच मजा नाही".
"ठीक आहे मग आपण नर्क पण बघून घेऊ".
दुसरा दरवाजा उघडला,
अपेक्षा होती नर्क म्हणजे "यमदूत लोकांना मारत असणार, तेलात बुडवून बुडवून हाल करत असणार and so on...!!
पण असं काहीच न्हवते,
पब्लिक फुल enjoy करत होते. मस्त गाणी चालू होती, छान बुफे लावला होता, व्हेज-नॉन-व्हेज सगळं होतं.
गप्पा गोष्टी, खाणे पिणे एकंदरीत vacation मोड होता.
"साहेब नर्क म्हणजे एक वेगळेच चित्र आहे पृथ्वीतलावर, पण हे काय वेगळेच आहे".
इथे क्रूरकर्मा केले तर नर्कात जाल अशी भीती असते सगळ्यांना, पण हे अनपेक्षित आहे.
चित्रगुप्त म्हणतात,"काय निर्णय आहे तुमचा..... दरवाजा एक कि दरवाजा दोन..??'
"शंबर टक्के दुसरा दरवाजा, इथे आयुष्य आहे, मौज मजा आहे. स्वर्ग एकदम शांत आहे, तिथे मला करमनार नाही"
"विचार करून सांगा, एकदा घेतलेला निर्णय बदलता येणार नाही"
"अहो नर्क माझा साठी उत्तम आहे, मी स्वर्गा पेक्षा नरकातच जाईन".
"ठीक आहे, आज रात्री इथे थांबा उद्या तुम्हाला नर्कात प्रवेश दिला जाईल."
दुसऱ्या दिवशी तो माणूस तयार होऊन येतो.
पहिल्या दारा समोर येतो तर त्याला धक्काच बसतो,
हिरवी गार झाडी असते, छानस गाणं चालू असतं, काही लोक झाडा खाली गप्पा मारत असतात.
दुसरी कडे डोळे चमकतील अशी रोषणाई असते,
जेवणाची मेजवानीच असते. गाणं-मस्ती चालू असते.
तो विचारात पडतो, काळ सगळे शांत आणि आज वातावरण एकदमचं वेगळे.
तो विचार करत पुढे सरकतो, त्याच्या साठी दुसरा दरवाजा उघडला जातो.
जसं तो आत जातो त्याला चाबकाचे फटके पडतात.
एक भाला मोठा राक्षस सगळ्यांना मारत असतो.
तो त्याला माणसाला पकडतो आणि दुसऱ्या माणसां बरोबर बांधून घालतो आणि चाबूक चालू करतो.
त्याला काहीच सुचत नाही.
हा प्रकार बराच वेळ चालतो. थोड्या वेळाने तो राक्षस निघून जातो.
त्या सर्वाना कैद्यां प्रमाणे वागणूक मिळत असते.
थोयाच वेळात दुसरा राक्षस येतो, तो एक एक करून त्यांना एका मोठ्या तव्यात गरम तेलात टाकायला चालू करतो.
तोपर्यंत तिथे चित्रगुप्त येतो,
"अहो काळ काय चित्र होतं, आज काय चालू आहे"
"कुठं गेलं ऐश अराम, खाणे पिणे... ??"
चित्रगुप्त शांत पाने म्हणतो, "काल आमची भरती चालू होती.... !!!"
आत आपल्या गोष्टीवर येऊया.
थोडक्यात अशी असते Recruitment. दिखता कुछ हे और होता कुछ हे, मृगजळ सारखे.
![]() |
| काम चले हम |
चांगली कंपनी भेटणे म्हणजे फार नशीब लागते आणि ती भेटते ही, पण त्याहून अधिक, कंपनी मध्ये चांगली लोकं भेटणे ते फार क्वचितच.
ह्या बाबतीत माझं नशीब फार चांगले, जितक्या चांगली कंपनी तितकीच चांगली लोकं देखील मला भेटली.
कंपनी मध्ये आपल्या Wavelength ची माणसं भेटली कि काम पद्धतशीर होते आणि दिवस मस्त जातो.
एक एक दिवस सरल तशी ओळख वाढत जाते.
डिपार्टमेंट मेंबर्स ची ओळख,
मग,
टीम मेंबर ची ओळख,
मग,
प्रोजेक्ट मेंबर ची ओळख,
मग,
मग फ्लोअर मेंबर्स ची ओळख,
मग,
मॅनॅजमेन्ट मेंबर्स ची ओळख,
मग,
क्लायंट मेंबर्स ची ओळख,
आणि अशे बरेच मेंबर्स.
ह्या गर्दीतून, चुकून आपल्या गावाकडचा कोण मेंबर भेटला, तर विषय गोलच एकदम...!!!
"Job will either make or break your personality".
कम्फर्ट झोन च्या बाहेर असतो आपण, so इथे बोलणे-चालणे थोडे वेगळे ठेवावे आणि जपावे लागते.
Company:
It's a home away from home.
Company:
Where u spend the most dedicated time of the day.
Company:
Family away from family.
Company:
Where u mature professionally and personal.
Company:
Not only provides financial stability but also personal stability as well.
Company:
Can bring the best or worst out of you.
People from different backgrounds, opinions & with diverse angle are together for a common goal.
Management मध्ये एक "टर्म" आहे, "Team formation stages"
"Storming, Forming and Norming"
(मी शिकवत नाही पण थोड्यकाय सांगतो.)
Storming:
शब्दशः अर्थ वादळ, वेग वेगळे लोक आले कि दंगा तर होणारच. पहिल्या भेटीतील थोडाफार वादविवाद.
Forming:
फॉर्म म्हणजे तयार होणे. एकच ध्येय असले कि सगळी हळू हळू जुवळुन घेतात.
Norming:
दगड कसा घासून गुळगुळीत होतो तसं, पहिला घर्षण होऊन मग विचार जुळायला लागतात.
एकंदरीत अशी "Team" तयार होते.
![]() |
| Friday Casuals |
ऑफिस मधलं जेवण: जिव्हाळ्याचा विषय.
घरचं जेवण काय असत, आपलं गाव सोडून बाहेर राहणाऱ्याला माहित असते.
ऑफिस मधली सगळ्यात खास माणसं, आपली माणसं, म्हणजे ज्यांच्या बरोबर आपण जेवतो.
हि ओळख होणे फार गरजेचे असते, नितांत गरजेचे.
"U eat a lot, when you eat with the right people". -Neil-The-Story-Teller
प्रोजेक्ट्स चालू बंद होत राहतात, काम कमी-जास्त होत राहतं, पण डब्बा गॅंग तीच राहते.
आपलं गाव जसं मी सोडलं, तसं मी जेवणात चव सोडून दिली. फक्त शारीरिक गरज म्हणून जेवण, बाकी चव वगैरे आपल्या घरी आल्यावर.
मेस चे जेवण खाऊन Acidity सारखं होऊन विष बाधा झाली मला एकदा, तेव्हा पासून आमचा डब्बा ग्रुप ने माझावर कृपा दृष्टी दाखवली.
रोज माझा साठी, त्या सर्वांच्या डब्यात जास्तची (एक्सट्रा) चपाती, भाजी , भात असं सगळं असायचे. ते अशे उपकार ऋण आहे मी फेडू शकत नाही.
ऑफिस मधला अजून एक महत्वाचा घटक- शेजारी- सहकारी-Colleague.
Management principle: "You are the average of the five people you spend the most time with,"
(मानजमेंट नियम: तुमची तुमच्या आस पास च्या पांच माणसांची सरासरी असता.)
म्हणून ऑफिस मधले आस-पास चे शेजारी- सहकारी-Colleague फार महत्वाचे.
आमचे भाग्य आमचे आस-पास चे पाच-दहा-पंधरा सगळेच भारी भेटले.
Negativity attracts Negativity & Positivity attracts Positivity.
घरातून जेव्हा तुम्ही ऑफिस ला जाल, तेव्हा ऑफिस चे वातावरण उत्साही असले तर दिवस बरा जाणतो आणि ऑफिस मधून घरी जाताना पण जर ऑफिस चे वातावरण हशी खुशाली चे असले तर घरात पण बाकीचा दिवस बरा जातो.
घर आणि ऑफिस ह्या दोन वेग-वेगळ्या गोष्टी आहेत, बरेच जण हे मिसळतात.
घर -घरच्या ठिकाणी ऑफिस-ऑफिस च्या ठिकाणी- काहींना घर ऑफिस मध्ये आणि ऑफिस घरात न्ह्यायची सवय असते.
मग घराचे ऑफिस होते आणि ऑफिस चे घर, इथेच खरी गडबड चालू होते, जाऊदे तो आपला विषय नाही.
कॉर्पोरेट नोकरी म्हंटलं की, सगळ्यांना दिसतो, तो पगार आणि दिसत नाही म्हणजे ताण.
मग इथे पगार कमी आहे असं वाटलं कि Switch/ नोकरी बदला किंवा
इथे ताण जास्त आहे असं वाटलं कि Switch/ नोकरी बदला.
(परत वाचा अर्थ लपला आहे ह्या वरच्या वाक्यात.)
![]() |
| 50 SHADES OF CORPORATE DRESSING |
प्रत्येत नोकरी चा क्रम ठरलेला असतो:
१. मुलखात (Interview)
२. नियुक्ती (Appointment)
३. कामावर राजू (Joining)
४. परिचय (Introduction)
५. Project work
६. Client visit
७. Site Visit
८. Paper work
९. Project work
१०. Project work
११. Project work, Project work, Project work, Project work, Project work
हे संपत नाही.
मग पैसे किंवा ताण जास्त झाला कि राम-राम.
इथे आपली मनोरंजक गोष्ट आहे, जेव्हा एखादा व्यक्ती त्याची नोकरी सोडतो, तसं HR डिपार्टमेंट सहजासहजी सोडू देत नाही, पण तरीही तो सोडतो,
तेव्हा एक छान सा कार्यक्रम असतो, त्याला म्हणतात "Send-Off" थोडक्यात "निरोप" अथवा 'जय-महाराष्ट्र".
मेनू फिक्स असतो,
जुनिअर मेंबर असला तर सामोसा-वडापाव झालस तर जोडीला वेफर्स.
जरासा सिनियर असला तर बर्गर आणि वेफर्स.
अजून जरासा सिनियर असला तर बर्गर ,वेफर्स आणि जोडीला कोल्डड्रींक्स (२.५ लिटर च्या १-२ बाटल्या)
आणि एकदमच सिनियर असला तर हॉटेल ला जेवण (Offcourse TTMM असते इथे पण, नसलातर हॉटेल चे बिल होईल त्या लेवल चे गिफ्ट, एखादा Louis Phillipe शर्ट नाहीतर ब्रँडेड Perfume etc)
Public Speech म्हणजेच सार्वजनिक भाषण फार महत्वाचे असते.
कधी प्रयत्न करून बघा, गोंधळ होतो समोरगर्दी बघून.
(लै नाही गणपती मांडवात आरती म्हणा, आपली पायरी कळते लगेच.)
Sendoff ला, कंपनी सोडून जाणाऱ्या व्यक्ती विषयी ठराविक मंडळी १-२ मिनटात चांगले बोलतात.
कामावर असताना कोण बोलणार नाही इथे सगळीच बढाया मारणार.
(माणूस मेल्यावर घाटावर एकदम तंतोतंत परिस्थिती असते.)
एकदा माझा सिनियर चा send off होता, आम्ही एकाच केबिन मध्य बसत होतो जवळ पास ४-५ वर्ष.
एक सवय झालेली असते दररोज समोरच्या व्यक्ती ची.
I personally never kept grudge on anybody, as I had to see them every day, even if I don’t want to.
तसं मी लाई बोलतो,पण शक्यतो Sendoff ला कधी जास्त बोलत नाही,
May be “I hate saying good byes”.
पण त्या दिवशी मी बोललो,
सर मी कंपनी join केली तेव्हा माझे लग्न झाले न्हवते, काम चालू असताना मध्ये मध्ये येणारे फोन तुम्ही समजून घेतले,
माझा लग्न झालं, तुम्ही सहपरिवार माझा लग्नात जमील झालात,
माझा मुलाच्या बारशाला पण तुम्ही आला होता,
तुमच्या मुलीच्या वाढदिवसाला तुम्ही मला सहपरिवार आमंत्रित केल,
कामाचा ताण तुम्ही वाटून घेतलात,
मी मिश्किलीने म्हणालो "सर तुमची कमी जाणवणार, माझा बायको पेक्षा जास्त वेळ मी तुमच्या बरोबर घालवला आहे"
बायको कोल्हापूर मध्ये मी पुण्यात एकटा, जास्त सहवास तुमचाच भेटला मला हाहाहा.
"सकाळ-दुपार-संध्याकाळ- कधी कधी मिटींग्स रात्र ही असायच्या"
माझे बोलणे तुम्ही आज पर्यंत ऐकून घेतले आणि तुमचा अबोला मी समजून घेतला,
असं bonding परत कुणाशी होईल माहित नाही,
"Work doesn't look like work when you have good company" -Neil-The-Story-Teller
टाळ्या दंगा आणि सर एकदम भावुक.
हसत खेळत आम्ही त्यांना निरोप दिला.
Circle of Life-कोर्पोरेट आयुष्यात हि वेळ सर्वांवर कधी ना कधी तर येतंच असते, मी हि अपवाद नाही.
Social life is normal, if you job life is normal & vice versa.
![]() |
| Classic Quote by the Classic Personality...APJ |
LAST WORKING DAY:
सगळ्यांचा होतो तसा माझा हि निरपो समारंभ झाला.
त्या दिवशी,
HR नी कंपनी ID कार्ड जमा करून घेतले,
IT वाल्याने कॉम्पुटर जमा करून घेतला,
Admin नी Stationary जमा करून घेतली...!!!
सकाळी सकाळी ऑफिस मध्ये एन्ट्री,
एन्ट्री ला सेक्युरिटी ची विचारपूस,
भेटेल त्याला good morning,
सकाळ चा चहा आणि चहा बरोबर चुकून राहिले असले तर बिस्कीट,
स्टँडिंग मिटींग्स,
कॉन्फरन्स हॉल आणि तिथे वाजणारी थंडी,
कॉन-कॉल्स,
प्रेसेंटेशन्स,
MOMS,
इमेल्स,
रिपोर्ट्स आणि बरेच काही.
जेऊन झाल्यावर खाली पार्किंग मध्ये एक चक्कर,
एक ग्लास ताक,
चार वाजता चा कंपनी चा मशीन वॉल चहा,
Monday to Thursday Formals आणि Friday ला Casualwear.
दिवसात सरत होता,
शेवटच्या दिवशी काही काम नसते, handover already झाला होता माझा.
त्या दिवशी मी जास्त जेवलो नाही, जेवण आणि शेजारी बसलेली माणसं दोघे पण आवडती होती,
पण हे त्यांच्या बरोबर चे शेवटचे जेवण होते, हे मनात कुठं तरी जाणवत होतं.
एखादी व्यक्ती अथवा वस्तू ला त्याच ठिकाणी बघायची सवय असते, त्यात फरक पडला कि गोंधळ होतो.
मग तो बिल्डिंग चा वॉचमन असो किंवा कंपनी चा मालक.
निरपो घेऊन एक एक व्यक्ती नजरे समोरून गायब होत होती.
मी शेवटचं माझा केबिन मध्ये आलो, माझा desk बघितला, माझी खुर्ची बघितली , माझी केबिन निहाळली.
नोटीस बोर्ड वर मी लावलेल्या चिट्ट्या तश्याच होत्या,
शेवटचं खुर्चीत बसलो.
दोन मिनटं डोळे बंद केले.
AC बंद होता, मला फक्त माझा हृदयाचे ठोके ऐकू येत होते,
I was breathing heavily.
तसा दाटून कंठ कधी येत नाही, but I was feeling low.
हि भावनाच काही वेगळी होती.
I knew from the day I had resigned this moment will come & I thought I was ready, but I wasn’t..!!
THIS IS HOW IT ENDS...!!!
मी दोन -तीन फोटो घेतले, मलाच पटले नाही पण मी जड मनाने केबिन ला नमस्कार केला,
I hate Good byes, पण हा माझा कंपनी ला शेवटचा सलाम.... !!!
![]() |
| DABBA GANG |
![]() |
| Dabba Gang |

.jpeg)
.jpeg)




काय लिहिलंय मित्रा....खरं तर आपण so called corporate friends.. पण मैत्री जपायची कशी हे कोल्हापूरवाल्यांना पक्क माहीत आहे..
ReplyDeleteसुंदर लिहिलीय, खूप साऱ्या आठवणी आहेत कंपनीमधल्या पण this line is golden line...."Do the things your like or you have to like the things you do"
भलेही तुमचा LWD झाला असेल.. पावले कोल्हापूरकडे वळली की विषय आपोआपच hard hoto..;)...neil-thr storey teller te neil-thr mango seller:)
Keep writing!!
........eknath sanap
why did you stopped writing?
ReplyDelete