योगायोग:
म्हणतात ना योग यायला पण योग लागतो.
खरंच योगायोग असेलच काय..??
म्हणजे कित्येक निकष ना बाजूला करून गोष्टी घडतात, सांगण्या आणि समजण्या पलीकडे असतात.
कधी-कधी काही गोष्टी घडवून आणायला बरेच नियोजन जमावावे लागते, तर कुठं "एकाद टक्का" काम कसे बसे जमते आणि जर का योगा-योग नावाची जादू तुमच्या पाठीशी असली तर काही न करता हि गोष्टी जिथे पाहिजे तिथे पडतात, मग त्या सजीव असो वा निर्जीव.
गोष्ट अश्याच एका विलक्षण योगा-योग ची.
भाग एक:
आपण दिवसातून बऱ्याच लोकांना भेटतो, त्यातले काही चेहरे परत परत भेटतात, त्यातले काही लक्ष्यात राहतात आणि काही विसरून पण जातात.
ज्या व्यवसायात मी आहे, त्यात दररोज नव-नवीन लोकांशी संवाद हा असतोच. दररोज चे नवीन नंबर वरून १००+ फोन होतात, त्यातल्या कुणाशी कधी तर चुकून भेट होते.
फोन पेक्षा समोर माणूस भेटला कि लगेच लक्षात राहतो,
आपले आवडते वाक्य आणि वयक्तिक विचार,
"Virtual communication can never beat the Physical touch".
आमची एक व्यावसाईक पार्टी आहे. मालकांचे नाव आहे राजू जाधव. राजूदा शी नेहमी बोलणे होते असे नाही, पण महिन्यातून कधी तरी भेटणे किंवा बोलणे होते. राजू दा चा स्वभाव एकदम शांत आणि सरळ, अशी माणसं लगेच मनात भरतात आणि लक्षात हि राहतात.
राजू दा ला फोन केला कि त्यांचे पहिले वाक्य असते ,"निलेशराव बोला कि".
भाग दोन:
मी एका छोट्याश्या कॉलनी मध्ये राहतो, जेम-तेम १०० घर असतील. कॉलेज मध्ये असताना आमची चौकात कायम वस्तीला असल्या सारखे असायचो. कोण आले, कोण गेले, हा कोण, तो कोण, हा कोणाचा कोण आणि व कधी कुठं असणार, ह्याची सगळी माहिती चौकात असायची. येणार जाणारा प्रत्येक व्यक्ती ओळखीचा.
कॉलेज संपले आणि आमचा चौक हरवला. आमचा चौक मी दुसऱ्या गावोगावी शोधत फिरू लागलो, पण जी मजा आपल्या माणसात आणि मातीत आहे, ती कुठेच नाही,
"पण हे कळायला गाव सोडावे लागले".
बरेच वर्ष भ्रमंती करून, गड्या आपले गावचं बरे असे म्हणत मी परत आपल्या मातीत-मायदेशी आलो. आलो आणि परत त्याच जगात हरवलो देखील.
पण आता कॉलनी मध्ये वस्ती वाढली होती, घरे वाढली, माणसं वाढली, रहदारी वाढली. चौक आहे तिथेच होता, पण चौक आता पोरका झालेला, गर्दी फक्त सणासुदीला नाहीतर वाढदिवसाला गाडीवर केक कापताना, इतकेच त्याचे म्हणत्व राहिलेलं.
कधी कधी असं होत ना, कि कुणाला पहिले कि कुणाची तर आठवण येते किंवा तसा भास होतो, हा चेहरा कुणासारखा तरी दिसतो पण एकदम आठवत नाही. मला तर अशे बरेच अनुभव येतात.
एकदा मला आमचा कॉलनी मधील एक मित्र गावात भेटला "लखन कुंभार". मला एकदम "Deja Vu" झाले, मी लखन ला कॉलनी च्या बाहेर कधीच भेटलो नाही. मी शक्यतो कॉलनी मध्ये रात्री जेवूनच फिरताना, जी कोण भेटतात तेवढ्या काय त्या गाठी भेटी.
लखन ला बाहेर फॉर्मल कपड्यात भेटल्यावर , तो मला ओळखलाच नाही. मी त्याला २ मिंट भेटलो आणि तो निघून गेला. मला आठवेना हा अजून कुणा सारखा दिसतो.
आमचे दृढ वाक्य, "कामात वस्त -एकदम मस्त", काम चालू झाले कि बाकी काही आठवत नाही. मी विसरलो आणि कामात गुंग झालो.
संध्याकाळी फोन आला, "निलेशराव काय काय...!!"
"एक लाकडी पॅटर्न आहे, उद्या पर्वा घेऊन जायचे आहे, बघायला यायला जमेल काय"
हे होते आपले राजू दादा.
मी म्हणालो, "साहेब कामं भरपूर आहेत, जमलं तर उद्या येतो, तोपर्यंत जॉब चे फोटो पाठवा"
राजू दा नी लगेच फोटो पाठवले.
आपला कॉम्पुटर वर व्हाट्सअँप वेब वर फोटो लगेच धडाधड हजर.
जॉब चे फोटो बघता राजू दादांच्या DP वर लक्ष गेले, फोटो बघतो तर लखन दिसला मला.
सकाळी जे आठवत न्हवते ते एकदम आता आठवले, लखन सारखा दिसणारा म्हणजे राजू दादा आणि राजुदा सारखा दिसणारा म्हणजे आमचा लखन. मी राजूदा आणि लखन दोघांनाही ला फोन केला आणि सांगितले, "तुमचा जुळा भाऊ भेटला आज, कधी तर भेट घालून देतो".
परत आम्ही कामात व्यस्त-एकदम मस्त.
भाग तीन:
वेळ कधी कुणाला साठी थांबत नाही, वेळ चक्र चालूच होतं. आमच्या घरी एक मोठा कार्यक्रम होता. मित्र परिवार , व्यवसाहिक मित्र परिवार , शेजारी आणि पाहुणे मंडळी सगळाच गोतावळा असणार होता. नेहमी ठरल्या प्रमाणे मी आणि नीलम पाहुणे आणि जेवण तयारी च्या मागे होतो. येतील तशी एक एक पंगत बसत होती, गर्दी हळू हळू चालूच होती. आम्ही स्टेज , पंगत आणि फोन या वरच होतो. पहिल्या २-३ पंगती झाल्या. कुठे काय कमी काय जास्त आम्ही जातीने बघत होतो. कुठल्या पंगतीला कोण कोण आहे या कडे लक्ष होतेच.
मित्र एक मेक भेटतील तशे बसत होते. कोल्हापुरात कार्यक्रमात शक्यतो जेवायला एकटे कोण बसत नाही, कोण ना कोण तर ओळखीचे असतेच. मग सगळे एकत्र बसतात.
मी एक एक पंगत बघत बघत आणि थोडे फार वाढत पण होतो. बसलेल्या ताटावर गाठी भेटी होत होत्या आणि इतक्यात मला, राजू दा दिसले. राजू द भेटल्या भेटल्या," निलेश राव काय काय".
"अहो नमस्कार, तुमचा जुळा भाऊ येईल आज, इथं थांबा थोडा वेळ"
"निलेश दा , काय काय आणि..!" शेजारून आवाज आला.
विश्वास बसेना तो "लखन" होता आणि तो हि राजू दा शेजारी बसला होता.
"तुम्हाला भेट करून देणार, ती माणसं शेजारी शेजारी बसलेत आज"
"राजू दा हा लखन, लखन हा राजुदा", "तुमचा सेम टू सेम जुळा भाऊ", मी म्हणालो.
कार्यक्रम संपे पर्यंत रात्रीचे १२ वाजले. सगळे मंडळी गेले होते. फक्त ठरल्या प्रमाणे फक्त कामाची निवडक ५-६ मंडळी होती. वाढप्यांचे आवरले, भांडी मोजून देऊन आम्ही हॉल मध्ये येऊन बसलो. शांत बसल्या बसल्या मला एकदम राजुदा आणि लखन आठवले.
कसला हा योगा-योग म्हणावा लागेल.
एकाच गावात असणारी आणि कधी हि न भेटणारी दोन माणसं,
एकाच ठिकाणी,
एकाच वेळी,
एकाच कार्यक्रमात येतात,
आणि एकाच पंगतीत ला असतात,
एकाच टेबल वर बसतात आणि ते ही शेजरी शेजारी येतील....हे शक्य आहे....???
लाखात एक विलक्षण योगा योग म्हणावा लागेल.होय ना..!!
त्या रात्री माझी झोप, फक्त ह्या योगा योगा चा विचारातच लागली.
एक असाच विचार आला, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल किंवा फार इच्छा असेल, ती मिळेल-नाही मिळेल, घडेल-नाही घडेल, पण जर मिळणारच आणि घडणारच असेल, तर सगळ्या गोष्टी कुणीतरी सांगितल्या प्रमाणे आणि ठरल्या प्रमाणे घडतात.
माझं वयक्तिक मत आहे,
आता जे आपल्याला पाहिजे आहे,
ते
ठरलेल्या वेळेला,
ठरलेल्या प्रमाणात,
ठरलेल्या ठिकाणी,
तुमच्या समोर येणार आणि तुम्हाला मिळणार....!!!!
फक्त विश्वास ठेवा.
Have Faith & Believe the process.
पुढचा योगा योग तुमच्या बरोबर असू शकतो...!!!



No comments:
Post a Comment