देवळात नतमस्तक एक देव माणूस.
सर्व मुलां सारखं, माझं आणि मंदिराचं नातं हे बालपणी पासून आहे.
मग ती शाळेतली सहल असो किंवा घरच्यां च्या बरोबर वारी असो.
जसं जसं वय वाढत गेलं , तसं तसं मला माणसं समझू लागली आणि देव असण्याचं कारण स्पष्टं होत गेलं.
आपण मंदिरात का जातो..??
तशी कारणं अनेक आहेत. मी अभ्यासलेली थोडक्यात लिहितो:
१. काही हवं असल्यास (सर्वात लोकप्रिय)
२. काही नको असल्यास (असं पण असतं , खरंच)
३. काही मना प्रमाणे घडत नसल्यास (देवा नंतर ज्योतिषा कडचा मार्ग)
हि झाली सकारात्मक कारणं, ह्यांची संख्या आज काल कमी होत चालली आहे.
काही नकारात्मक कारणं:
१. थेट देवाला प्रश्न/ जाब/ हिशोब.
२. देवा कड देवाचीच तक्रार
३. आपण केलेल्या चांगल्या कामांचा तपशील आणि बदल्यात काय काय मिळाले याचा तपशील.
४. देवानं काय करायला पाहिजे होते आणि का, याचा देवालाच धडा.
देव हा विषय अध्यात्माचा आणि विश्वासाचा आहे , मी याच्या बद्दल काही बोलू इच्छित नाही.
एकदा मला एका देवळात जाण्याचा योग्य आला.
देऊळ तसं छोटं ,खाजगी होतं एका साखर कारख्यातलं.
एकाच देवळात तीन तीन छोटे छोटे देऊळ होते, एक तिरुपती , एक विट्टल रुक्माई आणि आपला आवडता गणपती.
मी दर्शन घेऊन एका कोपऱ्यात बसलो (देवळात आलं कि थोडा वेळ देवा चं चिंतन करावे म्हणतात म्हणून ).
माझं लक्ष्य देवळातल्या पूजे कडे होते, छान अशी जास्वंदी फुलांची पूजा रचलेली. जास्वंदी देवळाच्या आवारातच दिसत होती.
मी नेहमी देवाला पाया पडणाऱ्या लोकांकड बघत असतो. मंत्र म्हणायचं गती कमालीची असते आणि नवं-नवं काहीतरी ऐकालापण मिळते.
सगळं काही पटा-पट (शॉर्टकट मध्ये).
आपलं मन किती हळवं असतं, १५ सेकंद पाया पडून आपण सर्वकाही मागू इच्छितो.
माझं इकडं तिकडं बघणं चालू होता आणि इतक्यात मला तो दिसला.
देवळाच्या
बाहेर पहिल्या पायरीवर नतमस्तक एक माणूस.
साधा वेष , अंगात बंडी आणि धोतर, डोक्याला गांधी टोपी. जितकी टोपी पांढरी होती तितकीच त्याची दाढी देखील पांढरी होती.
चेहरा सुरकुतलेला होता. थोडक्यात काय त्याने सोसलेले सगळे कष्ट उठून दिसत होते.
त्याने मोठ्या कष्टाने वाकून पहिल्या पायरीला हात टेकला आणि डोक्याला लावले.
हळू हळू तो एक एक पायरी चढू लागला. त्याला होणारे कष्ट मला दिसत होते, पण त्याची जरा पण जाणीव त्याच्या चेहर्यावर दिसत न्हवती.
त्याने हळू हळू का असेना ५ पायर्यांचा टप्पा पूर्ण केला. माझी नजर आता त्याच्या वर खिळलेली होती. मी डोळे मोठे करून ते सर्व अनुभवत होतो.
तो हळू हळू पुढं आला, देवळातल्या कासवाला त्याने परत वाकून हाताने स्पर्श करत नमन केले.
पुढे जाऊन त्याने सगळ्या तिन्ही देवांना , आपण कसं छोट्याना शिकवतो तसं साष्टांग दंडवत घातला.
त्याला कुणाची काहीही पडली न्हवती, कि तो दंडवत घालताना त्याची बंडी नाहीतर धोतर वर जाईल काय, कोण काय म्हणेल काय,तो देवात मग्न झाला होता.
त्याने पाया पडल्या वर, तांब्यात ठेवलेलं पाणी स्वरूपी प्रसाद घेतला आणि गांधी टोपी कादून डोक्यावरून हात फिरवला.
त्याला अर्धे टक्कल पडले होते, कपाळ असे वर पर्यंत गेले होते.
त्याने मंदिरातल्या पुजार्याला देखील पाया पडले, पुजारीने त्यांची चौकशी केली आणि आपल्या कामात मग्न झाला.
तो नंतर माझ्या शेजारी येऊन बसला, मी पापणी पण मिटली न्हवती. माझं पूर्ण लक्ष्य त्याच्या कड होत.
देवळात भक्तीगीत चालू होते, तो आला आणि त्या गीतांप्रमाणे हळू हळू टाळ्या वाजवू लागला. पण त्याच्या
टाळ्यांचा आवाज येत न्हवता.
त्याचे हातवरचे गट्टे त्याने केलेले कष्ट सांगत होते. त्याला चष्मा असावा कारण नाकावर डाग दिसत होता.
पण सर्वात ठळक होते ते त्याच्या चेहरा वरचे समाधान आणि शांतता.
माझी फार इच्छा झाली त्याच्या बरोबर बोलायची, पण का कुणास ठाऊक मला बोलता आल नाही.
असा म्हणतात कि जेव्हा जेव्हा आपण एका नव्या व्यक्तीला भेटतो, आपण त्या मध्ये कुणाला तरी शोधायचा प्रयत्न करतो. कदाचित मीपण तेच करत होतो.
त्याला पाहून मी विचारात पडलो, कि हा देवा कड नक्की काय मागत असेल.
त्याच्या कड बघून मला एक उंच डौलदार कल्पवृक्ष दिसत होत. ज्याची प्रत्येक गोष्ट कामाला आली असणार.
त्याचा साधारण १.५ ते २ वर्षाचा नातू देवळात पळत आला, मागून त्याची मावशी पण अली.
नातू जाऊन त्याच्या मांडीवर बसला , त्याने लगेच नातवाचे हात धरून भक्तिगीताचा ठेका धरला.
आयुष्य पार पडलेला हा माणूस, हा देवा कड स्वतः साठी मागणार तरी काय??
तो देवळात का होता त्याचे एक छोटेशे कारण मला दिसले आणि मन शांत झालं.
निस्वार्थीपण काय असतो तो आज मला कळाला होता.
एखादा माणूस दुसऱ्या साठी कुठं ,कसं आणि किती जगू शकतो हे मी अनुभवत होतो.
आपण देवा कड मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं मागायला जातो.
"आपण देवा कड कष्टात आणि क्रोधात जातो, देवा
कड आनंदात पण गेला पाहिजे"
कधी आपण देवाकड मला काही न मागतां सगळं काही दिल म्हणून जातो का,,??
त्या माणसा कड बघून मला असं वाटलं, कि तो फक्त देवाचे आभार मानायला आला होता.
जे दिलंस त्यात मी संतुष्ट आहे, सुखी आहे आणि तुझा ऋणी आहे.
आणि तो होता "देवळात नतमस्तक एक देव माणूस"
एक नंबर भाऊ
ReplyDeleteNice Nil.. Like a pro.... M so proud of you..
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteमाणूस कितीही मोठा झाला तरी काही ना काही मागायलाच देवाकडे जात असतो, म्हणून तर सर्व देवस्थाने नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तान कडून श्रीमंत झाली आहेत
ReplyDeleteKadak
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteObservation by heart..nice one
ReplyDeleteVery well written...Dev pahavayachi gelo ..an devach hovuni alo asa anubhav denara blog🙏🙏🙏
ReplyDelete