![]() |
| Words of Wisdom |
कोल्हापूर माझ्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा घटक. आपलं कोल्हापूर प्रति प्रेम हे जगजाहीर आहे.
आपली Tag लायनचं आहे,
You can take Kolhapurkar out of Kolhapur, but you
can never take Kolhapur out of Kolhapurkar".
जरा अवघड आहे पण २-३ वेळा वाचलं की अर्थ कळेल.
इथली वैशिष्ट्य बरीच आहेत, त्यातली सर्वात महत्वाच्या पैकी एक म्हणजे इथली "माणसं".
आमचे राजे लोकराजा "श्रीमंत राजश्री शाहू महाराज " यांचा वारसा आणि आशीर्वाद अजून आम्ही कोल्हापूरकरांनी जपून ठेवलाय.
भारतात आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर बरेच राजे आले , पण राजश्री शाहू महाराज यांची ख्याती काय औरच.If by any chance
you are from engineering background, just google “K T Weir’, आमच्या राजांनी या जगाला दिलेली देण कळून येईल.
K T
Weir अर्थात कोल्हापूर टाईप बंधारा, आजही अनेक ठिकाणी बांधला जातो- स्वस्त, मजबूत आणि टिकाऊ.
राजश्री शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतुन साकारलेला आणि एक उदाहरण म्हणजे , "राधानगरी धरण".
स्वयंचलित दरवाजे आहेत, १०० + वर्ष , Maintenance - Zero. आणि सर्वात महत्वाचं हे असं एकमेव धरण आहे जे , स्वखर्चातून बांधलं आहे, जनते कडून कोणत्याही प्रकार चा कर त्यावेळी घेण्यात आला न्हवता. १००+ वर्ष झाली , कोल्हापूर त्याच पाण्यावर टिकून आहे
आमच्या राजश्री शाहू महाराजां बद्दल फारसं कुणाला माहित नाही, राजा ते लोकराजा ह्या प्रवास माग बरेच सत्कार्य आणि कष्ट आहेत.
त्यांची समाजकारणातील थोडक्यात उदाहरणे:
१. K T Weir (कोल्हापुरी बंधारा)
२. मुलांना मोफत शिक्षण (शाळेत मुलं न आल्यास पालकांना मासिक १ रुपये शिक्षा).
३. Right to education
४. सर्वधर्म
boardings.
५. सर्वधर्म समान पुढाकार त्यांनीच घेतला
६. कुस्ती
७. प्रगत शेती
लिहिण्या साठी बरच आहे, पण आज आपला विषय आहे "दानत", जी प्रत्येक व्यक्तीने मारहाराजां कडून "वारसा" म्हणू घ्यावी.
दानत...!!!
किरण पाटील-KP आमचे बंधुतुल्य मित्र. कोल्हापूर मधील सामान्य व्यक्ती प्रमाणे, त्याचा पण मित्र परिवार फार मोठा.
फौंडरी मालक असल्या मुळं शक्यतो संध्याकाळी KP चौकात असतो. चौकात आणि कट्यावर दररोजच्या गप्पा रंगायच्या.
कोल्हापुरात
दोनच विषय"राजकारण" आणि "तांबडा-पांढरा". चर्चा पेटली कि रात्र आपलीच मग आम्ही नाही तटत.
KP चे आठवड्यातून १-२ वेळा जेवण बाहेर असायचे. एकदा KP मित्रां बरोबर जेवायला गेला होता. कोल्हापुरात जेवायला जास्त काही मानसिक त्रास नसतो,
हि प्लेट, ती प्लेट , ह्यो स्टार्टर , त्यो स्टार्टर, असला राईस , तसली बिर्याणी- आहां. "ताट" म्हंटलं कि सगळी दुनिया
आली त्यात.
एकदा जेवणाचा बेत ठरला पण नेमका KP ला फौंडरी तून निघायला थोडा वेळ झाला , म्हणून जेवणाची वेळ पण पुढे गेली. चर्चा करून हॉटेल ठरलं. जेवण आवरायला बराच वेळ झाला, जवळ पास ११ वाजत आले होते. KP ३ चपाती ,मध्ये गच्चं /पॅक झाला, पण ताटातली भात तशीच होती.
KP आपला पक्का "आपल्या तत्वांवर चालणार माणूस", म्हंटला राहिलेलं जेवण वाया का घालवायचं, कुणाला तर देऊन टाकू, त्याने राहिलेला भात पार्सल करून घेतला.
जेवण आटपून बाहेर पडायला त्यांना रात्रीची ११:३० वाजले. "पान" खायला म्हणून ही सगळी ST स्टॅन्ड वर गेली. पार्सल KP च्या हातातच होतं.
"पान" घेण्या साठी किरण पार्सल मित्राकडे देऊन दुकानात गेला,तोपर्यंत तिथंच जवळ बसलेला एक भिकारी मित्राला दिसला.
किरण पान घेऊन आला आणि त्याच्या समोर मित्रानं ते पार्सल भिकाऱ्या समोर "फेकलं".
KP भलताच चिडला, "सरळ दे कि रांXX च्या, भिकारी असला तरी माणूस आहे तो".
मित्र म्हंटला ," तुला का एवढा पुळका तेजा, नुसता भात खाईल नाहीतर उपाशी राहील".
KP
,"माज करावा पण जेवणावर नाही आणि नुसता भात का, त्याला भाजी पण देईन मी".
KP चं डोकं एकदम तापट. अख्ख स्टॅन्ड पालतं घातलं , एक पावभाजी गाडी दिसली, तिथून एक प्लेट भाजी आणून त्या भिकाऱ्याला दिली.
"मामा निवांत जेवा आणि काय लागलं तर मी आहे इथंच".
तसं बघायला गेलं तर, KP राजकारण आणि समाजकारण दोन्ही मध्ये active member. अन्न दान हे त्याने कित्येक वेळा केलं आहे, मंडळाच्या महाप्रसाद पासून ते कोल्हापूर च्या महापुरा पर्यंत, KP पुढं असतोच, पण हा अनुभव काही वेगळाच होता.
त्या दिवसा नंतर आज पर्यंत, आमचे किरण पाटील कधीही, कुठंही केव्हाही जेवले आणि चुकून त्याच्या किंवा त्याच्या बरोबर च्या मित्राच्या ताटात काही राहिलं, तर नचूकता कुठल्या तरी गरिबाला दिल्याशिवाय KP घरी जात नाही.
मग नुस्ता भात कसा खाणार म्हणून सोबत भाजी आणि कधी नुस्ती भाजी कशी खाणार म्हणून रोटी हे गणित चालूच असतं.
एकदा तर KP, हातात पार्सल घेऊन १ तास कोल्हापूरच्या रस्त्यांवर भिकारी शोधत होता.
त्याचं तयार झालेलं नवीन तत्व "जो पर्यंत, हे जेवण एखाद्या गरजू च्या पोटात जात नाही, मला जेवण पचणार नाही".
हे ऐकायला मला नवल वाटलं, पण एक अनुभव घेतल्यावर कळालं हे, खरोखर पुंण्याचं काम आहे. एक शिकवण आणि समज मिळाला,
"आयुष्यात पैसे असो व नसो, पण मनात "दानत" पाहिजे आणि हि आमच्या शाहू महाराजांची देण आहे"
ते म्हणतात ना, "“You're the
average of the five people, you spend the most time with".
माझा म्हणणं आहे ,"People
around you make your personality".
I am
just thankful to god, for the people around me.
NEIL-THE-STORY-TELLER


वा वा...खरंतर kp सारख्या लोकांची समाजाला गरज आहे...हॅट्स ऑफ...
ReplyDelete....Ek!