शेवटी कोणीही नसते ,,,!!!
I never
write negative stories or anything which might have a negative impact on the
person reading. This write up is about the harsh reality of society, which I
came across. No hard feelings for anyone, like always it’s from “My
perspective”.
Happy
Reading.
डायरेक्ट मुद्यावर, “ठिकाण- स्मशान घाट”....!!!
स्मशान घाट हा कुणाला चुकलेला नाही, हा क्षण कधी ना कधी तर येतोच.
मला असं वाटतं, प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी "एकट्याने" घाटावर जाऊन यावे, कुणा ओळखीच्या माणसा साठी नाही ( एकटं असल कि भावना "Dilute" होत नाहीत).
"माज" असतो ना "माज", एका क्षणात निघून जातो.
मतदान साठी पैसे घेऊन माणसं मतदान केंद्रात येतात, पण घाटावर कोण पैसे घेऊन येत नाही.
अख्या जगात अशी एकमेव जागा जिथं सगळी राग- भांडण -त्रास , मागे सोडून घाटावर येतात.
गेलेल्या माणसाला इथं सगळं भेटतं, सगळं म्हणजे सगळं....!!!
ज्याला प्रेम मिळाले नाही, त्याला प्रेम भेटते,
ज्याला आपुलकी मिळाली नाही, इथे त्याला इथं आपुलकी भेटते,
ज्याला जिवा-भावाची माणसं मिळाली नाही, ती माणसं पण इथं भेटतात,
एवढंच काय ज्याला जिवंत पणी जेवणाचा तुकडा सुद्धा मिळाला नाही, त्याला ना-ना प्रकारचे नैवेद्य पण मिळतात राव.
रडून रडून सुजलेले चेहरे, पाणावलेले डोळे, हृदय पिळवटून टाकणारे हुंदके, आक्रोश, राग, निराशा सगळ्या तीव्र भावना इथेच दिसतात.
एकूण काय वातावरण एकदम Negative.
गावातल्या एका काकांचे रक्षा विसर्जन घाटावर होते. आम्ही मित्र मंडळी बाहेर उभे होतो.
घाटावर चर्चा भरपूर रंगतात. गेलेल्या माणसा विषयी आणि त्याच्या नंतर राहिलेल्या त्याच्या आयुष्या विषयी.
***पहिला सरकारी दवाख्यात "पोस्ट मार्टम" होतो, मग राहिलेला "पोस्ट मार्टम" चर्चेतून इथे केला जातो.***
आम्ही काकांच्या मुला जवळ थांबलो होतो. मित्रांची खरी गरज इथे असते आणि इथे प्रत्येक मित्र ती भूमिका ठामपणे निभावतो.
इथं रुसलेली, भांडलेली , अबोली अशे सगळ्या प्रकारचे मित्र येतात , पण नक्की येतात…!!!
एक-एक जण येत होता आणि सांत्वन करत होता.
परत परत ऐकू येत असलेलं शब्द काही असे होते:
"काय लागलं तर सांग- आम्ही आहे"
"कधी पण मदत लागली तर सांग- आम्ही आहे"
"आम्ही तुझा घरचेच आहोत, निसंकोच पणे सांग- आम्ही आहे"
मी शेजारी हाताची घडी घालून उभा होतो, पाटील काका (नाव बदलले आहे) पण माझा शेजारी उभे होते,
ते अचानक म्हणाले, "हे नुसतं म्हणायला असते बघ- "आम्ही आहे"...!!"
मी प्रतिक्रिया न देता फक्त मान वळवली. कधी न बोलणारे, सरळ स्वभावाचे, शांत व्यक्तिमत्व एकदम व्यक्त झाल्याने आश्चर्य वाटले.
"सगळी म्हणतात रे , आम्ही आहे. पण नंतर कोण नसतंय. सगळं आपलं आपल्यलाच बघायचे असते"
पाटील काकांच्या बद्दल सांगायचे झाले तर "एकदम निवांत माणूस".
MIDC मध्ये एकाच कंपनी मध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम करत त्यांनी आयुष्य काढलं.
ना राग, ना मत्स्य, ना निंदा, एकदम सरळ साधा माणूस.
काकांच्या घरी फक्त काका आणि काकू, दोघेच विठू-माउली.
लग्नानंतर बरेच वर्ष प्रत्यन करून देखील त्यांना अपत्य नाही.
घर आहे, गाडी आहे, थोडीफार शेती देखील आहे, पण मूल नसण्याची खंत त्यांना फार होती, कधी त्यांनी बोलून दाखवले नाही , पण त्यांच्या बोलण्यातून समजत होते.
कोरोना काळात काकू देवाघरी गेल्या आणि भातुकली चा खेळ अर्धा सोडून गेल्या.
काकू गेल्या नंतरच्या काळात सगळ्यांनी काकांना मदत केली, कोणीही मागे राहिले नाही.
घरी दोघेच असल्या मुळे , काकांना जेवण करता येत होते.
थोडे दिवस आम्ही पण दररोज येत जात होतो, नंतर नंतर सगळी आपापल्या आयुष्यात रमली.
माझ्या आता लक्ष्यात आलं, "काका मात्र तिथंच होते".
काकू गेल्या पासून मी एकटा राहतो, मागे-पुढे कोणीही नाही, माझा मुळे कधी कुणाचं अडलं नाही, ना कुना मुळे माझं अडलं.
आता सगळी फक्त बोलायचे म्हणून म्हणतात "आम्ही आहे", "पण जेव्हा खरी गरज असते, तेव्हा कोण नसतं"
फक्त दोन वाक्यात काकांचे डोळे भरून आले. मी वयाने इतका मोठा नाही कि त्यांना मिठीत मारून शांत करेन, पण फक्त काकांचा "हात हातात घेऊन" दोन क्षण तिथेच उभा होतो.
काका पुढे काय बोलले नाहीत. आम्ही घाटावर चा कार्यक्रम आटपून घरी निघालो.
डोकं सुन्न झाले होते, काही गोष्टी विचार करायला भाग पडतात, हि तशीच घटना होती.
To be
Honest, we all have become materialistic,
माझा नवरा,
माझी बायको,
माझी पोरं,
माझं काम,
माझी गाडी,
माझं घर,
माझं शेत,
माझी परदेशवारी,
सगळं माझं, माझं आणि माझंच.
पण जसं काका म्हंटले, "शेवटी कोण नसतं".
म्हणतात ना, "अकेले आए थे, अकेले जाओगे".
Show
must go on....!!!
आम्ही आमच्या आयुष्यात व्यस्त.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
पावसाळ्याचे दिवस होते. मी काम आटपून घर जात होतो.
बराच वेळ झाला होता. रात्रीचे ९ वाजले असतील.
छान आणि शांत-गाणी ऐकत हळू हळू रस्ता सरत होता.
अचानक गाडी एका बाजूला ला ओढू लागली. गाडी थांबवून मी गाडी बाहेर आलो, पाऊसात नको ते होणे म्हणजे "पंचर".
टायर पूर्ण सपाट आहे, "मोळा घुसला होता टायर मध्ये"
बऱ्याच दिवसांनी फॉर्मल कपडे घातली होती, शर्ट इन करून बूट पण पोलिश होते आज, त्यात पाऊस पण जोडीला होता- सगळं एकदम जुळून आलं होतं.
जॅक चढवला आणि नट फिरवायला लागलो.
५ मधली ४ नट मोकळी झाली पण पाचवा मेंबर दमवत होता.
अंधार पडला होता, पण गाडी रस्त्या कडच्या लाईट खाली असल्याने, मंद प्रकाश होता.
जराजरा पडणाऱ्या पावसाच्या साऱ्यांनी, आता पूर्ण भिजलो होतो मी.
पूर्ण जोर लावला पण काही उपयोग नाही, नट काय निघाला नाही.
कंटाळून गाडी मध्ये बसलो, रुमाल काढला तो पण भेजलेला होता.
जरा चेहरा पुसून घेतला.
विचार करू लागलो आता घरी जायचं कसं, घर काय जास्त लांब न्हवतं, पण गाडी वाटेत ठेवणे बरे नाही.
इतक्या वेळाने पाऊसात कोण येईल आता मी आठवत होतो.
चला म्हंटलं फोन तर करूया "कोण ना कोण तर येईलच".
फोन पहिला:
"कुठाईस रे"
"घरी आहे"
"अरे इथं टायर पंचर झालाय माझा गाडीचा, तू जरा ये. मला काय टायर निघत नाही".
"अर्रर्रर्रर्र, अरे सकाळी पावसात भिजलो राव मी, थंडी आहे अंगात, मला काय जमणार नाही, त्यो आपला ह्यो XXX (दुसरा मित्राचा reference) आहे काय बघ".
फोन दुसरा:
"कुठाईस रे"
"बोल कि"
"अरे इथं टायर पंचर झालाय माझा गाडीचा, तू जरा ये"
"अरे मी बाहेर आहे, यायला वेळ होईल, त्यो आपला ह्यो XXX (दुसरा मित्राचा reference) आहे काय बघ".
फोन तिसरा :
"कुठाईस रे"
"घरी आहे, कुठं जाऊ"
"अरे इथं टायर पंचर झालाय माझा गाडीचा, तुला यायला जमेल काय"
"अरे घरी पाहुणे आले आहेत, नाही जमणार"
अशे बरेच कॉल झाले, एका मागून एक. कोण आलं नाही पण फोन उचलला ह्यात आनंद होता आता.
फोन xxx वा:
"कुठाईस रे"
"बाहेर आलोय रे जेवायला, बोल कि काय काय"
"अरे इथं टायर पंचर झालाय माझा गाडीचा, मला वाटलं जवळ पास असशील, म्हणून कॉल केला"
""१५ मिंट थांब आलोच, हात धुतो आणि निघतो, आलोच"
"अरे जेऊन ये काय गडबड नाही, गाडी रस्त्याकडेला आहे, तू ये मग बघूया"
"पाऊसात कुठं थांबतोस रस्त्यावर, मी आलोच थांब, हात धुतो आणि निघतोच"
"आणि जेवण रे"
"मित्र संपवतील, जेवणाचा काय विषय नाही आणि कसपण पोट भरलं आहे माझं".
आयुष्यात अशे काही ठराविक क्षण असतात ना, जे फक्त तुम्ही स्वतः अनभवू शकता पण व्यक्त करता येत नाहीत, अश्याच प्रकार चा क्षण होता तो.
I was
more than happy, "अपना केहने वाला एक तो हे"
मित्राचा परत फोन आला, "मी निघत आहे, माझी गाडी दुसरा मेंबर घेऊन गेलाय. ५ मिंटात बाहेर पडतो मी".
मी गाडी बाहेर आलो, म्हंटलं परत एकदा प्रयत्न तरी करू.
हात भिजले असल्याने जोर लागत न्हवता. आता माझे हात वाळले होते.
"जय श्री राम" म्हणून टॉमी फिरवली, नट नुसता निघाला नाही, कट झाला.
पण चांगला म्हणजे नट तुटून बाहेर आला. चला म्हणजे ,आता स्टेपनी लावायला काही प्रॉब्लेम नाही.
मी लगेच मित्राला फोन केला, "निघाला टायर, लावली स्टेपनी, तू येऊ नको भावा"
"खरं काय, का गाडी लावून चालला आहेस घरी"
मी त्याला झालेला प्रकार सांगितला, मग तो थांबला.
स्टेपनी लावली आणि मी घरी निघालो.
वाटेत मला पाटील काकांची बोल आठवत होते ,"शेवटी कोणी नसते"
देवाच्या आशीर्वादाने, माझा मित्र परिवार फार चांगला, अडचणीत सगळे मदत करतात, पण त्या Critical वेळी एक का असेना सोबत होता,
ह्यातच सगळ्या आयुष्याचा आनंद होता.
"नाही" म्हणायला सतराशे साठ कारणं असतात, "होय" म्हणायला "सामर्थ्य" लागतं.
एक इंग्लिश फ्रेज आहे ""You may only be one
person in this world, but for someone you are the world."
कधी कुणाला तुमची नितांत गरज असेल सांगता येत नाही.
एक फोन,
एक मेसेज,
एक भेट
छोटी गोष्ट आहे, पण याने बरंच काही बदलू शकतं.
I
learned a few things that day,
Be
Humble,
Be Kind,
Be Calm,
Have
Gratitude,
Don’t
keep Grudge,
Forgive
easily,
Seek
blessings.
The
most important, "Be available, not by chance but by choice".
Moral of the story:
आयुष्यात तुम्ही कितीही पैसा मोह माया कमावली असेल, "शेवटी कोण नसतं".

Igts beautiful piece. I wonder why you stopped writing.
ReplyDeleteHave Gratitude!
ReplyDeletei was there...
ReplyDelete