मोबाईल ही गरज नसून व्यसन बनले आहे: पुणे-मुंबई-पुणे
मोबाईल :
प्रत्येकाचा जिव्हाळी चा विषय. कधी कल्पना केली आहे, मोबाईलशिवाय आयुष्य कसं असेल.
मला मोबाईल च्या वापरा विषयी काही म्हणायचं नाही, कारण प्रत्येका कड त्याचं स्पष्टीकरण तयारआहे.
विषय आहे मोबाईल महत्वाचा कि माणसं.
मी थोड्या दिवसांपूर्वी माझा गावी गेलेलो.
गाव माझा एकदम साधं,
साधी घरं, साधी रस्ते आणि साधी माणसं.
मी शेतावर गेलो, मला आश्चर्य वाटलं, तिथं ४G इंटरनेट होतं.
मी दुपारी तिथंच जेवायला थांबलो.
तात्या (माझे चुलते) आणि काकी आमच्या बरोबर, छपरात जेवायला बसले.
शेजारीच मोठी विहीर आणि म्हशींचा गोठा आहे, चिन्मय चा दंगा चालूच होता , येऊन जाऊन-येऊन जाऊन त्याचं जेवण चालू होतं.
मी विकास कुठं आहे विचारलं (विकास तात्यांचा मुलगा- माझा चुलत भाऊ), तर म्हंटले विकास कामावर गेलाय.
मी त्याला फोन लावला, पण लागला नाही.
तात्यांना
विचारलं तर त्यांना विकास चा नंबर माहित नाही, काकीला पण माहित नाही.
तात्यांनी
त्यांचा मोबाईल मला दिला, म्हंटले "ह्यात आहे का बघ नंबर..!!"
तात्यांचा
मोबाईल:
![]() |
| Thats my Nokia C-5, Photo is just for presentation sake...:) |
मोबाईल हातात घेताच मी पहिला नीलम कड बघितलं, तिला कळलं मला काय म्हणायचे आहे ते.
एकदम साधा फोन, basic पेक्षा पण साधा म्हंटलं तरी चालेल.
आजकाल मोबाईल हातात घेतला कि विचारतात:
१. कुठलं मॉडेल
२. कुठला ब्रँड
३. किती memory (Internal किती , memory कार्ड कितीचं)
४. कॅमेरा किती mega-Pixel.
५.
Display size किती.
६.
Battery किती ampere.
७. कुठनं घेतला, किंमत किती.
८.
Online ऑफर होती काय.
आणि लगेच फोन हातात घेऊन , एक selfie काडून, फोटो clarity बघून रिकामे.
पण तात्याचा मोबाईल तसा मुळीच न्हवता.
१. Brand
चं नाव mobile वर कुठंच न्हवतं
२. बटण दाबून त्यांचा कलर गेला होता , त्यावरचे अर्धे नंबर पण दिसत न्हवते.
३. मी मोबाईल पलटून बघितला , मागचं cover चिरलेलं होत.
४.
Camera न्हवता
५. Cover
न्हवतं
बटण दाबलं तर कळालं बॅटरी पण न्हवती म्हणजे संपली होती.
तात्या
"चार्जेर इथं नाही, तिकडं घरी आहे".
काकी कड तर मोबाईलच न्हवता.
आधी एक घर एक landline नंबर असायचा, पण आता प्रत्येत घरात प्रत्येक सदस्या कड स्वतः चा फोन असतो.
काकी कड मोबाईल नाही हे बघून मला नवल वाटलं.
काकी नं विकास चा नंबर बऱ्याच ठिकाणी शोधला, शेजारी शेतात पण विचारलं पण नंबर काय मिळाला नाही.
"मी
जाताना भेटतो त्याला कामावर, तू बस आता", मी म्हणालो.
जेऊन छपरात मस्त झोप लागली मला.
थोड्या वेळाने नीलम ने मला उठवलं. चिन्मय चा दंगा चालूच होता, तो जाऊन शेतात लोळून आला होता.
"निघतो आता आम्ही".
"जेवणाचं जा रात्री आता आलाय तर".
"नको पुढं अजून कामं आहेत, परत येतो राहायला".
"बर मग १० मिंट थांब , मी आलोच".
असा म्हणून काकी शेतात गेली.
पाऊस असला तर शेतातल्या रस्त्यावर चिखल असतो, गाडी आत पर्यंत जात नाही.
आता ऊन होतं, रास्ता तसा clear होता, म्हणून मी गाडी थेट शेता पर्यंत आणलेली.
काकी नं शेतातून तात्यांना हाक मारली, चिन्मय पण लगेच त्यांच्या बरोबर शेतात गेला.
छपरात मस्त गार वारा सुटलेला, मी आणि नीलम दोघंच निवांत बसलो होतो.
१५-२० मिनिटाने हि तिघं दिसू लागली.
चिन्मय ऊस घेऊन येत होता.
तिघांनी बरंच काय काय आणलं होतं.
१. ऊस (९-१० पेर)
२. शेवग्याच्या शेंगा (२५-३०)
३. वांगी
४. मिरच्या
५. टोमॅटो
६. चिंच
हे सगळं डिक्की मध्ये बसवलं.
आम्ही गावात घरी आलो. काकी नं गुळाचा चहा ठेवला (माझा आवडता चहा).
चहा शिजे पर्यंत तीन अजून काय काय आणला:
१. वाळवलेली हळद
२. अर्धा पोत भुईमूग
३. १ किलोभर लसूण (गड्डे)
मी नीलम कड बघत होतो. गाडीची डिक्की जवळ पास भरली.
तात्यांचा
मोबाईल नंबर माझा कड न्हवता, मी त्यांना विचारल.
"मला पण नाही माहित, विकास ला नंबर माहित आहे माझा".
मी त्यांचा मोबाईल चार्जिंग ला लावला. चालू होताच मी त्यांच्या फोन वरण स्वतःला कॉल केला तर "Balance Low".
मी काही बोललो नाही, मोबाईल तिथं ठेऊन दिला.
आम्ही घरातनं निघालो. गावाकडचं टाटा बाय बाय चिन्मय ला पण लई आवडतंय. सगळ्या आज्ज्या कुरवाळून त्याची पप्पी घेत होत्या.
मी निघालो, मला कार च्या आरशात ते दोघे दिसत होते, रस्त्यात उभे.
मला आठवत होता तो तात्यांचा मोबाईल.
मोबाईल आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक.
मोबाईल किंवा त्यातले Internet नसले तर १ तास, अख्या दिवसा सारखा वाटू लागतो (Theory ऑफ Relativity).
चांगला मोबाईल असला तरी, त्या पेक्षा चांगला मोबाईल घ्य्याची धडपड चालू असते, मग पैसे असो व नसो , EMI चा पर्याय सदैव आहेच कि.
साधे प्रश्न:
१. चांगला-महागातला मोबाईल घेऊन माणसं जोडता येतात का..??
२. मोबाईल ने नाती-संबंध घनिष्ट होतात का..??
३. मोबाईल हा माणसाचा पर्याय ..?? (CAN WE REPLACE PEOPLE WITH MOBILE)
आपण एखाद्याच्या फोनमध्ये फक्त एक contact नंबर झालो आहोत.
तात्यांशी
ना कधी मी फोन वर बोललो ना कधी chatting, आमच्यात नातं हे आहेच, पण त्यात आहे प्रेम, माया आणि आपुलकी.
दुसरा कोणी शिकलेला Modern असतं तर जे सगळं त्यांनी दिला त्याचा फोटो पाठवला असता , "Whatsapp" वर..!!
आणि आम्ही पण १-२ Smilies पाठवल्या असत्या.
आणि आम्ही पण १-२ Smilies पाठवल्या असत्या.
कधी कधी परंपरागत गोष्टी मध्ये मजा असते. जवळ बसने, बोलणे किंवा जवळ बसून बोलणे (इस मे किक हे)
त्या दिवसा पासून मला एक कळलं:
स्मार्ट फोन- आभासी प्रेम (Virtual/ Seasonal love)
साधा फोन- निष्पापप प्रेम (Innocent /True Love)
"जर तुम्ही असलंच निष्पापप प्रेम शोधत असाल तर, साधा फोन वापरणारी माणसं पहिला बघा, नक्की प्रेम आणि माया मिळेल".
जवळ एक चांगला फोन ठेवा, पण त्याच बरोबर मनात दानत पण असू द्या
जवळ एक चांगला फोन ठेवा, पण त्याच बरोबर मनात दानत पण असू द्या
Neil-The-Story-Teller



No comments:
Post a Comment