My Blog List

Tuesday, 19 March 2019

आपली माणसं


आपली माणसं

मी ब्लॉग्स लिहायला चालू करून तसे बरेच वर्ष झालेत.
मी नेहमी माझा बरोबर घडलेल्या छोट्या-मोट्या गोष्टींवर थोडं फार लिहीत असतो.
अलीकडे मला वैशिष्ठपूर्ण माणसं भेटत आहेत, जे मला त्यांच्या बद्दल लिहायला प्रेरित/ प्रोत्साहित करतात.

नव-नवीन कोणी ना कोणी तरी काहीतरी शिकवून जात.

माणूस हा सर्वात स्वार्थी प्राणी, नेहमी सगळी कड मी मी करण्यात पुढं.

मी,
माझं आयुष्य,
माझी नाती,
माझं कुटुंब,
माझे पाहुणे,
माझी मालमत्ता.....मीपणा ची उदाहरणं बरीच आहेत.

मी पण  त्यातलाच एक (No  one is Exempted)

पण जेव्हा मला ही वैशिष्ठपूर्ण माणसं भेटतात , ती आयुष्या कड बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातात.
हे छोटं लिखाण त्यांना समर्पित.

रविवार चा दिवस, मी आणि नीलम किरकोळ खरेदी साठी बाहेर गेलो होतो.
चिन्मय अज्जी बरोबर घरी बसला होता. पप्पा नेहमी प्रमाणे ऑफिस ला.
आम्हाला घरी  यायला सूर्यास्त झाला. नीलम ला म्हंटलं "घरी गेल्या गेल्या चहा पिऊ, चहा चं टाईमिंग झालंय".

घरी पोहोचलो तर दारात एक अनोळखी गाडी उभी होती.
मी गेट उघडून आत आलो. नीलम म्हंटली "चिन्मय ची सायकल दिसत नाही, दूध न पिताच खेळायला गेला वाटतं..!!"
अज्जी असली कि नुसता लाड आणि लाड असतो.
तोपर्यंत सायकल ची घंटी वाजवत चिन्मय आला, त्याला विचारणार दूध पिलास काय तोपर्यंत, "आज्जो चे friends आलेत, त्यांनी मला chocolate दिलं", असा सांगून तोंड उघडून दाखवून चिन्मय परत गायब.

मी आत गेलो, पप्पांचे मित्र आणि त्यांची बायको आली होती. त्यांच्या नाती चा पहिला वाढ-दिवस चं आमंत्रण द्यायला ते आले होते.

जुनी माणसं भेटली कि गप्पा चालू. मला हे असलं काही ऐकला लई आवडतं.
कारण आपण नसताना घडलेले हे किस्से, गोष्टी , अनुभव असतात , ज्या आपल्याला आपल्याच माणसांचे छुपे पैलू दाखवून जातात. 

अश्या बोलण्यातूनच आपल्या माणसांची ओळख होते. आपल्या साठी त्यांनी घेतलेलं कष्ट,

सोसलेल्या यातना ह्या नकळत.

काकू अनेक असे किस्से सांगत होत्या.थोडा वेळ आम्ही सगळी त्या काळात जाऊन पोहोचलो होतो.

नीलम नं सगळ्यांना चहा आणून दिला. चहा संपला पण काकू काय थांबल्या नाहीत.
त्या बोलत होत्या आणि मी शेजारी बसून सगळं ऐकत होतो.
त्यांनी काय सांगितलं हे महत्वाचं होतच पण त्या पेक्षा महत्वाची होती "आपुलकी".

त्या निरोप घेऊन निघताना, माझा खांद्यावर हात ठेऊन म्हणाल्या "मी इतकं कधी बोलत नाही, पण आपली माणसं भेटली कि कसं बरं वाटतं".

हे वाक्य ऐकून, माझे डोळे एकदम चमकले. काका-काकी ना जाऊन बराच वेळ झाला होता.
पण मी तसाच बाहेर झोपाळ्यात बसलो होतो.
मी विचार करत होतो,

हे काका-काकी आमचे कोण, ना रक्ताचं नातं , ना आमचे पाहुणे.
आम्हाला जोडते ती "आपुलकी-माणुसकी-प्रेमाचं-विश्वासाचं"

जेव्हा आपण म्हणतो ना आपली माणसं, तेव्हा आपला त्यांच्या वर आपल्या पेक्षा जास्त विश्वास असतो.

कोणीही कधी एका क्षणात आपलं होत नसतं, त्या साठी थोडा वेळ द्यावा लागतो.
आयुष्याच्या खडतर मार्गावर एकत्र प्रवास करावा लागतो.

काकी नी बोलता बोलता अनेक उधाहरण दिलीत, कारण त्यांनी ती अनुभवली होती.
आज च्या थोड्या क्षणां मध्ये गुंतवणूक म्हणजे आयुष्यभाराचा साठा.

आपणं आज जे चांगले-वाईट अनुभवतो ते उद्या आपण इतरांना सांगू शकतो, कदाचित त्यालाच म्हणतात अनुभवाचे बोल.

आयुष्य सगळ्यांची परीक्षा घेते, यातून कुणाची सुटका नाही, पण मला वाटतं जर अश्या कठीण प्रसंगी जर  "आपली माणसं" बरोबर असतील तर दृश्य काय वेगळंच असेल.

आपली माणसं काय देतात:
१. साथ: ज्याने मिळतो विश्वास कि कोणीतरी बरोबर आहे.

२. मत/ अभिप्राय: आपण जे करत आहोत ते बरोबर आहे असे कुणीतरी सांगितलं कि आत्मविश्वास येतो.

३.उपस्तीथी: कधी कधी फक्त शेजारी उपस्तित असणे हि सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. 
खांद्यावर एखादी थाप, धैर्याचे दोन शब्द, एक उबदार मिठी फार महत्वाची असते.

४. वेळ: सगळ्यात महत्वाचा घटक, आपण कुणाला जेव्हा आपला वेळ देतो, तेव्हा आपल्या आयुष्यातला एक अनमोल भाग देत असतो.

आपली माणसं,

काही न बोलता सगळं समजणारी,
आपली माणसं,
सुखात सगळी असतात, पण दुःखात सोबत देणारी,
आपली माणसं,
कधी आपुलकीची साथ तर कभी पाठी वरून मायेचा हात.
आपली माणसं,
यश्या च्या गर्दी मध्ये लांब असणारी, पण अपयशा मध्ये नक्की जवळ असणारी,
आपली माणसं,
समज देणारी आणि गैरसमज न करून घेणारी,
आपली माणसं,
आपली माणसं,
आपली माणसं,...!!!


नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या आयुष्यात असतात अशी हि "आपली माणसं".

आणि जर तुम्हाला आज पर्यंत कोणी आपला माणूस भेटला नसला तर तुम्ही कुणाचा तर "आपला माणूस" व्हायचा प्रयत्न नक्की करा.


Neil-The-Story-Teller

1 comment: