FIRST KISS:
RD आणि तेजूच्या प्रेमाच्या प्रवासा बरोबर, पावसाळा ऋतू हि चालू झाला.
एकेदिवशी कॉलेज मध्ये "National Level Paper
Presentation" ची जाहिरात लागली. मोठा Event होता, म्हणून बऱ्याच
विद्यार्थ्यांनी त्याला नोंदणी केली. RD ला त्याबद्दल फार उत्सुकता नव्हती,
पण जेव्हा त्याला समजलं की तेजू पण सहभाग घेणार आहे त्यानेपण लगेच नाव नोंदवले.
Event हा एक महाविद्यालयावर होता जो दुसऱ्या शहरात
जवळपास ३५-४० किलोमीटरच्या अंतरावर होता. RD "Transportation
committee"चा सदस्य होता आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांकरिता वाहतूक
करण्यासाठी जबाबदार committee वर होती. पाऊस होता म्हणून त्यानी सर्व
विद्यार्थ्यांसाठी एक बस बुक केली, पण RD स्वतः मित्राबरोबर बाईक ने गेला.
कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता होता. राष्ट्रीय
पातळीवरील कार्यक्रम असल्यामुळे, विविध शरातील विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला
होता. Teju was a studious girl & here paper presentation was great as
expected. RD तेजू इतका हुशार न्हवता पण vocabularyआणि आत्मविश्वास भरपूर
होता. त्याचे Presentation Skills देखील प्रभावी होते. कार्यक्रम २:00 वाजता
समाप्त झाला. २:३० वाजता निकाल घोषित होणार होते. अपेक्षे प्रमाणे तेजू चा
पहिला नंबर आला आणि त्यांच्या कॉलेज ला पण बरीच बक्षिसे मिळाली. RD ला
काही बक्षीस मिळालं नाही, पण तेजू चा नंबर आलाय हे ऐकून तो एकदम खुश होता.
त्या महाविद्यालयाने विजेत्यांसाठी विशेष
"Guest Lecture" आयोजित केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी बसमधून
परत निघण्याचा निर्णय घेतला, पण तेजू ला ते Lectureसाठी थांबायचे होते. तिनं हे RD
ला सांगितलं. RD ने इतर सर्व विद्यार्थ्यांना बसमधून जाण्यास सांगितले आणि तो
तेजू बरोबर थांबून नंतर बाईक वरून परत येईल असा plan केला."Guest
Lecture" BARC चे एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ यांचे होते. It was a nice
session. ४ वाजता कार्यक्रम संपला . RD उत्सुकतेने कार्यक्रम संपायची वाट
पाहत होता, कारण परतीचा रस्ता तेजू बरोबर चा होता. सगळं आटपून दोघे पार्किंग
मध्ये आले.
"आज कोणतरी लै खुश दिसतंय,..!!"
तेजू गालात हसली."महिन्याची मेहनत कामी आली
एकदाची".
"सकाळ पासून नुसती पळा-पळ चालू होती, आता जरा
बारा वाटतंय", तेजू म्हणाली.
"काय राव,,,,एवढ्यात दमला होय,,,,!!"
"अरे खरंच सकाळ पासून नुसता गोंगाटा
आहे,,,,जरा शांतता पाहिजे आता..!!"
"इथे जवळच एक गड आहे, तू पहिला आहेस काय,,??
एकदम शांत आणि मस्त वातावरण असते"
"नाही रे, मी नाही गेलो कधी तिकडं, किती लांब
आहे इथून"
"जास्त नाही १०km असेल, १५-२० मिनिट
अंतर".
"Next Time कधीतरी जाऊया, कारण परत इथून माग
घरी पण जाईचा आहे ना आणि पावसाचं वातावरण पण झालं आहे..!!"
"Next Time असं
काही नस्तय, सगळी अंध-श्रद्धा आहे".
तेजू हे ऐकून हसली."चल मग आताच जाऊया".
RD खुश झाला, कारण त्यांना थोडा का होईना निवांत
एकांत वेळ मिळणार होता.
दोघे तिथं थोड्या वेळात पोचले.
पावसाळ्या मूळ सगळं हिरवं गार होतं.
गड चांगल्या परिस्थितीत होता आणि गडा वर एक छान
उद्यान पण होते.
दोघे तिकडं गेले. तिथं त्यांना खायला “भाजलेलं कणीस” घेतलं
उद्यानात एका बाकड्यावर बसले, वर्दळ फार कमी होती.
आभाळ दाटून आलेलं आणि छान वारं देखील सुटल होतं.
तेजू बाकड्या वर RD कड तोंड करून बसली.
RD आपल्या पारंपरिक बसण्याच्या शैलीत होता, एकदम शांत आणि डोळे जमिनी मध्ये रुतलेले.
"काय झालं साहेब , तू इतका शांत का आहेस
???".
"तुला काय माझी भीती वाटते काय, मी समोर असलो
कि एकदम शांत असतोस, इतर वेळी नुसता दंगा-धुडकुस चालू असतो तुझा..!!"
"एवढा शांत मला नाही आवडत, काहीतरी
बोल".
RD तेजू कड नबघता म्हणाला, "मला काय बोलायचे
माहित नाही, तू इथे माझ्याबरोबर आलीस, ह्यातच मी खूष आहे".
RD, “एक सांगू”
तेजू, "एक नको दोन सांग"
RD, "मला इथं
नेहमी यायचे होते आणि ते पण कुणीतरी "खास"व्यक्ती बरोबर".
PAUSE,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
"आणि माझा साठी
तू एकदम खास आहेस, Very Very Special”
दोन मिंट एकदम शांतता.
तेजू RD कड एकसारखं टक लावून बघत होती.
RD आपलं मान खाली घालून शांत, ना एक ना दोन.
तेजू, "तू मेरी acting कर रहा
हे".
"म्हणजे ..??"
तेजू,"काही नाही रे,,,,,!!!"
तिने RD चे दोन्ही हात धरले , "तू हे म्हटलंस
त्यात मला आनंद आहे".
ती RD च्या एकदम uncomfortably जवळ आली होती, इतकी
जवळ कि तिला RD चा वाढलेले हृदयाचे ठोके जाणवत होते.
RD ह्या क्षणा साठी तयार न्हवता, पण somewhere
down the heart he had wished for it.
RD was quite nervous & so was Teju.
तितक्यात जोराचा वारा चालू झाला. तेजू ने RD चा
हात अजून घट्ट धरला.
तेजू अजून पण एकटक RD कड बघत होती, हे RD ला पण
जाणवलं.
थोडी हिम्मत करून RD तेजूच्या नजरेत नजर मिळवली.
उद्यानात त्यावेळी जवळ-पास कोणीही न्हवते. डोळ्यांचा खेळ चालू झालेला.
"तुम्ही कितीही
प्रयत्न करा, डोळ्यांना बोलण्या पासून कोणीही थांबवू शकत नाही."
"आँखे किसीके मोहताज नही होते".
फक्त दोघांचे डोळे बोलत होते. तेजू RD च्या अजून
जवळ आली, RD ला जाणवलं.
दिल तो पागल हे वाला dialogue, "और
पास-और पास" वाला scene.
तेजू ने RD च्या हाताला घट्ट पकडलं. RD चे Heart
Beats Extreme वाढले होते.
तेजू RD जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर डोकं
ठेऊन झोपली.
दोघांच्या पण मनात भावनांच वादळ चालू होतं. RD ने
अलगद असा आपला हात तिच्या खांद्या वर ठेवला. तेजू RD च्या डाव्या बाजूला बसली
होती.
बाहेर ढग गडगडात होते आणि दोघांची हृदयं पण.
दोघं हि तशाच Position मध्ये ५-६ मिंट होते, ना एक
शब्द ना हाल चाल.
"तेजू"
"बोलू नकोस
काय,,,,मला हा क्षण साठवून ठेवुदे".
RD ने आजूबाजूला कोण आहे का बघायला मान इकडे तिकडे
वळवली.
पाऊस येणार म्हणून बहुतेक सगळं शांत होतं, कोणीही
न्हवतं.
"RD..!!"
"बोल ना..!!"
"काही नाही".
"अरे काय झालं".
"काही नाही रे, असंच".
RD ने त्याचा खांदा जरासा उचलला, तेजू त्याच्या
कडे बघावं म्हणून.
तेजू, "काय झालं".
"तू सांग, बोलता बोलता शांत का एकदम".
"काही नाही, असंच".
RD ने परत खांदा जरा हलवला.
तेजू ने वर बघितलं, तेव्हा RD अगदी तिच्या चेहऱ्या
समोर होता.
“That was the very
moment”.
त्यांचे डोळे एकमेकात रुतले होते.
दोघांना एकमेकाची उब आणि प्रेम जाणवत होतं.
तेजू लाजून खाली बघणार तोपर्यंत, RD ने उजव्या
हाताने तिचा चेहरा पकडला.
तेजू पुरती घामावली होती, तो क्षण अतिशय रोमांचित
होता.
वादळाची चिन्हे जितकी बाहेर होती, तितकीच दोघां
मध्ये होती.
वारा सुटल्या वर कशी अचानक पहिली वीज अनेपक्षित
पडते तसं झालं.
दोघे हि एकमेकात पुरते हारवले होते. RD ने तेजू ला
अजून जवळ ओढलं,
तेजू त्याच्या ओघात होती.
पाऊस जसा नभातून
जमिनीच्या भेटली आतुर असतो, तीच परिस्थिती होती.
RD चं कपाळ आता तेजूच्या कपाळावर होतं. एकमेकांचा
वाढलेला श्वास दोघांना जाणवत होता.
दोघांचे डोळे बंद झाले आणि "They
Experienced-The First Kiss".
RD चे ओठ तेजूच्या ओठांवर होते. पहिल्या प्रेमाचा
पहिला Kiss- Priceless.
(पोटात फुलपाखरू उडत
होती, ती जी feeling असते ना, एक नंबर, Out of the World)
थोड्याच क्षणात दोघे हि भानावर आले. दोघेही
एकमेका कड पाहत होते. तेजू ने RD ला घट्ट मिट्टी मारली. RD ने अलगद तिला
कुशीत घेतलं.
The Hearts were
beating in Sync now.
जश्या भावना जुळल्या होत्या, तशीच त्यांची मन
देखील जोडली गेली होती. दोघांचे हृदयाचे ठोके एकसाथ पडत होते. प्रेमाची उबदार
मिठीत दोघं हरवले होते.
Return journey was Fantastic.
RD ने तेजू ला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडले.
RD पुढं हॉस्टेल ला गेला. दोघं शरीराने जरी
दूर असले तरी अजून ते तिथंच होते "एकमेकाच्या उबदार मिटत".
ती गुलाबी रात्र, मोठी असणार होती , कारण ना
मन ठिकाण्यावर होते ना डोके आणि ना हि विचार.
अर्दी रात्र दोघांनी जागून काढली, नंतर निद्रादेवी
त्यांच्यावर प्रसन झाली.
>>>>>>>>>> भाग ४ समाप्त<<<<<<<<<<
Link to Next Chapter

No comments:
Post a Comment