लोक/ व्यक्ती/ माणसं: आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक.
दररोजच्या दिनक्रमात आपण बऱ्याच भिन्न-भिन्न लोकांना भेटतो.
प्रत्येकाची आयुष्याशी लढाई चालूच असते.
"आयुष्यात सर्व-सुखी आणि संतुष्ट असं कोणीच नाही",
फक्त काही ते दाखवतात आणि काही ते लपवतात.
हे छोटं लेखन अश्या सर्वां साठी.
हे मला लिहू वाटलं, त्याला कारण माझा बरोबर घडलेला एक प्रसंग.
आमचा घरचा Transport चा व्यवसाय. मागच्या वर्षी ह्याच वेळेला, आमच्या ट्रक चा भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता, कि ट्रक चं केबिन तुटून पडलं होतं, काही म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नाही.
फक्त नशीब बलवत्तर म्हणून ड्राइवर थोडक्यात वाचला.
ट्रक चा एक आणि एक भागाचा चुररा झाला होता.
नुकसान दुरुस्ती पलीकडे झाले होते, It
was Total Loss.
ट्रक भंगार वाला घेऊन गेला.
ट्रक म्हणजे आम्हाला आमच्या घरच्या सदस्य सारखा आहे आणि त्याची ती विद्रुप अवस्था मला बघवत न्हवती. पण व्यवसाय म्हंटलं कि हे सगळं आलंच.
वर्ष सरलं, आम्ही त्या धक्क्यातून हळू हळू सावरलो.
एक दिवस मी आणि मम्मी काही कामा निम्मित बाहेर जात होतो.
आणि अचानक एका वळणावर "तो" दिसला.
माझा छातीत एकदम धस्स झालं, एक ठोका बहुतेक चुकला असावा.
"तो", दिमाखात उभा होता, तेच रूप, तोच थाट, तीच शान, तो होता माझा ट्रक-MH०९-५५९०.
मला दुसऱ्याच क्षणात आटवलं, त्याचा झालेला अपघात आणि त्याची ती वाईट परिस्थिती.
पण आता समोर होता तो नव्याने उभारलेला, नव्या जोश मध्ये, नव्या चेहऱ्याचा "५५९०".
जुनं रूप आठवून जे माझं मन सुन्न झालेलं, ते आता सध्याची स्थिती पाहून प्रफुल्लित झालं.
"आपलाच ५५९० आहे, मी आलोच", मी गाडीतून उतरलो आणि दोन क्षण त्याच्या समोर थांबलो आणि त्याला स्पर्श केला.
तो आता माझा नव्हता पण आमचं नातं अजूनही अबाधित होतं.
CONNECTIONS ARE MADE WITH HEART NOT WITH
TONGUE.
मी गाडीत येऊन बसलो, "आपलाच आहे, तयार केलाय त्याला परत".
मम्मी पण एकदम नि:शब्दपणे त्याला बघत होती. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं.
"अगं रडायला काय झालं..!!".
"बऱ्याच कष्टानं घेतलेला रे हा ट्रक आपण, अपघात झाला तेव्हा फार वाईट वाटलं मला".
"मुला सारखा जपला आपण त्याला आणि त्याचा एकदम कचरा झाला त्या अपघातात".
"म्हणून देऊन टाकलं त्याला आपण, पण आता परत त्याचं, आहे तसं जुनं रूप बघून, मन भरून आलं".
ते शब्द ऐकून कळलं, नातं काय असतं, ते माणसा पुरतं मर्यादित राहत नाही, ते त्या पलीकडे असते.
मला असाच एक विचार आला, जो काल पर्यंत संपूर्णपणे तुटलेला एक ट्रक, जर आज परत उभारू शकतो,
तर अशी कित्येक तुटलेली माणसं देखील आहेत, जी एखाद्या घटना/ नियतीचा आघात/ वाईट अनुभव अश्या बऱ्याच कारणांमुळं खचली होती आणि ती परत पुनर्संचयित (Restore) झाली असतील/ आहेत.
जुन्याच नवं केलेलं कळतं, थोडा फार समजूनही येतं, पण कधी बिखरलेली व्यक्ती परत एकजूट झाली कि ओळखता येणं फारचं कठीण.
५५९० माझा साठी एक नवी उमंग आहे, कधी वाटलं कि आयुष्याची नाव ह्या अथांग समुद्रात भरकटत आहे, मी ५५९० ला आठवतो. शून्यातून जसा तो परत उभा होता, तो एक आदर्श उद्धरण होता.
माझा साठी ५५९० एक प्रतीक आहे, तुटलेल्या/ नियतीपुढं हरलेल्या व्यक्तींचं,
जी एका घटने मूळ, ती काही हि असेल, जसं कि:
एखादा जीव घेणा अपघात, एखादा चुकलेला निर्णय, एखादी व्यक्ती आयुष्यातून हरपणे….!!!
किंवा एखादा छोटा प्रसंग असेल, जसं कि आपल्या एखाद्या माणसा बरोबर झालेलं भांडण, घरगुती तंटे, नात्यात दुरावा , कामाचा तणाव इत्यादी.
अशी बरीच कारणे आहेत, ज्या मुळे कित्येक माणसं निराश (Depression) होतात.
त्यातून सावर्ण हे देखील कठीण असतं, कधी कधी तो "एकेरि मार्ग" असतो.
पण अश्या परिस्थितींवर मात करून जे बाहेर येतात ती खरी प्रबळ माणसं म्हणावी लागतील.
हे बोलणं जितकं सोपं, तेवढंच ते अमलात आणणं त्याहून कठीण.
मला हे पण मान्य आहे मी जे उधाहरण देत आहे ते एका "ट्रक" चं आहे,
Its a Machine, ते यंत्र आहे, तो सजीव नाही, पण ह्याचं तात्पर्य किंवा बोध काय, ते म्हणतात ना,
"पतझड़ के बाद ही आते हैं दिन बहार के, जीना क्या है जीवन से हार के".
"पावसा नंतरच इंद्रधनुष्य दिसतो."
अश्या कठोर परिस्थिती, व्यक्तिमत्व" बनवतात आणि कालांतराने फक्त तीच आपल्याबरोबर राहते.
तात्पर्य काय, जर तुम्ही अश्या परिस्थिती मध्ये सापडला, तर स्वतः वर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं
"चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य ठेवा".









No comments:
Post a Comment