नातं म्हंटलं की एकदम धीरगंभीर विषय.
तसं आहे देखील, पण जर त्याला शांत पणे हाताळले तर त्याहून निराळं
काहीच नाही.
हे लिखाण अश्याच एका नात्या बद्दल (काल्पनीक आहे ☺), जिसको मंजिल तो हासील ना हुई, शायद उस्का सफर हि उसकी मंजिल थी.
कथे मधील पात्र जवळ काल्पनीक आहेत, खरोखर मध्ये काय असलं तर योगायोग समजावा.
वर्ष होतं १९९९,माझी दहावी ची परीक्षा. शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा.
तशे सगळे टप्पे मी उड्या मारतच आलो होतो, हा पण तसाच एका उडीत पार केला. ११-१२ कशी गेली कळलंच नाही. बघता बघता १२ चा निकाल लागला आणि मला इंजिनीरिंग ला प्रवेश पण मिळाला.
Engineering: काय राव पब्लिक,एकदम कडक.
मुलांची कपडे ब्रँडेड, shoes ब्रँडेड, वह्या पण ब्रँडेड, कॉलेज ला bike नं येणं जाण, माझा साठी सगळं कसं निराळाच जग. आम्ही बस वाले कार्यकर्ते,कपडे एकदम So-So लै वाईट पण नाही, लै झाक-पुक पण नाही, Typical middle-class merit मेंबर. हे सगळं वातावरण पचवायला मला एक वर्ष गेलं.
Engineering म्हंटलं कि Submission, Orals आणि महत्वाचं म्हणजे
private classes.
मी देखील एक-दोन विषयांना क्लास लावला होता. दिवसा कॉलेज आणि संध्याकाळी क्लास ह्यातच दिवस खल्लास.
आम्ही ३-४ मेंबर, क्लास च्या सरांचे आवडते विध्यार्थी, अभ्यासा मूळ नाही, फक्त दंग्या मूळ.
दररोज काहींना काहीतरी नवीन विषय आहेच. आम्ही Last Bench वर बसायचो आणि कोण कधी आलं कधी काय केला ह्यावर आमची नजर, watchman म्हणा जवळ पास. क्लास झाल्या झाल्या कळालं कि “ती” इथली नाही, म्हणजे बाहेर गावा वरून शिकायला इकडं आले. Engineering days, इथं "पेहला नशा - पेहला खुमार", असं daily होतंय.असाच एक दिवस क्लास चालू असताना "ती" आली. अर्थात ती माझा कॉलेज ची न्हवती,क्लास म्हंटलं कि सगळं गाव एकत्र.
"ती" म्हणजे आमच्या क्लास ची नवीन विद्यार्थी. क्लास मध्ये हिरवळ खूप होती, पण का कुणास ठाऊक ‘ती” आवडली मला.
उंची जवळ पास ५ फूट ५ इंच असेल, मध्यम बांधा, साधा पंजाबी ड्रेस (चिकन material वाला), केसात पट्टा (शाळेत मुली घालतात तसा), एकदम साधे चप्पल, बहुतेक तिच्या कानात पण फक्त एकदम लहान मणी होते, क्लास च्या टेबल वर नेहमी वही ठेऊन त्यावर आडवा Cello Gripper पेन ठेवायची आणि बाजूला हात-रुमाल.
ते म्हणतात ना "सादगी मी सुंदरता होती हे", तसंच कायतर. आमचा हनुमान गॅंग, सगळे कशे ब्रह्मचारी , नुसती पोरंच-पोरं. मुली ग्रुप मध्ये नाही कारण, त्यांच्याशी बोलायची हिम्मत तर नाहीच आणि तोंडात नेहमी शब्दांची फुलंच फुलं, Adjectives to be specific.
तिची ओळख करून द्यायला एक पोरगी बोलली तर पाहिजे आधी. आणि त्यात भर म्हणून माझा तोंडावर मोड्या, चष्मा आणि कुरुळी केस. बाकी पोरं बघून मला तर inferiority complex यायचा. मुली असलेला ग्रुप पेक्षा पोरांचा हनुमान गॅंग बरा.
पण मला माहित न्हवतं हा अबोला असाच पुढं देखील कित्येक वर्ष असणार आहे.
क्लास चालू होता वर्ष सरत होते. आम्ही दररोज भेटायचो (डोळ्यांची भेट-बोलणे नाही).
ती नेहमी क्लास ला लौकर यायची, मी नेहमी १० मिंट लेट. कधी चुकून लौकर गेलो कि एकदम awkward situation. क्लास बेसमेंट ला होता, म्हणजे खाली गेलं कि direct क्लास च्या आत जायला लागायचं. बाहेर corridor न्हवता. आम्ही क्लास बाहेर गाडीवर थांबायचो. क्लास कड पाठ करून, पण गाडीच्या आरशातून लपा-छपी चालू असायची. ती दारात उभी असली कि आरशातून दर्शन. एक-दोन वेळा मी क्लास मध्ये गेलो आणि आत ती होती,
तीन बघितलं आणि बघून न बघितल्या सारखं केलं. मला कळलं तिनं बघितलं ते, मी तिथंच उभा राहिलो, इतक्यात "पलट", तिची दुसरी नजर आणि मेरा दिल गार्डन गार्डन हो गया.
माझी Confidence level Minus मध्ये होती , तोंडातून शब्द फुटेनाच. लगेच परेड पीछे मूढ आणि तेज चल.असा योगायोग बराच वेळा झाला, पण परिस्थिती जैसे थे.
४ साल बाद, हमारे बीच था एक नाता खामोशी का, खामोशी बातो की, खामोशी
आँखो की, खामोशी बस खामोशी ...!!!
वर्ष सरत होते, वेळ जात होता आमची परिस्थिती "जैसे थे".
Final Year ला Inter-College cultural event होता.
As usual आम्ही गर्दीत होतो, माहोल करायला, नुसता दंगा.
Event "तिच्याच" कॉलेज मध्ये होता, मला उत्सुकता दर्शनाची.
मी फुल्ल तयारी मध्ये,
ब्लू जीन्स आणि एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लू जीन्स जॅकेट, mudtrail चा १ इंच जाड सोल वाल ब्लॅक शूज -एकदम कटात.
तीन एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता, किरकोळ रोल होता, पण माझं
लक्ष्य तिकडंच. पूर्ण वेळ मी त्यांच्या कॉलेज च्याच घोळक्यात होतो. फक्त "नजर-नजर"
चा खेळ चालू होता. इव्हेंट संपत आला होता, मित्र म्हणाले चला, नाही जाऊन सांगतो कुणाला
, थांबायचं कारण सांगू तर कसं. आम्ही सगळे बाहेर आलो, एक एक मेंबर निघू लागला. आम्ही २-३ मेंबर
राहिलो होतो.
आम्ही डोळ्याने फार बोलतो म्हणे,,!!
थोड्या वेळात त्यांच्या Event Co-ordinator आला, माझी काय ओळख नाही,
पण माझा मित्र त्याला ओळखत होता.
त्यांच कायतर बोलणं झालं आणि मित्र परत आला.
"तू घरीच जाणार आहेस काय??"
मी म्हंटलं "हो, पण काय विषय??"
"अरे कुणाला तर सोडायचं आहे आणि गाडी पाहिजे"
"जा कि मग"
"अरे नाही ते स्वतः जाणार आहे, फक्त गाडी पाहिजे, तुझी CBZ
देकी, येतो म्हणतंय लगेच, शेजारीच जायचं आहे"
"तेला आधी विचार, CBZ चालवून माहित आहे काय?? नाहीतर धडपडल कुठं तर"
"येत्या म्हंटलाय"
"गाडी ला काय झालं तर तू जबाबदार, लक्ष्यात ठेव, दे तेला गाडी".
त्या भावाला गाडी दिली, मागं बघितलं आणि हृदयाचा ठोका चुकला राव,
"ती" उभी होती.
आईच्या गावात , ह्यो आता माझा गाडीवरुन "तिला" सोडणार,
खावा शेंगा.
भाऊ गादीवर बसला आणि मग ‘ती”, situation एकदम वाईट,
त्यात तो म्हंटला, "भाव गाडीत पेट्रोल आहे ना, मी इथेच चालो आहे शेजारी, तरीपण विचारलं?"
आमचा Ego जरा Hurt झाला तेव्हा, शब्द पडू न देणे आमची खासियत होती
तेव्हा,
एकच dialogue,
"आमच्या अंगात पाणी (त्याच्या कड बघत), मनात प्रेम (तिच्या
कड बघत) आणि गाडीत पेट्रोल (टाकीवर हात ठेऊन) always Full".
हसली सगळी आणि ती पण.
"ह्याचे गियर कशे आहेत ??" त्यान विचारलं.
"एक फूड आणि (तिच्या कड बघत मी म्हणालो) ४ मग"
"गियर शिफ्टर कुठं आहे, फक्त पुढं आहे, मागचे गियर टाकायचे
कशे".
"गियर च्या खाली पाय घाल आणि उचल गियर".
त्याला काय जमेना.
तोपर्यंत कोणातरी त्याला हाका मारत आलं, त्या भावाला आतून बोलावणं
आल होतं.
त्यो माझा मित्राला म्हणाला, "भावा एक हेल्प करणार काय, हिला
गर्ल्स हॉस्टेल ला सोडणार काय, तिला जायचं आहे".
मित्र म्हणाला, "हे गाडी कुणाला देत नाही, त्योच सोडेल तिला.
काय प्रॉब्लेम नाही".
"तू जाशील का ह्याच्या बरोबर, इथल्याच कॉलेज चा आहे".
ती बोलली,"चालेल मला, मी ओळखते त्याला, आमच्या क्लास मध्ये
आहे हा".
आगायाया, डोळ्यात पाणीच ओ, तिने ओळख दाखवली आणि काय पाहिजे.
मी पुढे बसलो आणि ती मागे. CBZ ची मागची सीट थोडी उंच आहे, त्यात
Disk Break. सगळं कसं जुळून आलं होतं आज.
"पेह्ली बार कोई लाडकी, मेरी गाडी के बॅक सीट पे बैठी थी",
मी कंप्लिट ढगात. असं वाटतं होतं, कि असच Long Drive ला जावं इतक्यात
"चला".
आली ऑर्डर , गाडी स्टार्ट, गर्ल्स हॉस्टेल जवळचं होतं, २ km अंतरावर.
५ वा गियर पडे पर्यंत मंझिल आ गयी.
तो १ मिंट माझा साठी फार मोठा होता, वो केहते हे ना "सफर खूबसूरत
हे मंजिल से भी".
All I remember was her presence with me, सूर्य ग्रहण असतं ना क्वचितच
घडणार , तशी आमची भेट होती.
चंद्र इतक्या लांबून समुद्रात ओटी- भरती आणतो आणि इथं तर चंद्रच
समुद्रात होता, मनात नुसत्या लाटांवर लाटा.
तिला मी हॉस्टेल ला सोडलं, ना ती काही बोलली ना मी काही.
जाताना फक्त डोळ्यांनी थँक्स बोलली.
यार वो रात भी क्या रात थी, रात्र आपलीच होती , फक्त
Flash-Back, सुरज सर को हॅलो करके सोया मे उस दिन.
परत आमची गाठ-भेट झाली नाही.
Final Year ची शेवटची semester झाली, प्रोजेक्ट ची ओरल पण झाली,
त्या वेळी campus interview असलं काय न्हवतं.
So exam संपली कि direct दुकान बंद.
मोबाईल होता माझा कड पण तिचा नंबर मागायचं धाडस न्हवतं.
अपना साथ और सफर शायद यही तक कुकम्माल था, it was destined to happen
this way.
पण जे आहे ते आहे, एखाद्या वाटसरू ला साथीदार भेटला कि प्रवास छान
होतो. हे तसंच होतं.
कॉलेज के इस तरफ हम life को नचाते हे और कॉलेज के ऊस तरफ life हमे
नचाती हे- रंग दे बसंती.
Now was the turn to dance on the life beats.
जॉब चालू , पळा पळ,
हे गाव ते गाव,
हि कंपनी ती कंपनी,
हि प्रोफाइल ती प्रोफाइल,
एवढा पगार तेवढा पगार,
काम एके काम,
करिअर एके करिअर......!!!!!!
बरीच वर्ष सरली.
मी जॉब साठी दुसऱ्या शहरात गेलो, माझा लग्नं झालं आणि एक मुलगा पण आहे. एकदा मी , बायको आणि माझा मुलगा जवळच्या गणपती मंदिर ला गेलो होतो. मंदिर तसं जागृत असल्याने गर्दी फार असायची. आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात बसलो. मी मंदिरात आलो कि १-२ मिंट शांत डोळे मिठून बसतो. मी आपलं मांडी घालून डोळे मिठून मनातल्या मनात चालू होतो.
थोड्या वेळात मी डोळे उघडले तर समोर एक छोटी मुलगी होता मध्ये पेढा
घेऊन उभी होती.
मी हसलो ती पण हसली, तिने मला पेढा दिला,
मी हसत म्हंटलो," मला तर दोन दोन पेढे लागतात",
"एकच आहे",
"दोन दिले तरंच मी घेणार",
"आणतो थांबा",
ती खरोखर पेढा आणायला पळत गेली,
"अरे बाळ, थांब",
ती गर्दी मध्ये गायब झाली.
आम्ही तिथेच बसून होतो, इतक्यात "हे घ्या दोन दोन पेढे",
"Thank you बाळ", म्हणे पर्यंत गायब.
मी पेढा मुलाला दिला, इतक्यात “ती” परत आली
आणि हृदयाचा ठोका परत चुकला ना राव,
छोट्या मुली ने जिचा हात धरला होता "ती" म्हणजे कॉलेज
ची "ती" होती.
"मम्मा ह्यांना दोन पेढे दिले मी", मुलगी म्हणाली.
तिला कॉलेज ला असताना कधी साडी मध्ये बघितलं न्हवतं, १० वर्षात बरंच काही बदलतं.
इरकल ची साडी, हाता मध्ये सोन्याचं वाड आणि काचेच्या बांगड्या, उजव्या
हाता मध्ये घड्याळ,
कॉलेज ला असताना तिचे केस कुरळे होते, बहुतेक तिने आता straightening
केले असावेत, चंद्रकोर टिकली, कानात लटकणारी डोर्ली छान होती, उजव्या हातावर मागं
"टॅटू"कोरला होता, पण काय लिहिले ते स्पष्ट दिसलं नाही.
जसं मी तिला ओळखलं, तसं तिनेही मला ओळखलं, पण फक्त शांतता- “अबोला” अजून हि कायम होता.
मंदिरातली गर्दी माझा साठी गायब झाली.फक्त डोळे बोलत होते,
मी माझा बायको कड तिला नजरेनं खुणावलं ,"ह्या माझा सौ", तीन लगेच एक भुई उडवून smile दिली, "जोडी जमले कि", असा म्हणाली असेल कदाचित. तिने मुलीला हातानी पकडले, "हि माझी मुलगी" असं नं बोलता दाखवल .मी इकडे- तिकडे बघितलं आणि माझा मुलग्याला जवळ बोलावलं, त्याच्या केसातून हात फिरवला "हा माझा मुलगा" एवढंच सांगितलं.
"ती" हसली आणि डोळांनीच "परत भेटू" इतकंच बोलून
निघून गेली.
Life is all about Communication, we often need the help of words when we need to connect, but when the souls are connected, the silence itself speaks louder, we call it as a Bond.
That day was special to me, I could recall her saying good bye to me at the girls hostel gate & again saying good bye at the Ganpati temple & that too without speaking a word.
As its always said & I strongly believe, “TRUTH IS STRANGER THAN FICTION”.
It was destined to happen this way.

You're Beautiful- James Blunt-----------------I love this Song

Very nice....सगळ्यांच्या आयुष्यात असेल असे काही...😊
ReplyDeletei bet you have such story in reality.. its not fictional...
ReplyDelete