My Blog List

Wednesday, 6 March 2019

लग्नात रडणारी मुलगी


लग्न: प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि आपल्या सभ्यतेतला एक मोठा टप्पा.

लग्न म्हंटलं कि फक्त दोन गोष्टी दिसतात वर आणि वधू, पण लग्न त्या पलीकडं असतं.

हे कार्य पार पाडायला, कित्येक व्यक्ती आणि कुटुंबाना हात-भर लावायला लागतो.

लग्नात सगळ्यात जास्त तणावात असलेली माणसं म्हणजे वर आणि वधू असं सर्वाना वाटतं, पण वास्तविक पाहता ती दोघं तशी निवांत असतात ,कारण त्यांची मनाची तयारी झालेली असते.

तणाव असतो तो म्हणजे, मुलीचे आई-वडील यांना.

"हुंडा" बंद झालाय असं फक्त म्हंटलं जातं, पण ते वेग-वेगळ्या प्रकारे चालू असतं

हाच हॉल, जेवणाला तोच मेनू, हेच कपडे, तेच दागिने इत्यादी , हे सर्व हुंडयाचाच भाग नाही का..??
आणि त्यात अचानक प्रटकणारे नातेवाईक, त्यांची मिजाज काही औरच असते.
हे सर्व सांभाळणे , कुणाला न-दुखवून सर्व व्यास्तीत पार पाडणे, ह्यातच मुलीचे आई-वडील व्यस्त असतात.

ज्यांची लग्न झाली आहेत त्यांनी निश्चितपणे हे अनुभवलं असेलंच.

मला अजून न-उलघडलेल्या लग्न मधल्या थोड्या प्रथा:

१. वधू च्या आई ने अक्षदा ऐकाचा नसतात, का..??
२. वधूला मामानच का आणायचा..??
३. लग्न  कार्यात तलवार आणि त्यावर लिंबू लावून का धरायचा..??
४. रुकवत मांडून का ठेवतात..?? जाहिरातबाजी म्हणायची ह्याला तर..!!
५. वराचे चप्पल / जोडे का पळवले जातात (हम आपके हे कौन पासून हे चालू झालं आहे असं म्हणतात)

अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहित नाही, पण आपलं चालू आहे म्हणून चालू आहे. 

मी अनुभवलेला अश्याच एका लग्नातला प्रसंग.

माझा दीदी चं म्हणजे माझा मोठ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी शाळेत होतो. दीदी चं लग्न ठरलय हे ऐकूनच मी खुश होतो.

दीदी चं लग्न झालं, ती तिच्या मासासरी गेली. मी शाळेत होतो आणि माझा जास्तीत जास्त वेळ घर बाहेर असायचा. सकाळी शाळा, दुपारी क्लास आणि संध्याकाळी खेळ हा नियमित दिनक्रम होता.

कदाचित म्हणून दीदी घरी नसण्याची मला कधी जाणीव झाली नाही आणि महत्वाचे म्हणजे मम्मी बरोबर ताई पण घरी होतीच. 

आमचा क्रम होता:
दीदी- एक नंबर 
ताई- दोन नंबर
मी-  तीन नंबर-शेंडे फळ 

ताईचं लग्न जेव्हा झालं तेव्हा मी इंजिनीरिंग ला होतो, म्हणजे चांगलाच मोठा झालेलो. 
लग्नात झालेली आणि अजून पण चाललेली पळापळ मी अनुभवलेली होती.
वधू चे वडील एवढ्या टेन्शन मध्ये का असतात मला दिसत होतं. लग्नात बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात:

१. पाहुण्यांची राहण्याची, येण्या-जाण्या ची सोय.
२. सगळ्यांचा मान-पान
३. सगळ्या व्हराडा ची व्यवस्था
४. आदल्या दिवशी हळदी चं व्यवस्थापन (मांडव , हळदी , पाणी , डीजे, जेवण इत्यादी)
५. मंगल कार्यालय पर्यंत येण्या-जाण्या ची सोय. 
६. लग्नातला वाजप (बेंजो-ढोल)
७. वरा ला घोडी, वधूला डोली
८. एकदम महत्वाचं म्हणजे लग्नातल जेवण.

अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या वधू च्या आई-वडिलांना बघाव्या लागतात.

ताई च्या लग्नात मला ब्लेझर घेतला होता. मी एकदम खुश. 
पाहुण्यांना आणणे आणि सोडणे माझा कड होतं.
लग्न व्यास्तीत पार पडलं. मम्मी पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शेवटची  पंगत उठली. मग फोटो सेशन चालू. मी आपलं मित्रां बरोबर बसलो होतो.

आणि तो क्षण आला.....

सगळा सोहळा आटपून  निरोप घेण्याची वेळ.

मी आपलं "पाहुणे आणणे सोडणे" यात मग्न होतो. 
मी जेव्हा घरातून कार्यालयात परत आलो, तेव्हा सगळे बाहेर थांबले होते.
फुलांनी सजवलेली गाडी प्रवेशद्वारात तयार होती.
मी आमची कार लावली आणि तिथं गेलो.
ताई आणि दीदी मला दिसली, शेजारी  मम्मी पण होती.
तिघींचे डोळे सगळं सांगत होते. डोळ्यांचा रंग सगळ्या भावना दर्शवत होता. डोळ्यांनी भावनांना मार्ग मोकळा करून दिला होता आणि अश्रूंचा पूर वाहत होता.

मी सकाळ चे त्यांचे मेकअप केलेले चेहरे आणि आता चे चेहरे यात कुठं तर त्यांना शोधात होतो. 

जशी जशी निघायची वेळ जवळ येईल तसं भावनांचा ज्वर वाढत होता.
ताई , दीदी आणि मम्मी का रडते हे मी आपुलकी आणि कुतूहलाने बघत होतो.
रडणारी इतर यादी मध्ये बरेच होते:
१. माझ्या मावश्या, काक्या , आत्या 
२. ताई च्या मैत्रिणी
मुख्यतः महिला वर्ग होता.

पप्पा जवळच काही नबोलता उभे होते. नेहमी प्रमाणे हात मागे धरून ते थांबले होते.
ताई पप्पां जवळ गेली आणि त्यांना धरून रडू लागली. मी पहिल्यांदा पप्पां च्या डोलताय पाणी बघितलं.
त्यांच्या डोळ्यात प्रेमाचे, काळजीचे, समाधानाचे सगळ्या छाया / छटा मला दिसत होत्या. 
वडील लोक हे अशेच असतात. त्यांना हळवं होण्या चा अधिकार अजूनतरी मिळाला नाही.

वडील म्हणजे आदर, शिस्त आणि राग असा समीकरण असतं.

पण वडील म्हणजेच प्रेम, आपुलकी, माया, आपलेपणा, जिथं सगळ्या चुका माफ असतात. पण त्यांना हे सांगायची किंवा दाखवायची मुभा नसते.

मी गाडी जवळ थांबलो होतो. ताई शेवटी माझा जवळ आली, तिनं माझा हात घट्ट धरला, ना ती काही बोलली ना मी काही बोललो. तिचे डोळे सगळं सांगत होते. 
ती गाडी मध्ये बसली. गाडी हळू हळू निघू लागली. जशी गाडी पुढं जाईल तशे माझे हृदयाचे ठोके वाढू लागले. 
क्षण भरात गाडी दिसेनाशी झाली. मी त्या रस्त्या कड पाहत तसाच उभा होतो.

ताई ला जाऊन फक्त दोन क्षण झाले होते पण एक काळ गेल्या सारखा वाटत होता.
मी मागे वळलो, मम्मी आणि दीदी अजून रडत होत्या. 
आम्ही सगळं आटपून घरी आलो. 

घरी अजून बरेच पाहुणे होते. मी आमच्या गच्ची वर आलो

दीदी चं लग्न झालं , मी लहान होतो. ताई असल्या मूळ, मला दीदी ची कमी कधीच जाणवली नाही. आता ताई पण नसणार ह्या विचारानं मन भरून आलं. मी तसा फार कमी रडलोय, पण असं एकांतात डोळ्यात पाणी येण्याची हे पहिली वेळ होती.

मी आज अभिमानाने सांगू शकतो माझे डोळे पहिल्यांदा ज्या मुली साठी पाणावले ती माझी ताई होती.

लग्नात मुलगी का रडते हे मला आता समजू लागलं होतं.
१. जन्मदात्यां पासून कायम-स्वरूपी दुरावा.
२. नवीन सुरवात शून्यातून
३. नव्या घरी लोक कसे असतील काहीच कल्पना नसते आणि अशे बरेच काही करणं आहेत. 


हि कल्पनाच किती अवघड आहे , ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो , चांगले वाईट दिवस ज्यांच्या बरोबर बघितले ,त्यांना एका क्षणात परके करून घरा बाहेर पडायचं.

मुली ला आपल्या इथं अजुनपण परख धन समजल जातं. मला माहित आहे हि आपली संस्कृती/ परंपरा /रीत / सभ्यता जरी असली तरी, त्या दिवसा पासून माझी संसाराची व्याख्या बदलली. 

ताईला एका नव्या रूपात बघून मी भारावलो होतो, मला दिसत होती ती फक्त "लग्नात रडणारी मुलगी"

2 comments:

  1. तसा नी आमच्या घरात मोठा आणि बहीण लहाण पण मी हे सगळ अनुभवल आहे…..भावनिक आणि मार्मिक लिखाण आहे हे.मला अजूनही तो दिवस आठवतो माझी बहीण सासरी जाताना माझ्याकडे बघत होती आणि काळजी घे हा एकच शब्द ती बोलली पाणावल्या डोळ्यांनी 👌👌😔😔

    ReplyDelete