My Blog List

Friday, 7 June 2019

प्रत्येक “का” ला उत्तर नसतं..!!

प्रत्येक “का” ला उत्तर नसतं..!!



तसं मी नकारात्मक काही लिहीत नाही. मी फक्त माझे अनुभव रेखाटत असतो. त्यातून कुणी काही घ्यावं ही माझी अपेक्षा पण नाही. वाचून एखाद्याला आनंद झाला , काही साकारात्म वाटलं म्हणजे माझा लिखाण मार्गी लागलं. मी तसा वयाने छोटा तर आहेच आणि अनुभवाने तर अजून छोटा आहे.

हि कथा म्हणजे माझा एका मित्राला आलेला एक अनुभव आहे, वाईट नाही म्हणू शकत पण सत्य परिस्तिथी आणि कलियुग भाकीत करणारा प्रसंग.

त्याने ज्या अंतःकरणाने मला ती सांगितली म्हणून मी हे लिहीत आहे.

कथा पूर्ण पणे सत्य आहे. फक्त मी हे त्याच्या नजरेतून दाखवत आहे.


मी मूळचा इंदापूर चा. माझं सगळं शिक्षण इथंच झालं. वडिलांची सरकारी नोकरी असल्या मुळे, गावो-गावी बदली होत असत. पण एकाच ठिकाणी मी शिकावं म्हणून आम्ही कायम स्वरूपी गावीच होतो. त्यांची सेवा निवृत्ती इंदापूर मधेच झाली, म्हणज नोकरीची शेवटची ७ वर्ष का असेना माझं कुटुंब एकत्र होतं. वडील नोकरी ला असताना, मी Engineering करून पुण्याला नोकरी साठी आलो. गावी नोकरी ला जास्त वाव न्हवता आणि शहराची ओढ म्हणून पुण्याला जाण्याचा निर्णर घेतला. वडिलांची त्याला संमती आणि पाठिंबा देखील होता.

वडील सकाळी कामाला जायचे आणि आई घर सांभाळायची. माझी मोठी बहिणीचं लग्न गावातच झालेलं. कधी काही लागलं तर ती हाके च्या अंतरावर होतीच.

आई-वडिलांनी मोठ्या कष्टानं घर उभं केल होतं. घरची शेती तर होतीच, पण घराची पण त्यांनी जणू बागचं केलेली होती. आंबा , नारळाची झाडं , गुलाब, जास्वंदी, मोगरा इत्यादी. आज पर्यंत देवपुजे साठी कधी बाहेरून एक फुल आणायला लागलं न्हवतं. आणि अश्या ह्या घरात माझे विठू-माउली आनंदाने राहत होती.

काही वर्षा पुरी माझा लग्न झालं. घराला दिवाळी प्रमाणे सजवलं होतं. एकुलता एक म्हणा किंवा आई-वडिलांची हौस म्हणा, पण घर एकदम नटलं होतं.
परम-आनंद हा आपली माणसं जवळ आणि एकत्र असला तर द्विगुणित होतो.

वाईट ह्याचं वाटतं कि हे सुख सोडून, किरकोळ पैशां-साठी आपलं गाव, आपली माणसं दुरावली जातात.

कधी कधी विचार येतो "का..?"",

पैशे कमवायचे कुणासाठी , जर माझी माऊलीच दूर होणार असली तर, ह्याचा उपयोग तर काय..?? पण मला दर वेळी माझा वडीलां कडून धीर मिळायचा. त्यांनी पण सरकारी नोकरी मूळ आपलं गाव सोडलं होतं, त्यांनी हे दुःख जवळून अनुभवल होतं. फक्त आणि फक्त त्यांच्या विश्वासावर, पाठिंब्यावर आणि शब्दावर मी माझा गाव सोडलं.

पुण्याची चांगली गोष्ट म्हणजे ते इंदापूर पासून २-३ तासाच्या अंतरावर आहे. कधी काही लागलं तर जाणं-येणं एकदम सोईस्कर. लग्नाच्या एका वर्षात आमच्या घरी पाळणा हलला. मला दर वेळी वाटतं, माझा आई च्या प्रेमा पोटी म्हणून , माझी आईच माझा पोटाला आली.

मी नोकरीत आता पूर्ण अडकलो होतो, इतर नोकरदार प्रमाणे , पुण्यात फ्लॅट घेतला होता. पगाराला आता बरेच हप्ते चालू झाले होते. आम्ही महिन्या तुन एकदा गावी जायचो आणि आई वडील इकडे यायचे. वडिलांची जुनी सवय "घराला कुलूप लावायचे नाही", म्हणून त्यांचे इकडे राहणे फार कमी व्हायचे.

मुख्य मुद्दा:

माझा फ्लॅट एका "Typical Society" मध्ये आहे. जवळ पास सगळीच नोकरदार कुटुंब.
मी दिवस-भर ऑफिस मध्ये, बायको आणि मुलगी घरी. जसा सगळ्या society मध्ये बायकांचा ग्रुप असतो तसा आमच्या इथे ही होता. त्यांचं दिवस भर काही ना काही चालू असायचं. एक दिवस मी घरी आलो, तेव्हा एक वयस्कर बाई आली होती. तिच्या बरोबर एक लहान मुलगी पण होती , कदाचीत नात असावी. त्यांची चर्चा बहुतेक चांगलीच रंगलीं होती, कारण दररोज मला आल्या-आल्या चहा देणारी माझी बायको तिच्या सोबत बोलण्यात गुंग होती. मला स्वतः जेवण करायला फार आवडते. मी मला आणि त्यांना चहा ठेवला आणि मुलांना घेऊन गॅलरी मध्ये बसलो. थोड्या वेळाने त्या निघाल्या. बायको तिच्या मुलगी ला घ्यायला आत आली.

मी त्या बाईची प्रतिमा आठवत होतो. वय वर्ष ५०च्या पुढचे असेल, एकदम काटक बांधा.
सुरकुतलेले हात आणि पाय त्यांनी आयुष्यात घेतलेले कष्ट जोर जोरात सांगत होते. साधी सहावारी साडी, पदर डोक्यावरून घेऊन कंबरेत खोचलेला. कपाळावर गोंदण होते पण प्रेमळ दिसणारे ते डोळे एकदम शून्य भावनेनं जमीनीत रुतलेले होते.

ती चालली म्हणून आमची बारकी दंगा करू लागली. मी तिला घेऊन बाहेर आलो, बघतो तर त्या आजीच्या डोळ्यात पाणीच पाणी. डोळे पुसत त्यांनी मुलीला घेतलं आणि त्या निघाल्या.
मी बायको कड बघितल, तिनें इशाऱ्याने "थांबा" म्हणून सांगितलं. "नंतर बोलू. माझा जेवणं राहिलंय", एवढाच बोलून ती Kitchen मध्ये गेली.

रात्री सगळं आवरल्यावर ती सांगू लागली. ती फॅमिली नवीनच आलेत society मध्ये. आपल्या गावाकडचं गाव आहे त्यांचं. आई-वडील गावी असायचे, आता आई इकडे मुलं कडे आल्या आहेत. इथे दोघे पण न्हवरा-बायको कामाला असतात. १ वर्षा पूर्वी त्यांना मुलगी झाली. बाळंतपणी तिला ३ महिने सुट्टी होती, तेव्हा ती गावीच होती. पण job होता म्हणून तिला परत यावे लागले. तिची पोरगी शेजारच्या "Day Care" ला असते. दोघे पण सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी उशिरा परत येतात. जेवणा साठी बाई येते. १ महिन्या पूर्वी त्यांनी त्यांच्या आई ला म्हणजे मुलीच्या बाबाच्या आई ला गावा वरण इकडं आणलं. "Day-Care" पेक्षा आई बघेल मुली कड बघंल म्हणून.

मी मधेच म्हंटलो "आणि त्याचे बाबा? त्यांच कोण करणार..??"

बायको परत सांगू लागली. वडील स्वतः करून खातात. ते retired आहेत म्हणजे साठी(६०) गाठली असलंच आता आणि ह्यांनी आईला इकडं बोलवून घेतलाय बघा. त्यात झालाय काय, गावा कड जरी असलं तरी त्यांच्या घरी घरकामाला बाई असते, साफ-सफाई , भांडी, धुणे सगळ्या कामाला. आईला कामाची सवय नाही.
आई आल्या वर त्यांनी जेवण करणारी बाई पण बंद केली, आई करेल म्हणून...!!
आता झालाय काय आई ला असल्या कामाची सवय नाही आणि वया मूळ कदाचित जमतपण नसेल. त्यांच्या कडून काही काम होत नाही, तरीपण सगळं काम आईच करते. सकाळी आवरून नाश्ता आणि जेवण, नातीला सांभाळणे, परत संध्याकाळी जेवण. सून कामावरून आली कि मुलीला घेत देखील नाही, आजीला मुलीला घेऊन जेवण करायला लागतंय. मुलीचे वडील काही लक्ष्य देत नाहीत. सून फक्त खाते आणि रात्री जेवणाची भांडी पण धूत नाही. आजी जेवण आवरून बाहेर पडायच्या आत, सून पायात चप्पल घालून तयार असते.

हे सगळं ऐकून सुन्न झालो मी. मला काही सुचेना.

Human Tedancy आपण दरवेळी correlate करतो, मी माझा आई वडिलांचा विचार करू लागलो. आमचे विठू-माउली कधी एका शब्दाने काही बोलले नाही. वडील सरकारी नोकर त्या मुळे त्यांना pension चालू होईल हि, पण मुलगा म्हणून कधी मी घरी काही कमी पडू दिलं नाही.

आई ला घरी कामा करण्यासाठी आणायचं, विचार तर किती वाईट, पापचं म्हणावे लागेल ते.

मी त्या कुटुंबाचा विचार करत होतो, ह्या सगळ्या मध्ये नेमका अपराधी कोण किंवा म्हणावं (pardon my language) नालायक कोण..??

मुलगा:
ज्याने आपल्याच आईला घरकाम करायला आणलं. ज्याला चिंता  फक्त आपल्या Career, बायको आणि मुलीची...????

सून:
जिला अपेक्षा आहे कि सासूने सगळं घरकाम करून तिच्या मुलीला सांभाळावं. तिला पण चिंता फक्त आपल्या career, मुलगी आणि नवऱ्याची...??? 

आई:
जी मुलाच्या सांगण्या वर्ण आपल्या  न्हवऱ्या ला एकटं सोडून आली, हे  माहित असताना कि त्यांचं आता वय झालाय आणि बघणारं कोणीही नाही...??

वडील:
ज्यांनी आपला म्हातारपणी आणि "Post-Retirement" चा एकमेव आधार आपल्या अर्धांगिनी ला, जरा हि विचार न-करता त्यांच्या मुला कड पाठवलं..??

म्हणतात ना "सत्य कपनेच्या पलीकडे असते".

मला सत्य काय असेल कल्पना देखील करवत नाही.

मला माहित आहे आणि माझाच Dialogue आहे "प्रत्येक "का" ला उत्तर नसते".

तरी देखील एक वादळ मनात घोंगावत होतं "का,,,, असं का....??""


"Every Crack has a Glorious Story to tell"- Neil the story teller


3 comments:

  1. Yes every crack has a painful story to tell.

    ReplyDelete
  2. what about the scars u left in someone's heart

    ReplyDelete