पहिली भेट
RD कॉलेज हॉस्टेल वर पोहोचला. ते सरकारी कॉलेज असल्यामुळं सगळं एकदम
सूट-सुटीत होतं.
कॉलेज पासून हॉस्टेल जवळच होतं आणि मेस (खानावळ) सुद्धा. महत्त्वाचे म्हणजे त्याच आवारात फुटबॉल ग्राउंड आणि जिम्नॅशियम देखील
होतं.
RD was a charmer by words आणि त्यात भर म्हणून तो एक खेळाडू आणि नियमित
तालिम मेंबर. जन्मापासूनच त्याने शेतात
काम केले होते, so he had a good physic.
RD ने त्याच्या Engineering Life मध्ये अनेक मित्र केले. अभ्यासात सरासरीपेक्षा जास्त होता. एक गोष्ट ते
कधीही कोणत्याही Year ला Fail झाला नाही, त्याने इंजिनीरिंग ४ वर्षात पूर्ण केले.
RD कॉलेज फुटबॉल संघाचा Captain होता. त्याने कॉलेज ला बऱ्याच टूर्नामेंट
झिंकून दिल्या.
Engineering ला जवळजवळ सर्व चांगल्या दिसणार्या मुली एकतर
Computers, Electronics or IT ला असतात. Annual
Social gathering आणि Technical Paper presentation Event ला RD discipline
committee member होता. RD वर पुष्कळ Rose-Messages आणि Fish-Pond पडले.
Gathering कॉलेज च्या Open Air Theatre मध्ये होते. शेवटच्या दिवशी, सर्व प्राध्यापक, विध्यार्ती आणि office staff ला
एकत्रितपणे Dinner होता.
RD त्याच्या मित्रांसोबत होता. Dinner सुरू होऊन बराच वेळ झालेला.
RD मित्रां बरोबर जेवणाकडे निघाला. ताट हातात घेणार तोपर्यंत त्याला कोणीतरी हाक मारली.
सुकन्या मॅडम नी RD ला बोलावून विचारलं, "जेवलास काय"..??
RD, "नाही अजून, जेवणार आता. तुम्ही जेवला काय..???"
सुकन्या, "अरे Just Dinner चालू झालाय, Directors आता आले. मला
सांग तुला Car चालवता येते काय ?"
RD, "हो, पण काय झालं .. ??"
सुकन्या, "Dinner आता चालू झालाय, मी मधेच सोडू शकत नाही आणि
मला तेजू आणि रुजूता यांना त्यांच्या घरी सोडायचं होतं , मी त्यांच्या पालकांना शब्द
दिला होता, की मी त्यांना रात्रीच्या जेवणा नंतर घरी सोडेन. Dinner संपायला तास तरी
लागेल. एक काम कर माझ please, माझी कार घे आणि त्या दोघीना त्यांच्या घरी सोड तेवढ".
RD ने होकारात्मक मान डोलावली.
सुकन्या मॅडम नी तेजू आणि रुजूता ला बोलावलं. RD कडे इशारा करून त्या म्हणाल्या , "हा राजशेखर देशमुख. My
last Year Student. माझ्या कारमध्ये तुम्हाला घरी सोडेल. तुम्ही घरी पोहोचला कि मला
कॉल करायला विसरू नका".
RD ला तेजू माहित होती, She was one of the many crushes (good looking girls) in
college.
RD गालातल्या गालात लाजत होता, कारण पहिल्यांदाच त्याच्या सोबत एक
नाही तर दोन-दोन मुली कार ने प्रवास करत होत्या. ते तिघेही Car Parking कडे निघाले. अपेक्षेनुसार दोन्ही मागच्या
seat वर बसल्या.
RD ने समोर चा Mirror adjust केला ,असा कि त्यात बघितला कि direct
तेजू चे डोळे दिसावेत.
ऋजुता चा घर वाटेवर पहिला होत, तिने RD ला पहिला तिला सोडायला विनंती
केली. छोटासा प्रवास सुरु झाला.
RD was a good driver & quite passionate @ cars too.
रुजूता तिच्या घरचा रास्ता दाखवत होती. RD वरच्या वर आरश्यात हळूच
तेजू च्या डोळ्यात बघत होता. तेजू एकदम शांत बसली होती. १५-२० मिनिटांनी ऋजुता च घर आले, तिची आई
बाहेर वाट पाहत होती. तिघेही गाडीतून बाहेर आले.तेजुनी रुजूता आणि तिची आईला Good Night केला आणि कारच्या मागच्या
दरवाज्याच्या दिशेने निघाली. त्या क्षणाची RD वाट पाहत होता, रुजूता आणि तिची आई घरात जात होत्या.
RD ने पुढचा दरवाजा हळूच उघडला. तेजू च्या हे लक्ष्यात आलं, पण ना पहिल्या सारखं करून तिने मागचा दरवाजा
उघडला. RD थोडा नाराज झाला. तेजू ने मागचे दार उघडले आणि ऋजुता आत गेलेला पाहून,
दार पुन्हा बंद केले. ती समोरच्या सीट वर येऊन बसली.
RD च्या आनंदाला सीमा राहिली न्हवती. त्याचे हृदयाचे ठोके दुप्पट झाले
होते.
जेव्हा तुमचा Crush तुमच्या बरोबर गाडीच्या समोरच्या सीट वर बसतो,
"Simply Priceless".
RD रेडिओ लागतो का बघत होता, पण त्याला काय जमलं नाही.
तेजू तिच्या घरचा रास्ता दाखवत होती.
RD, "ह्या time ला रेडिओ ला जुनी गाणी लागतात, छान वाटतं ऐकाला,
मला वाटलं तुला पण आवडेल म्हणून रेडिओ लागतो का बघत होतो".
तेजू, "तू गाडी चालव, मी लावतो रेडिओ".
RHTDM मधला टगाणं लागलं "दिल को तुम्से प्यार हुआ ,पेहली बार हुआ".
The best track those days. RD was just blushing a lot.
"तू फुटबॉल टीम चा कॅप्टन आहेस ना?"
"तु मला ओळखतेस म्हणजे "
"मला खेळाबद्दल जास्त माहिती नाही, पण हो मी तुला ओळखतो".
तिने सांगितले की तिचे घर पुढच्या वळणावर आहे, छोटासा प्रवास जवळजवळ
संपत आला होता आणि रेडिओ चा गाणं पण.
RD ने तेजूच्या घराच्या समोर गाडी थांबविली
दोघेही गाडीबाहेर आले.
तेजू "धन्यवाद राजशेखर सर"
No Formalities आणि हा फक्त RD म्हणा, आवडेल मला"
"ओके सर, I mean RD ".
तेजू ने Shake-Hand साठी हात पुढे केला (RD त्याचीच वाट पाहत होता).
"Thanks & Good Night" दोघेही एकाच वेळी म्हणाले.
Co-incidence are funny & smile is the most honest type of
emotion, specially when the cheeks are red & Pink.
तिने डोके लाजून हलवले आणि ती घर कडे निघाली.
ती कंपाऊंड गेट बंद करणार होती, तोपर्यंत "तेजू"
"काय झाले?"
"काही नाही, सुकन्या मॅम ला फोन कर, की तू घरी पोहोचली म्हणून".
तिने होकारार्थी मान हलवली.
RD पहिला कॉलेज आणि जेऊन वसतिगृहात पोहोचला.
हि रात्री मोठी असणार होती. RD च्या डोळ्या समोर एक सारखा
Flash-Back चालू होता.
पुढचा दिवस देखील RD साठी गुलाबी होता. त्या दिवशी तो एकटाच होता.
Library मध्ये थोडा वेळ कसातरी काडून तो कॅन्टीन मध्ये आला. काउंटर वर अभि मालक बसले होते. त्यांच्या गप्पा चालू त्या तोपर्यंत
तिथं तेजू तिच्या मैत्रिणींच्या सोबत आली.
RD ने तिला पाहिले. RD ची
नजर अभि दादा ला चुकवून तेजू कडेच होती, आता बघेल मग बघेल, हेच चालू होतं. तेजू ने चहा साठी म्हणून अभिदादा कांदा बघितला आणि शेजारी बसलेला
RD तिच्या नजरेस पडला. तेजस ग्रुपने वेटरला ऑर्डर देण्यास सांगितले आणि दरम्यानच्या काळात
प्रथम डोळा संपर्क आला.
"Blush-Blush-Blush", one word to express the
scenario.
काहीतरी झाले होते, दोघेही एकमेकांकड नजर चुकवून बघत होते न्हवते. RD ने अभि ला विचारले त्याला मुलींना ओळखतॊस काय..?? "तुला का पाहिजे माहिती?? घरात सांगू काय " अभि-दादाकडून पहिला प्रश्न. "फक्त असंच ओ मालक, बाकी काही नाही". कॉलेज च्या एक आणि एक विध्यार्थी ची माहित असण्याचे ठिकाण म्हणजे कॉलेज
कॅन्टीन. अभि ने RD ला किरकोळ, पण कामाची माहिती दिली.
The Friendship Bond:
RD Project च्या कामात व्यस्त होता आणि तो नेहमी
कॉलेजमध्ये उशीरा थांबत असे.
त्याचा ग्रुप एकदम खोडकर होता, त्यांनी
कॉलेज च्या Principal कडनं पण एकदा पार्टी घेतली होती, त्यांना पण सोडलं नाही.
कॉलेज चा परिसर मोठा होता आणि सगळ्या गेट वर
Security असायची.
कधी कधी काहीजण गडबडीत गाडीची किल्ली गाडीला
विसरून जायचे. Security गाडी नंबर नोटीस बोर्ड वर लिहायचे आणि त्यांना किल्ली परत
द्यायचे.
RD चा ग्रुप security कडून किल्ली घ्याचा आणि
नोटीस बोर्ड वर त्याच्या क्लास च नाव टाकायचा.
"Bike no. XXXX Keys found, Contact BE
Class"
ज्याची कुणाची किल्ली सापडेल त्याच्या कडनं हि
सगळी कार्यकर्ते Penalty/ दंड म्हणू Treat (किरकोळ पार्टी) घ्यायचे. कोण ना
कोण तर २-३ दिवसात सापडायचंच.
एक दिवस RD ग्राउंड वर फुटबॉलचा सराव करत होता.
बाकी सगळे मित्र एका Paper Presentation event ला गेले होते. Security
सापडलेली किल्ली घेऊन RD कड आला. Security ला या कामाचे किरकोळ खर्च म्हणून
त्याला ५०-१००/- मिळायचे. RD ने किल्ली बॅग मध्ये ठेवली आणि
सराव चालू ठेवला. थोड्या वेळाने २ मुली ग्राउंड कड आल्या. RD सराव मध्ये गुंग
होता.
त्याला आवाज ऐकू आला "RD
सर". त्याने वळून पहिले. त्यातल्या एकीने हाताने गाडीच्या किल्लीच इशारा
केला. RD ने त्यांना ग्राउंड वर बोलावलं. त्या जश्या जवळ येऊ लागल्या,
RD ला चेहरा ओळखू लागला. त्यातली एक तेजू होती. त्या ग्राउंड वर RD जवळ
आल्या. RD चं लक्ष्य तेजू कड होता आणि तेजू च देखील. RD बोलणार इतक्यात,
"सर, माझा गाडीची किल्ली राहिली होती गाडी ला, ती तुमच्या कड आहे ना",
तेजू बरोबर ची मुलगी म्हणाली. हे वाक्य ऐकून झाल्यावर RD चा एक
"Standard dialogue" होता.
"हे खरोखरच
निष्काळजी वागणं आहे, कोण गाडी चोरली असती तर, कितीला पडलं असतं हे... !!".
"मी किल्ली देतो, पण त्या बदल्यात तुम्हाला
दंड म्हणून आमच्या ग्रुप ला किरकोळ पार्टी दद्यावी लागेल". पार्टी
म्हणजे कॅन्टीन मध्ये किरकोळ नाश्ता असायचा. ती मुलगी हि इतरांसारखी हो
म्हणाली, कारण दुसरा पर्याय नसायचा. RD ने तिला किल्ली दिली. दरम्यान, तेजू
एक शब्द पण नं बोलता RD कड बघत होती. खरंतर RD ला पण हे जाणवले होते, पण
त्याने मुद्दाम बघून नं बघितल्या सारखे केले. त्या किल्ली घेऊन परत जाऊ
लागल्या. RD हाता मध्ये पाण्याची बाटली घेऊन उभा होता. त्या थोड्या
लांब गेल्यावर RD ने तेजू ला हाक मारली. तेजू पण त्याचीच वाट बघत होती. त्या
मागे वाळल्या. RD ने त्याच्या कडे परत येण्याचा इशारा केला. दोघी चालू लागल्या.
RD ने तेजू कडे बोट दाखवले आणि फक्त तूच ये असं
सांगितलं.
"ती तुझी खास मैत्रीण आहे काय, असली तर सांग,
पार्टी ची गरज नाही".
"हो खास मैत्रीण आहे, पण बाइक तिची नाही, माझी
आहे".
RD हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं, पण तेजू असं का
म्हंटली त्याची उत्सुकता लागून राहिली.
"खोटं का बोललीस तू, माझी भीती वाटते
काय..??".
"तसं काही नाही, असंच . बघू म्हंटलं तुमचं
इतरांशी वागणं कसं आहे ते", तेजू जरा हसली.
"पण मी पार्टी देतो, पण फक्त तुला , OK,
गर्दी नको".
RD ने फ़ुटबाँल सराव करून जेवढे हृदयाचे ठोके वाढले
नसतील, तेवढे हे वाक्य ऐकून झाले.
छोटीशी पार्टी कॅन्टीन मध्ये करायची असं
ठरलं होतं. आयुष्यात जश्या बऱ्याच गोष्टी ठरल्या प्रमाणे घडत नाही, कारण जे
घडायचे ते आधीच ठरलेलं असतं.
(Everything is
Written- जिंदगी मिलेगी ना दोबारा) तसं इथं देखील झालं.
आपला हिरो तयार होऊन आला, एकदम सटा-सट "Gillet
look", Deo-Spray आणि त्या वर मित्रा कढणं घेतलेला Perfume.
थोड्या वेळाने तेजू कॅन्टीन मध्ये आली.
दोघांचे डोळे एकमेकाला शोधत होते. "what you seek is seeking
you-Rumi".
पहिली भेट असली ना, कि एक विलक्षण ओढ़ किंवा जी आतुरता असते,
ती दोघांच्या डोळ्यात दिसत होती.
त्या गर्दीत शेवटी नजरेला-नजर भिडली. तेजू ने डोळे
मोठे करून डोळ्यांनी " अरे कुठे आहेस तू, मी शोधत आहे तुला?".
RD ने एक भुई उडून आणि गालातल्या गालात हसून, तेजू
छान दिसत आहे असा इशारा केला.
तेजू जराशी लाजली.
RD ने लांबूनच, डोळ्या ने इशारा
केला. कॅन्टीन मध्ये तेजू च्या मैत्रिणी तर होत्याच, त्यात भर म्हणून RD चा
आखा ग्रुप पण तिथं होता.
RD ने तेजू ला लायब्ररी मध्ये जाण्याचा इशारा
केला.
दोघे ही तिथून कुणालाच ना कळत, बाहेर पडले.
"काय टाईमिंग आहे, दररोज कॅन्टीन मोकळं असतं,
पण आज जत्रा आहे तिथं..!!"
"इथ तर, आपल्याला नीट बोलता पण येणार
नाही", RD म्हणाला.
"बघ ना", तेजू नाराज स्वरात
म्हणाली.
RD थोडंसं दबक्या आवाजात म्हणाला "बाहेर
कुठंतर जाऊया काय, तुला काही हरकत नसेल तर..!!".
तेजू ने मान नं हलवता, फक्त डोळे RD कड फिरवले आणि
पुन्हा समोर पाहू लागली.
तसा विचार तेजू च्या पण मनात आला होता, पण बोलू का
नको बोलू..!!
Teju was a dual state of mind, here heart was
willing to go, but the mind wasn't.
"लेकिन बात जब
प्यार कि हो, हमेशा दिल कि सुनो"
RD ला पण कळेना, काही उत्तर नाही. वातावरण जरा
Normal करायचा म्हणून आपण इथंच थांबू अअसं म्हणणार होता , तोपर्यंत....
"चालतंय की", तेजू म्हणाली.
RD डायरेक्ट चंद्रावर.ते शब्द ऐकून त्याच्या पोटात
फुलपाखरू उडू लागली.
"तुझी गाडी कुठं आहे..??"
"पार्किंग मध्ये आहे".
"चल मग".
तेजू पार्किंग मधनं गाडी घेऊन अली.
"तू चालव, मी बसते माग".
RD ने गाडी घेतली.
This was the very
first time, that a girl had sat behind him on a Bike.
"पण आपण चाललोय कुठं?"
"तुला कळलंच ग..!!"
तो छोटा प्रवास चालू झाला.
तेजू दर २ मिनिटांनी विचारत होती, "कुठं
चालतोय आपण??"
पण RD एकदम शांत , काहीच उत्तर नाही. रस्ता तेजू
च्या ओळखीचा होता, पण तिला काही कळायला मार्ग नाही.
जरा वेळाने RD ने गाडी मुख्य रस्त्या पासून गाडी
आत घेतली. ती direct एका तलावा जवळ येऊन थांबवली.
"उतारा कि मॅडम, अपनी मंजिल आ गायी".जसे
अपेक्षित होते, तेजू इकडे-तिकडे बघू लागली, म्हणजे नेमका ठिकाण कोणतं, शेजारी
वर्दळ आहे का ,,,,,जे साहजिक होते.
"किरकोळ का असेना, public असतंय इथं, Tension
घेऊ नका".
तेजू हलूच गालात हसली.
तलावा जवळ एक मोठं पिंपळाचं झाड होतं, दोघं तिथं
जाऊन बसले.
तेजू एका दगडावर बसली, RD शेजारी उभा होता.
RD ने छोटे छोटे दगड घेतले आणि तळ्यात टाकू लागला.
तसं बघायलाग गेलं तर दोघे हि बोलणारी माणसं, पण आज
सगळं कसं शांत शांत होतं.
RD ने फेकलेल्या प्रत्येक दगडाचा आवाज सगळी कडे
घुमत होता.
"दगडं संपतील आता बसा खाली".
RD ने एक शेवटचा दगड एकदम लांब फेकला आणि तेजू
समोर येऊन बसला.
एकदम शांन्ततः होती.
१ मिंट
झाला....
२ मिंट
झाली.....
५ मिंट
झाली.....
एकपण शब्द नाही, फक्त एकमेकाची नजर चुकवून,
एकमेकाला बघणे चालू होते.
Eyes were doing all
the talking.
RD नजर खाली घालून हाताने माती मध्ये गोल काडत
होता, हे तेजूच्या हि लक्ष्यात आलं होतं.
"मी तुला इतकं शांत कधी नाही
पाहिलं...!!"
"तसं काही नाही, मी शांत पण असतो कधी कधी ,
फक्त आता बोलायला शब्द मिळेना झालेत...!!"
हे ऐकून तेजू हसली. तेजू ला डाव्या बाजूला सुळा
दात होता, जो हसला कि दिसायचा.
RD ते हास्य एकदम मोहक वाटत असे.
तेजू केसाची बट कानात अडकवत म्हणाली,"बोल रे निवांत, जे काही बोलशील हे
फक्त आणि फक्त आपल्यात राहील".
तिनं RD चा हात as a gesture म्हणून पकडला आणि
इशाऱ्या ने विचारला प्रश्न विचारला.
RD ने मान डोलवली आणि दोन्ही हातानी तिचा हात
पकडला.
दोघांना हि त्या स्पर्शातला उबदार पणा जाणवला.
एका मागे एक, गोष्टी संपत न्हाव्त्या. शेतात जस एका
पांदीतून पाणी खळखळत सुटते तसं हे मनाचे पाणी हि सुटले होते. एक सर भरली कि
दुसरी, दुसरी झाली कि तिसरी.
बोलता बोलता वेळेचं भान देखील राहिलं नाही. They
eventually sat there for more than 2-3 hours. मनाचे दरवाजे उघडले होते आणि
मनमोकळ्या पणाने भावना वाहत होत्या, मैत्री चा पाया भक्कम होत होता.
जेव्हा आपलंसं
वाटणारं माणूस आपल्या जवळ आपल्या समोर असतं, वेळेचं भान राहत नाही.
कारण आपण त्या क्षणी खरं आयुष्य जगत असतो. सूर्य
जेव्हा मावळू लागला तेव्हा, त्यांना वेळेचं भान आलं. तसं बघितलं तर दोघांना
हि तिथून हलायची इच्छा न्हवती, पण ते इथे असल्याचं कोणाला माहित न्हवतं.
"त्या दोघांसाठी तो एक अविस्मरणीय दिवस
होता".
दोघेही कॉलेज टाइम मध्ये कॉलेज वर परत आले आणि
तिथून दोघे आपल्या मार्गी लागले.दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले
होते. तेजूच्या घरचा आणि RD चा हॉस्टेल चा.
इतरांसाठी तसा तो एक सर्व-साधारण दिवस होता, पण
ह्या दोघांसाठी तोच एक आठवणींचा साठा झाला होता. ती संध्याकाळ एकदम रमणीय
होती, दोघेही दिवसा झालेली बोलणी आठवत होती.
फोन करू का नको, एकाच प्रश्न दोघांना पडला
होता. ती रात्र तशीच हळुवार मावळली.
ते आता चांगले मित्र झाले होते आणि बर्याचदा
भेटायचे ,शक्यतो कॉलेज मध्ये.
RD weekend हॉस्टेल मध्ये घालवायचा एके दिवशी
त्याला हॉस्टेल वर फोन आला.
"हॅलो RD...!!". कोण बोलताय हे सांगण्या
आधी RD ने ओळखले कि तो आवाज तेजू चा होता. तो एकदम आनंदित झाला.
तेजू चे आई-वडील बाहेर गावी गेले होते, ती घरी
एकटीच होती. फोने तसं-तास चालू होता.
दोघे हि बोलण्यात "Charmer" होते आणि
एकमेकाला समजत होते.
हे
"Calling-Calling" केवळ सुरूवात होती, जी पहिला Weekend to weekend चालू
झाली, नंतर ती जवळ पास रोज-च्या-रोज होऊ लागली.
>>>>>>>>>> भाग ३ समाप्त<<<<<<<<<<
Link to Next Chapter

No comments:
Post a Comment