My Blog List

Monday, 4 March 2019

सुट्टे पैसे



दिवस रविवार. ठरल्या प्रमाणे माझी घरातली ड्युटी.
एका मागे एक कामांची यादी तयार होती.

कोल्हापूर मधला सर्व सामान्य रविवार चा दिनक्रम काही असा असतो:

. सकाळी सगळ्या गाड्या धुणे
. आंगण धुन काढणे
.गवत काडून झाडांना पाणी घालणे
. मटण आणणे (महत्वाचं काम)
. मटण खाणे आणि सुस्तपणे झोपणे.
. संध्याकाळी एक कप चहा आणि डायरेक्ट रात्री चं जेवण.

पण हा रविवार थोडा वेगळा होता. एक विलक्षण अनुभव माझी आतुरतेने वाट पाहत होता.

मी गंगावेश ला मिस्त्री कड गाडी कामाला सोडायला गेलो.
मी मिस्र्ती ला गाडी देऊन परत येण्या साठी निघालो, त्या दिवशी मला वडाप ऐवजी बस मिळाली आणि ती पण मोकळी.
तसा माझा आणि बस प्रवास चा फार कमी संबंध आला आहे.
खुश होऊन मी बस मध्ये बसलो. कॉलेज नंतर चा माझा बहुदा हा पहिला बस प्रवास होता , जवळपास १० वर्ष नंतर.
थोड्या वेळाने - , - माणसं बस मध्ये बसू लागली.

गाडी निघालीच होती इतक्यात कोण तर दरवाजा वाजवला.
कंडक्टर तिकीट काढायला मागे गेला होता, मी दरवाजा उघडला.
आणि मी तिला पाहिलं, ती दारात उभी होती.

हातात काठी, हिरवं मळकटलेल लुगडं, डोकयावर पदर होताजेवढ्या तिच्या चष्म्या वर खरके होते ,तेवढ्याच सुरकुत्या तिच्या अंगावर होत्यातिचे सगळे केस पांढरे होते, कपाळावर गोंदण होतं. एका खेड्यातील सामान्य आजी जशी असते तशी ती होतीतिनं एका हातानं दरवाजा धरला आणि दुसरा हात कुठं पकडू बघत होती, तोपर्यंत मी माझा हात पुढं केलातिनं माझा हात लगेच  धरला आणि तिला मी लगोलग आत ओढून घेतलंवर येताच तिनं माझा डोक्यावरुन हात फिरवला. मायेचा तो स्पर्श मला माझा आजी ची आठवण देऊन गेला.

तिला मी माझा शेजारी बसवलं.
माझा छोटासा बस प्रवास चालू झाला.
थोड्याच वेळात कंडक्टर तिकीट काढायला पुढे आलात्याने आजी ला कुठे उतरणार विचारला, तीने माझाच बस स्टॉप सांगितलात्याने १५ रुपये मागितले, आजी ने पोटाला खोचलेलं तिचं पाकीट काढलं. त्यात चुरगलेलें पैसे होतेत्यातनं तीन २० रुपयांची नोट काडून दिली. कंडक्टरनं तिकीट दिलं आणि म्हंटला सुट्टे पैसे नाहीत, तुला उतरताना देतो आणि तो पुढं गेलाआजी मला तिच्या बद्दल सांगू लागली, ती तिची मुलं , मुली, नातवंडं आणि बरचं काही. ती म्हणटली माझा नीतीची शाळा आहे पुढं आणि तिची मुलगी जिथं कामाला आहे ते ऑफिस पण आहे, पुढंआलं  कि दाखवतो तुला.
ती म्हणाली तिला पहिल्यांदा आज बस मध्ये बसायला जागा मिळाली , नाहीतर दरवेळी उभा राहून जायला लागत असे.

ती तिच्या मुली कड अली होती आणि दुपारी परत घरी चालली होती.
स्टॉप गेले , तिनं मला विचारलं अजून किती लांब आहे माझा स्टॉप , मी तिला सांगितलं अजून २० मिनिटं लागतीलतिचं लक्ष्य कंडक्टर कड राहिलेल्या सुट्ट्या पैशानं कड होतं.

थोड्या वेळात आम्ही शाहूपुरी मध्ये आलो जिथं तिची मुलगी कामाला जात होती, पण मी तिला काही विचारलं नाही, तिचं लक्ष्य अजून सुट्ट्या पैसं कडचं होतंती एक एक स्टॉप नंतर मला आपल्या स्टॉप बद्दल विचारात असे आणि कंडक्टर कड बघत असेतिला मी म्हंटलं तुम्ही उतरताना देईल तुम्हाला तो पैसे, तरी पण आजी काय ऐकणा, एक सारखं कंडक्टर कड बघत बसली होतीतो जिकडं जाईल तिकडं तिची नजर. त्याचा माग चालू होता. तिला मुलीचं ऑफिस आणि नातीची शाळा येऊन गेली हे तिच्या लक्ष्यात न्हवतं.

प्रवास अर्धा संपत आला, कंडक्टर तिकिटं कडून येऊन जागेवर बसला. लगेच आजीनं त्याला विचारलं , सुटते पैसे द्या म्हणूनकंडक्टर पण मुद्दाम देत न्हवता, का त्याच्या कडे खरोखर सुटते पैसे न्हवते, देव जाणेपण बिचारी आजी बस मध्ये बसल्या पासून फक्त सुट्ट्या पैशांकडं लक्ष्य लावून होतीथोड्याच वेळात आमचा स्टॉप येणार होता, मी तिला सांगितलं पुढचा स्टॉप आपला आहे म्हणून. ती लगेच कंडक्टर ला हाक मारू लागलीकंडक्टर नं हातवारे करून "थांबा-देतो" असा इशारा केला आणि परत आपल्या कामात गुंग झालाशेवटी माझा स्टॉप आला , मी कंडक्टर ला सांगितलं, त्याने बेल मारली. आजी माझ्या आधी उठायला तयार होतीती पहिला कंडक्टर कड गेली, कंडक्टर नं त्याच्या पिशवीतून सुटते पैसे काडून दिले , आजी च्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसलं.

अचानक आजी गडबडी नं सीट खाली नजर टाकली, मी विचारलं तर म्हंटली तिची चप्पल खाली कुठं तर राहिली

तिची चप्पल लगेच सापडली, तिला शोभेल अशीच तिची चप्पल होती , तिच्या प्रमाणेच कष्टानं झीजलेली.

मी आजी ला बस  मधून खाली उतरवलं, ती "सुट्ट्या पैशाच्या नादात तुला माझा मुलीचं ऑफिस , नातीची शाळा दाखवायचीच राहिली",
ती हे देखील विसरली कि तिला आज बस मध्ये बसायला जागा पण मिळाली होतीसुट्ट्या पैसां मूळ तिला तिज चप्पल पण लक्ष्यात राहिला नाही.

ती माझा हात सोडून पुढं तिचं तिचं चालू लागलीमी पण आपला रास्ता धरला , चालता चालता मला ती आजी आठवू लागली

"आजी आणि तिचे सुट्टे पैसे"

सुट्टया पैश्यां मूळ तिला विसर पडला तिच्या प्रवासाचा ,मुली चा, नातीचा , तिच्या चपलांचा आणि तिला कधी नाही ते मिळालेल्या सीट चा पण विसर पडला होता.

मी विचार केला आपल्या जीवनात पण असे बरेच सुट्टे पैसे असतात. ज्या मुळ आपण काही महत्वाच्या इतर गोष्टी विसरतो.

मला जाणवलेले काही सुट्टे पैसे:

.  मोबाईल:
आपण जेहवा समक्ष किंवा सामोरा समोर संभाषण साधतो, पुढल्या व्यक्ती ला पूर्ण लक्ष/ वेळ दिला पाहिजे,पण आज काल मोबाईल च्या अतिरेक मूळ लांब असलेल्या व्यक्ती मूळ समोरील व्यक्ती दुरावली जाते.

. दुसऱ्याची संपत्ती:
संपत्ती हा नेमका शब्द नाही , संपत्ती म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य/ त्यांच्या गोष्टी (Man, material , Money ) इत्यादी.  कधी कधी आपण इतरांच्या गोष्टीत इतका मग्न होतो कि त्या पुढं आपल यश हे आपल्यालाच कमी भासायला लागत. आपण तुलना करतो , पण हे विसरतो प्रत्येकाचा वेग हा वेगळा असतो आणि प्रत्येकाची शर्यत वेगळी असते. तुलने मूळ आपण आपलं स्वतः चा आयुष्य पुरेपूर जगू शकत नाही.

. नाते-संबंध यातील प्रेम:
आयुष्यात ह्या गोष्टी फार म्हणत्वाच्या, पण किंचित सुट्टे पैसे म्हणजे आनंद/ मोह / लोभ /वासना या साठी आपल्याला त्यांचा विसर पडतो.

. आपली माणसं:
कुठे तरी एक छान वाक्य लिहिलं होतं  "कटू सत्य: जवळची माणसं थेट घाटावर येतात, आपली माणसं खांदा देतात." नकळत किरकोळ कारणांसाठी या सुट्ट्या पैसां साठी आपण दुरावलो जातो.

उदहारण बरेच आहेत, माझं फक्त एकचं  म्हणणं आहे,

"ये जिंदगी बहोत लंबी हे और अपने पास वक्त बहोत कम",

"जे आहे त्याचा पूर्ण पणे  आनंद घ्या उगाच सुट्ट्या पैशांमुळे आहेत ते अनमोल क्षण वाया घालवू नका"



4 comments:

  1. Awesome story very nicely written keep it up

    ReplyDelete
  2. Mastach ...rea rea liked the philosophical analogy between"Sutte paishe" and petty things worrying about which we miss greater joy..

    ReplyDelete