![]() |
कधी कधी प्रेम मिळायला
आयुष्यं कमी पडत, पण कधी कधी एका वळणावर हवं असलेलं प्रेम क्षणात मिळून जातं.
|
It’s never too late to write your First story....!!!
An honest attempt to write a long literature, please have
patience while reading.
हि कथा आणि त्या मधील सर्व पात्र जवळ-पास काल्पनिक आहेत.
पण मी स्वतः
लिहीत असल्या मूळ, त्यावर बऱ्याच जीवित पात्रांचा प्रभाव दिसेल.
Being a writer, you can enjoy the liberty. तुम्ही स्वत:ला कुठेतरी
कथे मध्ये नक्की अनुभवाल.
सारांश:
ही कथा एक Arranged-Love Marriage आणि त्याच्याशी संबंधित छोट्या छोट्या
गोष्टींविषयी आहे अपने स्टोरी की हेरॉईन हे "दीपशिखा" आणि हिरो आहे
"राजशेखर".
कथा 2000 सालची आहे, जेव्हा नाती , वेळ आणि प्रामाणिकपणा यासारख्या
गोष्टी महत्त्वपूर्ण होत्या.
दोन व्यक्ती, दोन वेगळी आयुष्य, दोन वेगळे प्रवास, दोन वेगळे अनुभव
आणि एक छोट वळणं.
कधी कधी प्रेम मिळायला आयुष्यं कमी पडत, पण कधी कधी एका वळणावर हवं असलेलं प्रेम क्षणात मिळून जातं.
भाग-१: दीपशिखा
(आपल्या कथेची नायिका)
(आपल्या कथेची नायिका)
आपल्या कथेची नायिका "दीपशिका" यापुढे तिला आपण
"दीपू" म्हणू, ती इतरांसारखीच होती,
९० च्या दशकातली एक सामान्य मुलगी.
दिपू चे डोळे एकदम मोठे आणि चमकदार होते.
Silky केस , तिला आई दररोज दोन शेंड्या बांधत असे.
Silky केस , तिला आई दररोज दोन शेंड्या बांधत असे.
डोक्यात एक छान पट्टा आणि कानात छोटेशे मणी.
तिला टिकली फार आवडायची. लहानपणा पासून तिला नट्टा-पट्टा फार आवडत असे आवडत असे.
दीपू तेव्हा शाळेत होती. दिपूच्या परिवारात बरेच सदस्य होते. संयुक्त परिवार
(Joint-Family) ही गोष्ट जी आज जवळजवळ विलुप्त होत आहे, ही त्या वेळी सर्रास होती.
दिपूच्या च्या घरी बरेच सदस्य होते:
आजोबा (सवंत्रसैनिक आणि एक आदर्श शेतकरी),
आजी (गृहिणी),
वडील (रमेश पाटील- बँक मॅनेजर),
आई (प्राथमिक शाळेतील शिक्षिका),
काका- वडिलांचे मोठे भाऊ (Ex-Army)
काकी (गृहिणी) आणि त्यांची मुले.
ते एक सामान्य महाराष्ट्रीय कुटुंब होते.
दिपू चे काका , निवृत्त भारतीय सेना अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते
दीपुच्या आजी-आजोबां सोबत "पाठ-पन्हाळा" येथे राहत होते.
दिपू चे वडील त्यांच्या बँक नोकरीमुळे "कोल्हापूर" मध्ये
असत.
"कोल्हापूर" मध्ये पाटील कुटुंबांचे अतिशय छान आणि सुंदर
घर होते. जवळ पास ६० वर्षां पूर्वीचं कोरलेल्या ३'६" भिंतीच बांधकाम होतं.
Ground floor ला एक छोटा प्रतीक्षा कक्ष, 400 चौ. फुटांपेक्षा मोठा HALL, पूर्वेकडे एक छान मोठा स्वयंपाकघर, ज्याच्या दारात एक छान असा तुळशी
कट्टा होता. 2 मास्टर बेड आणि २ REGULAR बेडरूम होत्या . घराचं एक आकर्षण म्हणजे त्यात १० x १० फूट इतक मोठ पूजागृह होतं. दिपूच्या वडिलांनी नंतर एक मजला वाढवला, ज्यात ४ bedrooms , एक मोठा
hall & टेरेस होतं. आजोबानी स्वप्नातील एक घर तयार केले होते.
दिपू ला वेगळे बेडरूम होते, ती तशी नशीबवान होतीच.
घराचं नाव "गुलममोहर" होतं . घर च्या सभोवताली बरेच झाडं
होती.
2 हापूस आंब्याची, 2 गोटी आंब्याची, पांढरा पेरू, लाल पेरू, सीताफळ,
चिक्कू, आवळा, नारळाचे 3 झाड आणि प्लॉटच्या पुढच्या बाजूला अशोकाची झाडे होती ह्या व्यतिरिक्त मुख्य आकर्षण होते ते म्हणजे "गुलमोहर"
च झाड, जे असा म्हणतात कि दिपूच्या घर पेक्षा ही जुनं आहे. म्हणून आजोबानी घराचं नाव "गुलमोहर" ठेवलेलं. गुलमोहर इतका
मोठा होता कि, १००० यार्ड वरून तो सहज दिसायचा.
गुलमोहर मध्ये एक विहीर पण होती, जी बांधकामाच्या वेळी बांधण्यात अली
होती. थोडक्यात काय, गुलमोहर म्हणेज प्रेम, करुणा, दयाळूपणा आणि अत्यंत कठोर
परिश्रम करून दिपूच्या आजी-आजोबांनी बांधलेले एक घर होते.
अपने स्टोरी कि हिरोईन, शाळेत एकदम लोकप्रिय होती (हिरोईन हे ,
she has to be smart right). शिक्षकांची मुलगी असल्यामुळे ती हुशार पाहिजेच...??
लहान असताना आपल्याला तथाकथित समाजाकडून पुष्कळ अपेक्षा सहन कराव्या लागतात आणि आपल्या पालकांच्या व्यवसायावर बरेच अवलंबून असते. जसं कि शिक्षक, डॉक्टर,
सरकारी अधिकारी इत्यादी. असो ते सोडा आपली स्टोरी राहील बाजूला.
दिपू मराठी शाळेची विद्यार्थी होती, Co-Education न्हवते. ती अभ्यासात
हुशार होती. नेहमी जागृत, आज्ञाधारक आणि प्रामाणिक. ती तिच्या वर्गाची मॉनिटर होती.
ती SSC with Distinction पास झाली, तिचे संपूर्ण कुटुंब आनंदी होते. दीपक तिचा भाऊ 12 commerce ला होता , तो देखील चांगल्या मार्कनी पास झाला. दीपक त्याच्या वडिलांच्या पायऱ्यांवर पाय ठेवणार होता. त्याचा उद्देश
CA करून वडिलांप्रमाणे नोकरी चा होता.
पण दिपू च शिक्षणा बद्दल पुढे काय करायचं हे दीपूला ठाऊक नव्हते Result नंतर दिपूच्या शिक्षणाबद्दल एक दीर्घ कौटुंबिक बैठक झाली.
दिपूचंही इतर मुलांसारखं होतं, जे मित्र करतील ते आपण पण करायचे,
(तू करणार, मी पण करणार मग..!!)
ते वर्ष 2000 चे होते, जेव्हा आयटी क्षेत्र भरभराटीचं होतं. बर्याच
कौटुंबिक सदस्यांनी तिला अभियांत्रिकी करायचा सल्ला दिला.
रमेश पाटील (RP) - दिपूचे वडील,
एक नम्र आणि शांत व्यक्ती होते आणि
इतर वडिलांप्रमाणे त्यांचं त्यांच्या मुलीशी घट्ट नातं होतं.
दीर्घ चर्चेनंतर, शून्य निष्कर्ष निघाला. सर्वानी एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला की दीपू दोन्ही group घेणार
(Maths & Science).
ज्या विषयात जास्त Mark , त्यानुसार पुढचा प्रवास.
RB ने आपल्या मुलीच्या अभ्यासासाठी पुरेशी बचत केले होती. त्या बैठकीत ते काहीच बोलले नाहीत. नंतर दिपू एकटी असताना तिला ते म्हंटले "तु सगळ्यांना फक्त हो म्हणत जा, जे काय आहे
ते आपलं आपलं ठरवू . ठिक आहे. तुला जे आवडेल तु तेच कर आणि कधीही काहीही लागलं तर बाबा
आहेतंच ना" हे RB चे शब्द होते, ज्या मूळ नेहमीच दिपूला प्रोत्साहन आणि आत्मविश्वास
द्यायचे.
दिपूला शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. ठरल्या
प्रमाणे तिने दोन्ही Group (PCMB ) घेतले. वेळ पटापट जातो आणि दीपू 12 व्या परीक्षेत दोन्ही group मध्ये चांगल्या
Marks नि उत्तीर्ण होते. ती वडिलांना सांगते की तिची महत्वाकांक्षा Medical Field आहे ,
Engineering नाही. दिपू RP ची लहान परी होती, त्यांनी आजपर्यंत दिपूची प्रत्येक इच्छा
पूर्ण केली होती, ते तिला नाही म्हणू शकतच न्हवते.
दिपूचे BHMS Doctor होण्याचे भाग्य आता ठरले होते
दिपूचे BHMS Doctor होण्याचे भाग्य आता ठरले होते

No comments:
Post a Comment