राजशेखर
(आपल्या कथेचा नायक)
(आपल्या कथेचा नायक)
राजशेखर तानाजी देशमुख: जन्म आणि कर्म भूमी सांगली. ह्यांचं जरा वेगळं आहे.
राजशेखर हा सांगली जवळील एका छोट्या गावात वाढलेला पोरगा. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचा एकुलता एक लेक. छोटे कुटुंब होतं.
वडील : तानाजी बाबुराव देशमुख (शेतकरी)
आई : वैशाली ( शेतकरी )
मुलगा: राजशेखर, आपण त्याला RD म्हणू.
प्रत्यक्षात RD चं प्रचंड मोठं कुटुंब आहे. सांगलीवाडीत देशमुख हे सुप्रसिद्ध नाव होते.
त्यांचा "देशमुख वाडा" अख्या गावात प्रसिद्ध होता . एका घरात एकूण 32 कुटुंबे. (32 उंब्रे)
पण आपल्या इतिहासा प्रमाणे "भावकीची भांडण". वाडा वेगळा झालेला आणि त्या प्रमाणे इतरही वाटण्या झाल्या होत्या.
तानाजींनी बाहेर पडण्याचा आणि पुन्हा कधीही त्यांचा चेहरा दिसण्याचा निर्णय घेतला नाही. त्यानंतर ते कधीही देशमुखांच्या वाड्याकडे गेले नाहीत.
त्यांनी त्यांच्या शेतात छान असं आपल घर बांधलं. एकंदरीत ते प्रेमळ, काळजी घेणारे आणि छान कुटुंब होते.
RD एकदम special होता आणि विशेषतः त्याच्या पालकांसाठी कारण "नवसाचं पोर" होतं.
आई वडिलांनी त्याला लहानपणा पासून फार लाडाने वाढवले होते.
RD चं घर देखील RD प्रमाणे Special होते.
मुख्य प्रवेशद्वारातुन आत गेल्या वर मोकळी जागा, ज्याला आपण "Open to Sky" म्हणतो. उजव्या बाजूला धान्य भांडारहोता , ज्या मध्ये धान्य, गहू, तांदूळ इत्यादी दोन-तीन मोठे कंटेनर होते. आत गेल्या गेल्या चौरस होता. एक बाजूला मुख्य द्वार आणि बाकी ३ बाजूला ४-५ पायऱ्या होत्या. मोकळ्या जागेत पाण्याचा एक हौद होता आणि सुरेख असा "तुळशी चा कट्टा".
स्वयंपाक घर मुख्य प्रवेशद्वारच्या डाव्या बाजूला होतं आणि त्या नंतर घराच्या परिक्रमा मध्ये २-३ शयन कक्ष होती.
याशिवाय एक आकर्षण म्हणजे एक छान असा "सागवानी झोपाला" होता. RD ची आवडती जागा. शौचालय मागील बाजूस घराबाहेर होते. संपूर्ण घराला लाकडी खांब होते.
तानाजींनी त्यांच्या कुटुंबासाठी स्वप्नातले घर बांधले होते.
त्यांचा “गोठा” घरा शेजारी होता.गोठ्यात बरेच प्राणी होते"
2 म्हशी, 1 गाय, एक जोडी बैल, ४ शेळ्या, एक डझन कोंबड्या आणि एक कुत्रा "वाघ्या".
वैशाली RD ची आई, RD च्या वडिलांपेक्षा जास्त शिक्षित होती. त्याकाळी स्त्रियांनी नोकऱ्या पण कमी होत्या आणि त्यात भर म्हणून त्यांच्या घरी माणसं फक्त ३. तरीपण त्या तानाजींना शेतीत पूर्णपणे मदत करायच्या.
एका शेतकरयांची बायको कधीच फक्त "गृहिणी" नसते, तिला घर आणि शेत दोनीही बघावे लागते.
ती घर आणि शेती दोनीही व्यास्तीत सांभाळायची.
RD एकुलता मुलगा होता. त्याची मावशी म्हणजे वैशालीची छोटी बहीण त्यांच्याबरोबर रहायची. आई वडील शेतात गेले कि मावशी त्याची काळजी घेत असे.
RD च्या परिवार बरोबर त्यांच्या शेतात काम करणारे कुटुंब देखील. त्यात माणिक, त्यांची पत्नी अक्का आणि मुले अशोक आणि उषा होत्या. अशोक RD च्याच वयाचा होता.
RD ७वी पर्यंत गावातील मराठी शाळेत गेला . मग माध्यमिक शाळा सांगली येथे होती.
सकाळची शाळा आणि नंतर शेत, असा दिन क्रम होता.
RD चांगला खेळाडू होता. तानाजी स्वत: एक कुस्तीपटू होते म्हणून त्यांनी RD ला लहान पण पासून आखाड्याची सवय लावली होती. RD नियमित पाने तालीम करायचा. शाळा पूर्ण करून RD नं , सांगली मधनं १२ विज्ञान पूर्ण केले. तानाजी कधीही देशमुख वाड्याकडे गेले नाहीत, परंतु नाते-संबंध अखंड होते. सना-सुदीला सर्वांची भेट होत असे.
RD फुटबॉलचा चा मोठा शौकीन होता. आधी शाळा नंतर कॉलेज च्या फुटबॉल टीम मध्ये होता. त्याने युनिव्हर्सिटी पातळी वर १८ वर्षाखालील संघात सहभाग केला होता.
RD ला १२वी चांगल्या मार्कांनी पास झाला.
तानाजींनी RD ला सांगितले होते, तुझा शिक्षणाचा निर्णय तू आणि वैशाली ने घ्यावा, जो काही असेल त्याला माझी संमती असेल.
त्या दिवसांत आयटी (IT) क्षेत्र जोरदार चालू होतं आणि त्याला बरेच विद्यार्थी आकर्षित झाले होते. आरडी त्यापैकी एक होता. विद्यापीठातील खेळाडू असल्यामुळे RD ला Sports Quota मधून प्रवेश मिळाला.
तानाजी आणि वैशाली अभिमानी पालक होते. RD आज्ञाधारक मुलगा होता. आजपर्यंत त्याने आपल्या पालकांच्या प्रत्येक शब्दाचे पालन केले होते.
कपडे, केसांची शैली, सवयी आणि जे काही असेल ते , त्याने आईच्या म्हणण्यानुसार केले होते.
तानाजींनी RD ची जवळपास एक आणि एक इच्छा पूर्ण केली होती, तरीही RD ने कधीच कश्याची तक्रार नाही केली.
त्याला कॉलेज ला जाताना Bike हवी होती,
त्याला फुटबॉल खेळायचा होता कुस्ती नाही,
त्याला सणासुदीला म्हणजे दिवाळी ला देशमुख वाड्यात जायचे होते, परंतु त्यांनी कधीच तक्रार केली नाही.
आई-वडिलांनी केलेल्या कष्टांची त्याला जाणीव होती.
RD चा इंजिनीरिंग प्रवास नुकताच सुरू होणार होता. त्याला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता जो त्याच्या घरापासून दूर होता.
आपल्याला माहित आहे की ती व्यक्ती कोण आहे, जो सर्वात जास्त दुःखी, व्यथित आणि दुःखी असेल त्या व्यक्तीला सोडून "वडील". आई तिला जे वाटते ते सांगते, व्यक्त करते , परंतु एवढं भाग्य वडिलांच नाही. आईपेक्षा ती अधिक नाजूक वडील असतात , पण बाप रडत नाहीत, तो कधीही त्यांच्या मनातून बोलू शकत नाहीत, ते व्यक्त करत नाहीत. जसे तानाजी होते.
RD चा निगण्याचा दिवस आला.
वैशाली संपूर्ण रात्री रडत होती आणि तानाजी तिला समजावत होते.
जन्मल्या पासून RD त्यांच्या डोळ्यांपासून कधीही दूर न्हवता.
Most difficult part in life, is the absence your loved once.
जीवनात सर्वात कठीण क्षण आपल्या आवडत्या व्यक्तीची अनुपस्थिती.
संपूर्ण देशमुख कुटुंबासाठी ही एक कठीण परिस्थिती होती. परंतु हीच कुटुंबाची सुंदरता असते ,Nuclear Chain, एक आणि एक धागा जोडलेला. एका गावातला मुलगा आता एक मोठ्या शहरात निघाला होता. जेव्हा तो गावातून निघत होता तेव्हा संपूर्ण देशमुख (संपूर्ण 32 कुटुंब) एकत्र होते, ते असे काहीतरी होते जे कधीच झाले न्हवते, कारण माहित आहे, RD was the Missing Link. सगळ्यांना जोडणारा धागा RD होता.
RD न आपल्या घराला एक शेवटची फेरी मारली.
तो सगळं डोळे भरून बघत होता, त्याच घर, शेत, गायी, मेंढी आणि शेवटला भेटला त्याचा आवडते मित्र "वाघ्या". RD वाघ्या जवळ ५ मिंट शांत बसला.
I personally believe Dogs connect very honestly, they do understand emotions
with any words.
त्याने आई च्या डोळ्यांत बघण्या आधी एक मोठा श्वास घेतला, आई शी नजर मिळवताच आई ढसा-ढसा रडू लागली. वैशालीने त्याला कवटाळले.भावना डोळ्यां मार्गे वाहत होत्या. त्याने आपल्या पालकांच्या पाया पडला. तानाजींनी पापणी पण हलवली नाही, ना ते काही बोलले, नाहीते रडले, ते फक्त शांत निशब्द उभे होते.
RD चा प्रवास चालू झाले, नशिबात पुढे काय वाढून ठेवलाय हे त्याला माहित न्हवते.
>>>>>>>>>> भाग २ समाप्त<<<<<<<<<<
Link to Next Chapter




No comments:
Post a Comment