![]() |
| "प्रत्येक व्यक्ती एक कागद असतो, त्यावर उठणारी शाही त्याचं भवितव्य/ भाग्य ठरवते" |
शाळा: प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा.
माझं वयक्तिक मत आहे, खरं व्यक्तिमत्व शाळेत तयार होतं.
तिथं संस्कार शिकवले जातात. आपल्या सवई पण तिथंच चालू होतात.
जसं कि:
१. लौकर उठायची सवय
२. सायकल चालवायची सवय
३. वायाम करायची ची सवय
३. खेळायची सवय
४. घरकाम करायची सवय
५. अभ्यास करायची सवय (थोडं वादग्रस्त आहे....😆)
अश्या बऱ्याच सवयी शाळेत लागतात.
तश्याच इतर हि काही सवयी असतात ज्या आपलं व्यक्तिमत्व घडवतात.
एक म्हण आहे "First we make our habits, then our habits make
us".
जसं कि,
१. मंदिर दिसलं कि पाया पडणे
२. चुकून आपला पाय कुणाला लागला कि लगेच पाय पडणे
३. पैसे खाली पडले कि उचलून पाया पडून घेणे
४. चहा बरोबर आवडता अख्या बिस्कीट पुडा खाणे
List मोठी आहे, पण आपल्याला कळलं असेल.
अलीकडे मी एकदा गाडी (कार) कामाला सोडली.
किरकोळ काम आटपून servicing करून गाडी दुसऱ्या दिवशी मिळाली.
मी गाडी घ्याला स्वतः गेलो होतो.
मी बाहेर येऊन गाडी मध्ये बसलो.
गाडी एकदम चका-चक साफ केली होती.
कार फ्रेशनर चा सुगंध दरवळत होता.
पायात वेलकम चा कागद होता.
मी तिथून निघालो आणि थोड्याच वेळात घरी पोहोचलो.
गाडीतून बाहेर पडताना बाहेर माझं पाकीट पायात पडलं.
ते उचलताना थोडे पैसे तिथंच पडले.
मी नेहमीच्या सवयी प्रमाणे, पैसे अशे छातीला लावले (पाया पडायचा शॉर्ट-कट)
आणि पाकिटात ठेवले.
एकदम माझा लक्ष्यात आलं पैश्याच्या खाली होता, तो पण कागदचं होता.
लहान पणी पासून ची शिकवण / सवय होती,
"वही/ पुस्तक/ पैसे/ जेवणाचं ताट/ देवाचा फोटो अगदी वर्तमान पत्राला सुद्धा पाय लागला कि लगेच पाया पडायचे".
"वही/ पुस्तक/ पैसे/ जेवणाचं ताट/ देवाचा फोटो अगदी वर्तमान पत्राला सुद्धा पाय लागला कि लगेच पाया पडायचे".
एक "Flash-Back" डोळ्या समोरून गेला.
पेपर ला पाय ना लावणारे आपण, आता पायातल्या जोड्यांची घाण गाडी मध्ये
पडू नये म्हणून पायात "प्रिंटेड कागद" पाया खाली ठेवतो.
"This is Life- आयुष्य काय असत याचं उत्तम उदाहरण"
"प्रत्येक व्यक्ती हा असाच एक कागद असतो, त्यावर उठणारी शाही
त्याचं भवितव्य/ भाग्य ठरवते"
![]() |
| पु. ल. देशपांडे (अपूर्वाई) |


No comments:
Post a Comment